सध्या लॉकडाऊनमुळे सगळ्या शो चे चित्रीकरण थांबवण्यात आले असून झालेले भाग पुन्हा दाखवण्यात येत आहेत. त्यामध्येच खतरों के खिलाडी असा शो आहे ज्याचे भाग कितीही वेळा लागले तरी आपण पाहू शकतो. यावर्षीच्या सीझनमध्ये सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे ते तेजस्वी प्रकाश या मराठमोळ्या चेहऱ्याने. तेजस्वीने तसे तर आतापर्यंत कोणत्याही मराठी चित्रपट अथवा मालिकांमध्ये काम केलेले नाही. मात्र हिंदी मालिकांमध्ये तिचा चेहरा चांगला परिचयाचा आहे. तेजस्वी खतरों के खिलाडीमध्येही बिनधास्त स्टंट वर स्टंट करून प्रेक्षकांचे मन जिंकून घेत आहे इतकं नाही तर आपल्या या स्वभावामुळे तिने रोहित शेट्टीलाही तिचा चाहता करून घेतले आहे. तेजस्वी प्रकाशला रोहित शेट्टीच्या चित्रपटात ब्रेक मिळाला असून तिने स्वतः याबद्दल सांगितले. इतकेच नाही तर या चित्रपटाचा फर्स्ट लुकदेखील तिने आपल्या इन्टा अकाऊंटवरून शेअर केला आहे.
‘खतरों के खिलाडी’ रोहित शेट्टीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन
तेजस्वीसाठी ही मोठी संधी
तेजस्वी अथवा या इंडस्ट्रीतील कोणत्याही अभिनेत्रीसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. रोहित शेट्टीच्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणं हे कोणत्याही अभिनेत्रीसाठी खास स्वप्नंच आहे आणि हे स्वप्नं तेजस्वीच्या बाबतीत खरं झालं आहे. तेजस्वीने फोटो शेअर करत लिहिले, ‘मी अतिशय नशीबवान आहे आणि मला अभिमान वाटतो की, रोहित शेट्टी हे माझे मार्गदर्शक आहेत. याचा मला अधिक अत्यानंद आहे की, आता मला रोहित शेट्टी यांच्या पहिल्या मराठी चित्रपटाची मुख्य अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.’ ‘स्कूल कॉलेज आणि लाईफ’ हे या चित्रपटाचे नाव असून रोहित शेट्टी या चित्रपटाचा निर्माता आहे. हा चित्रपट विहान सूर्यवंशीने दिग्दर्शित केला असून याचवर्षी हा चित्रपट प्रसिद्ध होणार आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळामुळे याची तारीख जरी जाहीर करण्यात आली नसली तरीही याचवर्षी हा चित्रपट प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. तेजस्वीने एका फोटोसह ही आनंदाची बाब शेअर केली. या फोटोमध्ये आपल्या सहकलाकाराचा हात तेजस्वीने पकडलेला दिसून येत आहे. तेजस्वीने हे शेअर केल्यानंतर तिच्यावर तिच्या चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटी कलाकारांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. या चित्रपटातून तिच्याबरोबर नवकलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
#KKK10 – ‘खतरों के खिलाडी’मध्ये यावेळी दिसणार 3 मराठमोळे चेहरे
तेजस्वीचा हा पहिलाच चित्रपट
तेजस्वी प्रकाश हे नाव मालिकांसाठी नक्कीच नवे नाही. स्वरांगिनी, संस्कार, पहरेदार पिया की, रिश्ता लिखेंगे नया हम, सिलसिला बदलते रिश्तों का यासारख्या बऱ्याच मालिकांमधून तेजस्वी झळकली आहे. तेजस्वी खऱ्या आयुष्यात नक्की कशी आहे ते सध्या खतरों के खिलाडीमधून दिसून येत आहे. मस्तीखोर आणि तितकीच बिनधास्त आणि कोणत्याही संकटाला न घाबरणारी तेजस्वी सध्या सगळ्याच प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहे. तर खतरों के खिलाडीच्या या सीझनमध्ये तेजस्वी नक्कीच फायनलिस्टच्या यादीत असणार असंही म्हटलं जात आहे. त्याशिवाय तिने हा शो यावर्षी जिंकला तर नक्कीच आश्चर्य वाटणार नाही. मुलांच्या तोडीला तोड देत प्रत्येक टास्क तेजस्वी पार पाडत आहे. तिच्या या बिनधास्तपणामुळे रोहित शेट्टीदेखील तेजस्वीचा चाहता बनला आहे. दरम्यान हा तेजस्वीचा पहिलाच चित्रपट असून मराठीतही ती पहिल्यांदाच काम करत आहे. तेजस्वी अगदी शो मध्ये देखील बऱ्याचदा मराठी बोलताना दिसून आली आहे. आता तिचे फिल्मी करिअर कसे असेल हे येत्या काळात कळेलच.
KKK10: खतरों के खिलाडीमध्ये तेजस्वी, धर्मेश आणि करणचा जलवा
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje