ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
दोन मुलांच्या जन्मानंतर ईशा देओलचा कमबॅक

दोन मुलांच्या जन्मानंतर ईशा देओलचा कमबॅक

अभिनेत्रीचे विश्व हे सर्व सामान्य महिलांपेक्षा नक्कीच वेगळं असतं. एकदा या ग्लॅमसर क्षेत्रात आलं की लग्न, मुले, संसारासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. शिवाय जर एखादीने संसाराचा मार्ग निवडला तर तिला पुन्हा अभिनयासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. मात्र काही अभिनेत्रींनी आजवर ही तारेवरची कसरत लीलया पेलली आहे. लग्न, संसार आणि मुलं सांभाळून अभिनयात करिअर केलं आहे. हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओलने असंच करिअरच्या शिखरावर असताना लग्न केलं. पुढे लग्न,संसार आणि दोन मुलांचा जन्म यामुळे ती बॉलीवूडपासून दूरावली होती. मात्र आई हेमामालिनीचा आदर्श समोर ठेवत ईशा तब्बल अकरा वर्षांनी पुन्हा एकदा तिच्या कमबॅकसाठी तयार झाली आहे. 

ईशाने शेअर केली तिच्या कमबॅकची पोस्ट

ईशा देओलने स्वतः तिच्या  सोशल मीडियावरून ही आनंदाची गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ईशाने तिच्या पोस्टमध्ये शेअर केलं आहे की, ” रूद्र – दी एज ऑफ डार्कनेस च्या माध्यमातून मी माझ्या पहिल्या वेबसिरिज डेब्यूसाठी तयार आहे. माझ्यासोबत या वेबसिरिजमध्ये आहे अजय देवगण.. जो अतिशय चांगला कलाकार आहे आणि आम्ही अनेक चित्रपटांमधून एकत्र काम केलेलं आहे. या वेबसिरिजची निर्मिती @Applausesocial आणि @BBCStudiosIndia करत आहे आणि ही वेबसिरिज डिस्नेप्लसएचएसव्हीआयपीवर दाखवली जाणार आहे”

 

ईशा अचानक झाली होती बॉलीवूडमधून गायब

ईशा देओलने 2002 मध्ये कोई मेरे दिल से पुछे या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पुढे तिने धूम, नो एन्ट्री, क्या दिल ने कहा, इन्सान, जस्ट मॅरिड, ऑंखे, दस  सारख्या  चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली. चेहऱ्यात हेमामालिनीची झलक आणि नृत्यात पारंगत  असल्यामुळे ईशाने स्वतःचा चाहता वर्ग खूप कमी वेळात निर्माण केला. मात्र अचानक करिअरच्या  शिखरावर असताना तिने उद्योगपती भारत तख्तानीसोबत विवाह केला. 2012 मध्ये भारत आणि ईशा विवाहबंधनात अडकले. पुढे ईशाला दोन मुलं झाली. ज्यामुळे तिने लग्न, मुलं, संसाराचा मार्ग निवडला आणि गेली अकरा वर्ष बॉलीवूड आणि अभिनयापासून दूर राहणं पसंत केलं. ईशाने अजय देवगनसोबत मै ऐसा ही हू, कॅश, युवा, काल, इन्सान अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

ADVERTISEMENT

अजय आणि ईशाची सुपरहिट जोडी पुन्हा एकत्र

अजय देवगन आणि ईशा देओलच्या रूद्र: दी एज ऑफ डार्कनेस या वेबसिरिजची चर्चा गेली वर्षभर सुरू आहे. थोड्या थोड्या दिवसांनी या वेबसिरिजचे अपडेट प्रेक्षकांसमोर सादर केले जात आहेत. आता बॉलीवूडपासून दूरावलेल्या ईशा देओलने या वेबसिरिजमध्येय एन्ट्री केल्यामुळे या  प्रोजेक्टबद्दल अधिक उत्सुकता निर्माण झाली आाहे. कारण अजय आणि ईशाच्या जोडी प्रेक्षकांनी याआधीदेखील भरभरून प्रेम केलं आहे. त्यामुळे पुन्हा या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते नक्कीच आतूर आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये ईशा अजयच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारणार आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा  –

अखेर आदित्य कश्यप बनणार आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा मालक,’माझा होशील ना’ अपडेट

ADVERTISEMENT

आणखी एक स्टार किड पदार्पणाच्या मार्गावर, आहे या ज्येष्ठ अभिनेत्याचा नातू

पुन्हा एकदा एकत्र येणार गोविंदा आणि रविनाची सुपरहिट जोडी

07 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT