खतरों के खिलाडी' रोहित शेट्टीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

खतरों के खिलाडी' रोहित शेट्टीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

रोहित शेट्टी बॉलीवूडमधील मोठ्या दिग्दर्शकांपैकी एक मानण्यात येतो. गोलमाल, सिंघम सिरीजसाठी ओळखला जाणारा रोहित शेट्टी त्याचा रियालिटी शो ‘खतरों के खिलाडी’ साठी देखील प्रसिद्ध आहे. हा शो त्याच्याशिवाय अपूर्ण वाटतो. अॅक्शन आणि कॉमेडीचा अप्रतिम मेळ साधत रोहित शेट्टीचे चित्रपट प्रेक्षकांचं नेहमीच मनोरंजन करतात. पूर्ण मसाला चित्रपट आणि 100 टक्के मनोरंजन हा रोहितचा हातखंडा आहे. रोहितचा चित्रपट आणि गाड्या उडाल्या नाहीत असं कधीच होत नाही. रोहितंच गाडीप्रेम तर सर्वज्ञात आहे. सध्या यामुळेच रोहित चर्चेत आहे. खतरों के खिलाडी' रोहित शेट्टीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. असा तसा कोणताही विचार तुम्ही लगेच सुरू करू नका. रोहित शेट्टीने एक नवी कार विकत घेतली आहे. पिवळ्या रंगाची लंबोर्गिनीचं रोहितच्या घरी आगमन झालं आहे. इतकंच नाही या कारची किंमत साधारण 1 ते 3 कोटीच्या दरम्यान असल्याचंही सांगण्यात येत आहे. 

रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्ये 9 वर्षानंतर अक्षय आणि कॅट ही जोडी दिसण्याची शक्यता

गाडीच्या अधिकृत पेजवरून रोहितचा फोटो शेअर

रोहित शेट्टीचा लंबोर्गिनीसह एक फोटो या कंंपनीच्या अधिकृत पेजवरून शेअर करण्यात आला आहे. इतकंच नाही तर यामध्ये रोहित शेट्टीला एक असाधारण व्यक्ती म्हणूनदेखील या कंपनीने गौरवलं आहे. त्यांनी रोहित शेट्टीचा गाडीबरोबर फोटो शेअर करत एक कॅप्शन लिहिली की, ‘एका असाधारण व्यक्तासाठी त्याच्याप्रमाणेच असाधारण असलेली ही कार. लंबोर्गिनी मुंबईने भारतातील यशस्वी निर्मात्यांपैकी एक असणाऱ्या रोहित शेट्टी यांना ही कार डिलिव्हर केली आहे. गाडीचं हे डिझाईन संपूर्णतः रोहितच्या व्यक्तीमत्त्वाशी जोडलेलं आहे. फास्ट ड्राईव्हसाठी हे सर्वात चांगलं मॉडेल असून रोहितला नक्कीच याची गरज भासेल.’ रोहित शेट्टीचं गाडीप्रेम हे जगजाहीर आहे. त्यामुळे त्याला नक्कीच ही गाडी मिळाल्याचा आनंद झाला असेल. त्याने अजूनही याबद्दल काही शेअर केलं नसलं तरीही लवकरच त्याला त्याच्या गाडीबरोबर बघायला मिळेल असं त्याच्या चाहत्यांना वाटत आहे. 

रोहित शेट्टीच्या कुटुंबामध्ये झालं नव्या पाहुण्याचं आगमन

लवकरच येणार ‘खतरों के खिलाडी’

रोहित शेट्टी असलेला प्रत्येक ‘खतरों के खिलाडी’ चा सीझन तुफान चालला आहे. या शो ला नेहमीच टॉप टीआरपी मिळाला आहे. सध्या रोहित या शो मध्ये व्यस्त असून दुसऱ्या बाजूला अक्षयकुमारबरोबरील ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करण्यातही व्यग्र आहे. रोहित शेट्टीचा चित्रपट म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणीच. या चित्रपटामध्ये पुन्हा एकदा बऱ्याच वर्षानी अक्षयकुमार आणि कतरिना कैफ ही जोडी दिसणार आहे. शिवाय बाजीराव सिंघम असलेला अजय देवगण आणि संग्राम भालेराव असलेला रणवीर सिंहदेखील या चित्रपटात दिसतील. पुन्हा एकदा पोलिसांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट रोहित शेट्टी घेऊन येत असून हा चित्रपट पुढच्या वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित होईल. याशिवाय पुन्हा एकदा अजय आणि रणवीर सिंहचा सिंघम आणि सिम्बाचा सिक्वेन्स येणार का? याचीही उत्सुकता सध्या चाहत्यांमध्ये आहे. त्याची घोषणा रोहित शेट्टी नक्की कधी करणार असाही प्रश्न नेहमी त्याला विचारण्यात येतो. यावर्षी बल्गेरियामध्ये रियालिटी शो चं शूट झालं असून जानेवारीमध्ये हा शो प्रदर्शित होणार आहे. यावेळीदेखील तगडे स्पर्धक प्रेक्षकांना दिसणार असून पुन्हा एकदा रोहितचा अॅक्शनपॅक्ड अवतार या शो मध्ये नक्कीच दिसेल असाही विश्वास त्याचे चाहते व्यक्त करत आहेत.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.