xSEO

केटो सोपच्या वापराबाबत माहिती | Keto Soap Uses In Marathi

Vaidehi Raje  |  Feb 28, 2022
Keto Soap Uses In Marathi

Keto Soap Uses In Marathi – बुरशीजन्य संसर्ग (Fungal Infection) ज्याला मायकोसिस देखील म्हणतात, हा फंगसमुळे होणारा त्वचेचा रोग आहे. फंगसच्या लाखो प्रजाती आहेत. फंगस हे घाणीत, वनस्पतींवर, आपल्या घरात आणि आपल्या त्वचेवरही असते. काहीवेळा त्यांची अनियंत्रित वाढ झाल्याने आपल्याला त्यापासून संसर्ग होऊ शकतो आणि मग रॅशेस, पुरळ, त्वचेवर फोड येणे, चट्टे येणे, कोंडा होणे असे त्रास होतात. त्वचेला फंगल इन्फेक्शन हे तुमच्या शरीरावर कुठेही होऊ शकते.ऍथलेट्स फूट, जॉक इच,यीस्ट इन्फेक्शन आणि गजकर्ण हे फंगल इन्फेक्शनचे काही सर्वात सामान्यपणे होणारे प्रकार आहेत. साधारणपणे पावसाळ्यात त्वचेला स्किन प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता जास्त असते. त्वचेला जर कमी प्रमाणात त्रास असेल तर आपण फंगल इन्फेक्शनवर घरगुती नैसर्गिक उपाय करू शकतो.

केटो सोप हे अँटीफंगल्स नावाच्या औषधांच्या प्रकारात येते. हे त्वचेला होणाऱ्या फंगल इन्फेक्शनवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. केटो सोपचा उपयोग ऍथलीट्स फूट, थ्रश आणि गजकर्ण यांसारख्या संसर्गास कारणीभूत असलेल्या फंगसला नष्ट करून त्वचा पूर्ववत व इन्फेक्शन फ्री करण्यासाठी केला जातो. त्वचेचे फंगल इन्फेक्शन सामान्यतः 2 ते 4 आठवड्यांनंतर बरे होते. तरीही डॉक्टरांनी सांगितल्यापेक्षा जास्त काळासाठी औषध वापरू नका. 2 ते 4 आठवड्यांच्या उपचारानंतरही स्किन इन्फेक्शन कमी होत नसेल तर डॉक्टरांना सांगा. चला तर मग केटो सोपबद्दल अधिक जाणून घेऊया, (Keto Soap Uses In Marathi)

केटो सोपच्या वापराबाबत माहिती

केटो सोप काय आहे? – What Is Keto Soap In Marathi?

केटो सोपमध्ये Ketoconazole नावाचे एक औषध असते जे नायझोरल या ब्रँडच्या नावाने विकले जाते.  हे अँटीएंड्रोजन आणि अँटीफंगल औषध आहे जे अनेक प्रकारचे फंगल इन्फेक्शन नष्ट करण्यासाठी वापरले जाते. ते त्वचेवर लावल्यास त्याने त्वचेवरील फंगस नष्ट होते. टिनिया, त्वचेचा कॅंडिडिआसिस, पिटिरियासिस व्हर्सिकलर, डँड्रफ आणि सेबोरेरिक डर्मटायटिस या त्वचेच्या रोगांवर हे औषध प्रभावी ठरते.  हे औषध सहसा तोंडावाटे दिले जात नाही. पण जर इतर औषधे वापरता येत नसतील तेव्हाच गंभीर संसर्गासाठी Ketoconazole तोंडावाटे घेण्याची शिफारस केली जाते.

Ketoconazole चा इतर वेळी केसांची अनावश्यक वाढ आणि कुशिंग सिंड्रोम मध्ये उपयोग केला जातो. केटो सोपमुळे एर्गोस्टेरॉलचे संश्लेषण रोखले जाते.  एर्गोस्टेरॉल हा बुरशीजन्य पेशींच्या पडद्याचा एक महत्त्वाचा घटक असतो. Ketoconazole युक्त केटो सोप फंगसच्या पेशींच्या सभोवतालच्या पडद्यांचे उत्पादन रोखून विविध प्रकारच्या बुरशीच्या वाढीस प्रतिबंध करतो.

