घर आणि बगीचा

वर्क फ्रॉम करताना स्वयंपाकघरातील काही ट्रिक्स येतील कामी

Dipali Naphade  |  Sep 23, 2020
वर्क फ्रॉम करताना स्वयंपाकघरातील काही ट्रिक्स येतील कामी

सध्या गेले सहा महिने घरातूनच बरेच जण काम करत आहेत. विशेषतः घरातून काम करताना सर्वात जास्त दमछाक होत आहे ती महिलांची. कामाची डेडलाईन, मुलांचा त्रास, स्वच्छता, घरात स्वयंपाक बनवणं या सगळ्यातून नक्की काम कसं करायचं याचं व्यवस्थापन करताना त्रास होत आहे. घरातील स्वयंपाक करताना अचानक काहीतरी ऑफिसचं काम येतं. मग अशावेळी हातात काही काम करायला घेतलं असेल तर ते पदार्थ काळे पडण्याची अथवा फोडणी जळण्याची कसलीही शक्यता असते. मग अशावेळी नक्की काय ट्रिक्स करायला हव्यात त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कारण याची सध्या सर्वात जास्त गरज आहे. त्यामुळे या सोप्या ट्रिक्स नक्कीच तुम्हाला उपयोग पडतील अशी आम्हाला आशा आहे.

बटाटे चिरताना मध्येच फोन आल्यास

Shutterstock

बटाटे चिरत असताना मध्येच फोन आल्यास आणि ऑफिसचा फोन टाळणं अशक्य असल्यास, तुम्ही चिरलेले अथवा कापलेल्या बटाट्याच्या फोडी या पटकन भांड्यात पाणी घेऊन त्यात टाकून ठेवाव्यात. त्यामुळे बटाटे काळे पडणार नाहीत आणि तुम्हालाही तुमचा कॉल घेऊन काम पूर्ण करता येईल. कारण बटाटे तसेच राहिले तर ते काळे पडतात आणि पुन्हा त्याचा मूळ रंग परत आणणं शक्य नसतं. त्यामुळे हा त्यावरील सोपा उपाय आहे.

मऊ चपात्या होण्यासाठी कशी भिजवावी कणीक, सोपी पद्धत

टॉमेटोची साल पटकन काढून हवी असल्यास

Shutterstock

बऱ्याचदा सूप करण्यासाठी अथवा घरात काही जणांना टॉमेटोची साल आवडत नसल्याने टॉमेटो सोलून हवे असतात. ऑफिसच्या कामात सहसा वेळ मिळत नाही आणि टॉमेटोची साल काढून टाकताना बराच वेळ जातो. मग अशावेळी तुम्ही केवळ 10-20 सेकंद पाणी गरम करून त्यात टॉमेटो टाका आणि लगेच त्यांना थंड पाण्यात टाका. त्याचे साल पटकन निघेल. साल काढायला तुम्हाला अजिबातच वेळ लागणार नाही आणि तुम्ही ऑफिसचं काम करता करता हे पटकन करू शकाल. 

पुदीना/कोथिंबीर ताजी ठेवण्यासाठी

बऱ्याचदा कामाच्या गडबडीत पुदीना अथवा कोथिंबीर आणल्यानंतर त्यात दिवशी वापरायची राहून जाते अथवा चटणी करायची राहून जाते. मग दुसऱ्या दिवशीपर्यंत अगदी फ्रिजमध्ये जरी हे ठेवलं तरी त्याची काही पानं खराब होतात आणि पुदीना अथवा कोथिंबीर ताजी राहात नाही. तुम्हाला जर दुसऱ्या दिवशीही हे ताजे राहायला हवे असेल तर फुलांप्रमाणे बाटलीमध्ये पाणी भरा आणि त्यात त्याचे देठ ठेऊन द्या. दुसऱ्या दिवशीही हे ताजेतवाने राहते. 

शेंगदाण्याची साले काढण्यासाठी सोपी ट्रिक

शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याची साले हाताने काढण्यासाठी वेळ नसेल तर तुम्हाला एक सोपी ट्रिक करता येईल. कापडी पिशवीत भाजलेले शेंगदाणे घाला आणि त्याला गाठ मारून जमिनीवर दोन ते तीन वेळा नीट आपटा. आपोआप सालं निघतील. पुन्हा फक्त शेंगदाणे ताटलीत घेऊन पाखडून घ्या. असं दोन वेळा केल्यास, शेंगदाण्याची सर्व सालं निघून जातात आणि तुमचा वेळही फुकट जात नाही. 

स्वयंपाकघरातील चिकट टाईल्स चमकविण्यासाठी सोप्या टिप्स

पटकन आमटी करण्यासाठी

Shutterstock

कुकरमधून डाळ शिजून येईपर्यंत वेळ असतो. डाळ काढून मग आमटीची तयारी करत बसण्यापेक्षा कुकर लावल्यावर लगेचच एका बाजूला दुसऱ्या पातेलीत पाणी आणि त्यात आमटीसाठी लागणारे सर्व साहित्य घालून उकळून घ्यायचे आणि डाळ शिजल्यावर लगेच त्यात घालून मिक्स करून वरून फोडणी द्यायची. याची चवही वेगळी लागते आणि तुमचा आमटी बनविण्याचा वेळही वाचतो. 

जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल तर या ’20’ किचन ट्रीक्स आणि टीप्स नक्कीच उपयोगी पडतील (Kitchen Tips In Marathi)

लसणीची सालं पटकन काढण्यासाठी

Shutterstock

बऱ्याचदा लसणाची सालं काढण्यासाठी खूप वेळ जातो. तुम्हाला जर पटकन लसणाची सालं काढून हवी असतील तर तुम्ही लसणीच्या पाकळीच्या मागच्या बाजूला सुरीने कापा. साल पटकन निघण्यास मदत मिळते. त्यामुळे वेळही वाचतो आणि सालंही पटकन निघतात. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From घर आणि बगीचा