बॉलीवूड

शाहिदमुळे बदललं करिअर आणि सैफमुळे बदललं आयुष्य, करिना कपूरचा खुलासा

Trupti Paradkar  |  Jul 13, 2021
शाहिदमुळे बदललं करिअर आणि सैफमुळे बदललं आयुष्य, करिना कपूरचा खुलासा

बॉलीवूडची बेबो म्हणजेच करिना कपूरने स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या लोकप्रियतेमुळे ती सतत चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते. तिचं दुसरं बाळंतपण असो, तिच्या बाळाचं नाव काय हा विषय असो, तिचा बाळंतपणानंतरचा फिटनसे असो, तिचे आगामी चित्रपट असो, कपूर घराण्याची एखादी गोष्ट असो वा मग तिचं शाहिद आणि सैफसोबत असलेलं रिलेशन असो ती  सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेचा विषय ठरत असते. जब वी मेट नंतर करिना शाहिदपासून दूर गेली तर टशन चित्रपटापासून ती सैफ अली खानच्या जवळ आली हे सर्वांना माहीत  आहेच. पण आता स्वतः करिनानेच तिच्या या प्रेमत्रिकोणाबाबत एक मोठा खुलासा केला आहे. कारण या  दोन चित्रपटांच्या शूटिंग दरम्यानच करिनाच्या आयुष्यात खूप मोठे बदल घडले होते. 

करिनाने खाजगी आयुष्याबाबत केला मोठा खुलासा

चाहत्यांना नेहमीच करिना, शाहिद आणि सैफच्या नात्याबद्दल जाणून घ्यायचं असतं. वास्तविक आता शाहिद त्याच्या आयुष्यात आणि करिना तिच्या संसारात सुखी आहे. मात्र करिना आणि शाहिदमध्ये असं काय घडलं होतं की जब वी मेटनंतर त्यादोघांनी आपली वाट वेगळी केली याबाबत नेहमीच चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. याबाबत करिनाने एका मुलाखतीत एक मोठा खुलासा केला आहे. जब वी मेटसाठी करिनाने शाहिदचे नाव पुढे केले होते अशी चर्चा पुन्हा रगंत आहे. यात करिनाने शेअर केलं आहे की, जब वी मेटसाठी शाहिदने स्वतः मेहनत करून भूमिका मिळवली होती. मात्र जब वी मेट आमच्या दोघांच्या करिअरसाठी खूप मोठा निर्णय ठरला. कारण या चित्रपटानंतर शाहिद आणि माझं करिअर एका वेगळ्या वळणावर पोहचलं.

टशनमुळे मिळाला स्वप्नातील राजकुमार

जब वी मेट करिअरसाठी मोठा माईल स्टोन ठरला पण  टशन चित्रपटाने माझं संपूर्ण आयुष्यच बदललं. कारण या चित्रपटाच्या सेटवर मी पहिल्यांदा सैफ अली खानला भेटले. या सेटवरच मला सैफबद्दल प्रेम वाटू लागलं. मी एकाच वेळी जब वी मेट आणि टशनचं शूटिंग करत होते. टशनसाठी मी झिरो साईज फिगर केली होती. हा चित्रपट यशराज फिल्मचा होता. मात्र टशन चित्रपटात निर्माण होणाऱ्या वाईब्स जब वी मेटवरदेखील तशाच होत्या. माझं नशीब काहीतरी वेगळं घडणार याचं संकेत देत होतं. माझं वजन कमी झालं होतं. मी बिकनी मध्ये सुंदर दिसले होते. दोन्ही चित्रपटादरम्यान बऱ्याच गोष्टी बदलल्या. जब वी मेटमुळे माझी आणि शाहिदची  वाट वेगळी झाली. मात्र चित्रपट हिट झाल्याने करिअरला चांगलं वळण मिळालं. मी टशन चित्रपटाची खूप कृतज्ञ आहे. कारण या चित्रपटामुळे माझं स्वप्न पूर्ण झालं.  मी सैफला भेटले आणि माझं आयुष्य बदललं  या दोन चित्रपटादरम्यानच मी माझ्या स्वप्नातील राजकुमार सैफ अली खानला भेटले आणि त्याच्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला.  

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

दोन मुलांच्या जन्मानंतर ईशा देओलचा कमबॅक

खऱ्या आईबद्दल विचारणाऱ्यांना सुश्मिता सेनच्या मुलीने दिलं असं उत्तर

दिलबरो म्हणत मुलीची केली पाठवणी, सुनील बर्वेचा व्हिडिओ व्हायरल

Read More From बॉलीवूड