जर ऍथलेट्स फूटचा त्रास असेल तर मोजे रोज स्वच्छ धुवावे व कडक उन्हात वाळवावेत. तसेच अंतर्वस्त्रे देखील रोज साबणाने धुवावीत व कडक उन्हात सुकवावीत. शक्यतोवर फंगल इन्फेक्शन झालेल्या व्यक्तीचे कपडे हे वेगळेच भिजवावेत व धुवावेत जेणे करून त्यामुळे इतरांना त्याचा संसर्ग होणार नाही. 

वाचा गजकर्ण कारणे, लक्षणं आणि घरगुती उपाय

केटो सोपचे फायदे – Benefits Of Keto Soap In Marathi

केटो सोपचा उपयोग त्वचेच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी केला जातो. ऍथलेट्स फूट, गजकर्ण , व्हजायनल थ्रश,  घामामुळे येणारे पुरळ या व इतर त्वचेच्या तक्रारींसाठी केटो सोप वापरण्यात येते.  केटो सोप  फंगसची वाढ थांबवते व फंगसच्या पेशी नष्ट करते ज्यामुळे इन्फेक्शन कमी होते आणि लक्षणे दूर होतात.तुम्हाला डॉक्टरांनी जोवर हा साबण वापरण्यास सांगितला आहे तोपर्यंत नियमितपणे त्याचा वापर करा. जरी तुमची लक्षणे नाहीशी झाली तरीही त्याचा डॉक्टर सांगतात तोवर वापर करत राहा, अन्यथा फंगल इन्फेक्शन परत होऊ शकते. तुम्ही उपचार घेत असलेल्या संसर्गाच्या प्रकारानुसार संसर्ग पूर्ण बरा होण्यास काही आठवडे लागू शकतात. तुमची त्वचा पूर्णपणे बरी झाल्यानंतरही, लक्षणे परत येण्यापासून रोखण्यासाठी तुम्हाला अधूनमधून केटो सोप किंवा क्रीमचा वापर करावा लागेल. 

बुरशीजन्य पेशींचा पडदा (cell membrane) त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असतो  कारण तो पेशींमध्ये अनावश्यक पदार्थांच्या प्रवेशास प्रतिबंध करतो आणि पेशींमध्ये असलेल्या गोष्टींचे बाहेर पडण्यापासून संरक्षण करतो. केटो सोप बुरशीच्या पेशींच्या पडद्याला छिद्र पाडतो आणि या पेशी नष्ट करतो. त्याद्वारे फंगल इन्फेक्शन दूर  होते. तसेच इन्फेक्शनमुळे त्वचेला तडे जाणे, जळजळ होणे, स्केलिंग आणि खाज सुटणे या सर्व त्रासांपासून आराम मिळतो.

केटो सोपचा वापर कसा करावा – How To Use Keto Soap In Marathi?

केटो सोपचा वापर पुढीलप्रमाणे करावा.  केटो सोप (Keto Soap Uses In Marathi ) तुमच्या डॉक्टर जितका डोस देतील त्याप्रमाणेच आणि तेवढ्याच कालावधीसाठी वापरावे. जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी हे औषध नियमितपणे वापरावे. पण ते गरजेपेक्षा जास्त वापरू नका. केटो सोप जास्त प्रमाणात वापरल्याने फंगल इन्फेक्शन लवकर बरे होईल असे नसते. उलट त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. 

