DIY लाईफ हॅक्स

स्वयंपाक करताना असा करा गरम पाण्याचा वापर, वापरा या ट्रिक्स

Trupti Paradkar  |  Jan 28, 2022
kitchen hacks with warm water in Marathi

हिवाळा सुरू झाला की आपण थोडं कोमट पाणी पिण्याची स्वतःला सवय लावतो. कारण इनफेक्शन टाळण्यासाठी आणि शरीराला ऊब मिळण्यासाठी कोमट पाणी गरजेचं असतं. यासाठी जाणून घ्या दररोज गरम पाणी पिण्याचे फायदे (Warm Water Benefits In Marathi) यासोबतच कोमट पाण्याने अंघोळ केली की थंडी दूर जाते आणि शरीराला आराम मिळतो. मात्र या व्यतिरिक्त गरम पाण्याचा स्वयंपाक घरात तुम्ही अनेक ठिकाणी करू शकता. भांडी घासण्यासाठी, स्वयंपाकासाठी गरम पाण्याचा वापर केला तर तुमची स्वयंपाकघरातील कामं पटपट होतात. यासाठी जाणून घ्या कसा आणि कधी करावा स्वयंपाक घरात गरम पाण्याचा वापर

तेलकट भांडी स्वच्छ करण्यासाठी 

स्वंयपाक घरात सतत तेल, तूप, बटर अनेक गोष्टींसाठी वापरलं जातं. यामुळे स्वयंपाक घरातील भांडी तेलकट आणि चिकट होतात. अशी चिकट भांडी स्वच्छ करणं डोकेदुखीचं काम असतं. मात्र जर तुमच्या घरात सतत थोडं गरम पाणी करून ठेवलेलं असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. चिकट भांड्यात गरम पाणी टाकलं की अशी भांडी लवकर स्वच्छ होतात. शिवाय यामुळे तुम्हाला भांडी घासताना थंडी कमी वाजते. नळातून थंडगार पाणी येत असेल तर भांडी घासण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता. 

स्वयंपाकासाठी करा वापर

kitchen hacks with warm water in Marathi

भात, भाजी अथवा एखादी करी बनवताना तुम्ही थंड पाण्याऐवजी जर गरम पाणी स्वयंपाक करताना वापरलं तर तुमचा वेळ नक्कीच वाचू शकतो. झटपट स्वयंपाक करताना आधीच थोडं पाणी गरम करून ठेवत जा. ज्यामुळे जिथे तुम्हाला पाण्याचा वापर करायचा असेल तिथे कोमट पाणी वापरा. ज्यामुळे अन्नपदार्थ लवकर शिजतील आणि स्वयंपाकाचा वेळ वाचेल. डाळी अथवा कडधान्य लवकर भिजण्यासाठी तुम्ही थोडं कोमट पाणी वापरू शकता.  घाईच्या वेळी ही युक्ती तुमच्या नक्कीच मदतीची आहे.

Samosa Recipe In Marathi | खुसखुशीत आणि चविष्ट समोसा रेसिपीज मराठी

किचनचा ओटा आणि सिंक साफ करण्यासाठी

स्वयंपाक करताना स्वयंपाक घरातील स्वच्छता राखणंही तितकंच गरजेचं असतं. किचनचा ओटा, सिंक, किचन चिमणी, टाईल्स स्वयंपाक करताना चिकट होतात. यासाठीच या सर्व गोष्टी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता.

भाज्या, फळं स्वच्छ करण्यासाठी

कोरोनाच्या काळात आपण सर्व वस्तू स्वच्छ आणि सॅनिटाईझ करून घेतो. मात्र भाज्या आणि फळं कशी निर्जंतूक करायची हा मोठा प्रश्न सर्वांसमोर पडू शकतो. यासाठी तुम्ही कोमट पाण्यात मीठ टाकून भाज्या आणि फळं धुवू शकता. ज्यामुळे त्यावरील जीवजंतू आणि इनफेक्शन नष्ट होईल आणि या वस्तू खाण्यासाठी योग्य ठरतील.

नवीन भांड्याचे लेबल काढण्यासाठी

एखादं नवीन भांडे विकत घेतलं की त्यावर त्याच्या कंपनीचा ब्रॅंड असलेलं लेबल असतं. लेबल असंच काढलं तर ते नीट निघत नाही आणि त्याजागी लावलेला गोंद मुळे भांडे चिकट होते. यासाठी नवीन भांडी थोडावेळ गरम पाण्यात बुडवून ठेवा. ज्यामुळे सहज त्यावरील लेबल निघून जाईल. 

खमंग भाजणी थालीपीठ रेसिपीज (Thalipeeth Bhajani Recipe In Marathi)

Read More From DIY लाईफ हॅक्स