म्हणून केटो सोपचा वापर कसा करावा याच्या स्टेप पुढीलप्रमाणे आहेत,

केटो सोपचे दुष्परिणाम । Side Effects Of Keto Soap In Marathi

केटो सोपचे दुष्परिणाम । Side Effects Of Keto Soap In Marathi

बऱ्याच औषधांप्रमाणे केटो सोपचेही काही सामान्य दुष्परिणाम आहेत.  बहुतेक दुष्परिणाम फारसे गंभीर नसतात आणि त्यासाठी इतर वैद्यकीय उपचार करण्याची गरज नसते. हे त्रास  कालांतराने हळूहळू दूर होतात. केटो सोप वापरण्याचे सर्वात सामान्य दुष्परिणाम म्हणजे ऍप्लिकेशन साइटवर (जिथे साबण लावतो ती जागा) जळजळ, आग होणे, खाज  सुटणे, लालसरपणा, कोरडेपणा, त्वचा सोलल्यासारखी होणे किंवा त्वचेवर फोड येणे हे आहेत. जर तुम्ही स्कॅल्पच्या फंगल इन्फेक्शनवर उपाय म्हणून केटो सोप वापरत असाल तर कधीकधी यामुळे  केसगळती होऊन ते पातळ होऊ शकतात. परंतु जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला गंभीर ऍलर्जीचा त्रास होतोय तर तुमच्या डॉक्टरांना सांगून औषध बदलून घ्या.

केटो सोपचे काही सामान्य दुष्परिणाम खालीलप्रमाणे आहेत – 

बरेच दिवस केटो सोप वापरून हे साइड इफेक्ट्स कायम राहिल्यास किंवा जास्त त्रास होत असल्यास, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच केटो सोपची ऍलर्जी असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधून दुसऱ्या औषधाविषयी चौकशी करावी. किटो सोपची ऍलर्जी असल्यास ते वापरल्यावर पुरळ येणे, ओठ, घसा किंवा चेहरा सुजणे, गिळताना  त्रास होणे किंवा श्वासोच्छवासाला त्रास होणे असे त्रास होतात. तुम्हाला यापैकी काहीही त्रास झाल्यास लगेच डॉक्टरांकडे जा. केटो सोपचा आपल्या डोळ्यांशी थेट संपर्क टाळा. जर चुकून साबण डोळ्यात गेला तर डोळे पाण्याने स्वच्छ धुवा आणि त्वरित वैद्यकीय मदत घ्या.

केटो सोपविषयी पडणारे काही सामान्य प्रश्न – FAQs 

केटो सोप चेहऱ्यावर लावावा का?

केटो सोप हा फंगल इन्फेक्शनसाठी देण्यात येतो. तो चेहऱ्यावर लावू नका. त्याने चेहेऱ्याच्या त्वचेला त्रास होईल. जोवर डॉक्टर स्वतःहून सांगत नाहीत तोवर चेहेऱ्यावर केटो सोप लावू नका. 

मी दररोज केटो सोप वापरू शकतो का?

होय, तुम्ही दररोज केटो साबण वापरू शकता परंतु केवळ शिफारस केलेल्या कालावधीसाठीच त्याचा वापर करा. 2-3 आठवडे वापरल्यानंतरही जर तुमच्या त्वचेच्या स्थितीत सुधारणा होत नसेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. परंतु तो स्वतःच्या मनाने दीर्घ काळासाठी वापरू नका. 

केटो साबण सोरायसिससाठी चांगला आहे का? 

केटो सोपचा वापर वरवरच्या बुरशीजन्य आणि यीस्ट संसर्गावर उपचार करण्यासाठी केला जातो. त्वचेची स्थिती तपासल्यानंतर डॉक्टर योग्य औषध लिहून देतात. हा साबण ज्या आजारासाठी लिहून दिला आहे त्याशिवाय इतर कोणत्याही त्वचेच्या आजारासाठी वापरू नका.

केटो सोप वापरताना काय काळजी घ्यावी ?

-केटो सोप हे एक औषध आहे. त्यामुळे ते शिफारस केलेल्या डोसपेक्षा जास्त काळ वापरू नका. 

-तुम्हाला या औषधाची ऍलर्जी असल्यास तुमच्या डॉक्टरांना कळवा किंवा वापरल्यानंतर कळले की ऍलर्जी होतेय तर त्वरित त्याचा वापर बंद करा आणि डॉक्टरांना संपर्क करा.

-तुम्ही गर्भवती असाल किंवा स्तनपान करत असाल किंवा इतर कोणत्याही आजाराने ग्रस्त असाल तर केटो सोप वापरण्यापूर्वी याची माहिती डॉक्टरांना द्या. 

अधिक वाचा –

कोंडा का होतो आणि कशी सुटका मिळवावी

Read More From xSEO