DIY सौंदर्य

ब्लीचबद्दल मुलींच्या मनात असतात हे गैरसमज, जाणून घ्या

Dipali Naphade  |  Jul 27, 2021
myths related bleach

काही महिलांना चेहऱ्यावरील केसांपासून सुटका तर हवी असते पण त्यांना थ्रेडिंग, प्लकिंग अथवा वॅक्सिंग हा पर्याय नकोसा वाटतो आणि त्यामुळे चेहऱ्यावरील केस लपविण्यासाठी ब्लीचिंग अर्थात ब्लीचचा (bleaching on face) पर्याय काही महिला अवलंबतात. ब्लीच तुमच्या चेहऱ्यावरील केस काढून टाकत नाही पण या केमिकल ट्रिटमेंटमुळे तुमच्या चेहऱ्यावरील केसांचा रंग बदलण्यास याची मदत मिळते. ब्लीच केल्याने वास्तविक नेहमी ब्लीच करणे चांगले समजण्यात येत नाही. आपल्या चेहऱ्याची त्वचा ही अत्यंत नाजूक असते त्यामुळे सतत त्यावर केमिकल ट्रिटमेंट करणे हानिकारक ठरू शकते. त्यामुळेच बरेचदा त्वचेवर जळजळ आणि अलर्जीसारख्या समस्या होतात. पण अशा समस्या असूनही काही महिला चेहरा चमकदार करण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर ब्लीच करून घेतात. तर काही जणींना ब्लीचबद्दल अनेक गैरसमज असतात. हे गैरसमज नक्की काय आहेत आणि त्याबाबत नक्की काय खरे आहे हेच आम्ही या लेखातून तुमच्यासमोर आणणार आहोत. 

पहिला गैरसमज – ब्लीचमुळे कोणतेही नुकसान होत नाही

face bleaching – Freepik

काय आहे सत्यता – काही महिलांना वाटते की, ब्लीचमुळे त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही. त्वचेवर कोणतेही रॅश अथवा खाज आली तर ते केवळ तात्पुरते असते. त्यामुळे याची जास्त काळजी करायची गरज नाही. पण असे अजिबातच नाही. तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण ब्लीचमध्ये सोडियम हायपोक्लोराईट असते जे आपल्या त्वचेवर केमिकल रिअॅक्शन येण्याचे कारण बनते. यामुळे त्वचेवर अनेक दुप्षपरिणाम होताना दिसून येतात. इतकंच नाही तर महिला पार्लरमधून ब्लिचिंग करून बाहेर येतात. पण लगेच सूर्याच्या किरणांच्या संपर्कात येणे त्यांच्या त्वचेसाठी हानिकारक ठरते. कारण यामुळे जळजळ आणि पिगमेंटेशनच्या समस्येला सामोरे जावे लागते.

दुसरा गैरसमज – पॅच टेस्टची गरज नाही

काय आहे सत्यता – हा एक असा नियम आहे जो कोणत्याही नव्या त्वचेच्या उत्पादनाचा वापर करताना फॉलो करणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या त्वचेवर कोणते उत्पादन कशाप्रकारे परिणाम करेल हे लगेच कळत नाही. त्यामुळेच पॅच टेस्ट वापरण्याआधी करून घ्यायला हवी. ब्लीचच्या बाबतीत तर हे अधिक आवश्यक आहे. बऱ्याचदा ब्लीचमध्ये असणारे केमिकल्स आपल्या त्वचेवर अत्यंत वाईट परिणाम करतात आणि त्वचेला हानी पोहचते. त्यामुळे तुम्ही प्रत्येकवेळी वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घेण्याची आवश्यकता आहे. तसंच पॅच टेस्ट केल्यानंतर ती जागा व्यवस्थित स्वच्छ करायला विसरू नका. 

तिसरा गैरसमज – ब्लिचिंग आपल्या त्वचेला अधिक उजळपणा देते 

Freepik

काय आहे सत्यता – ब्लीचबाबत हा अत्यंत प्रसिद्ध असा गैरसमज आहे. वास्तविक ब्लिचिंग केल्यानंतर त्वरीत त्वचेमध्ये फरक दिसून येतो आणि त्यामुळेच अनेक महिलांना वाटतं की, सतत ब्लीचचा वापर केल्याने त्यांच्या त्वचेमध्ये अधिक उजळपणा येऊ शकतो. परंतु असे अजिबात नाही. तुम्हाला हे कळायला हवं की, ब्लीच केवळ तुमच्या चेहऱ्यावर वरील भागावर काम करते आणि स्किन टॅन, चेहऱ्यावर मुरूमं येणे, पिगमेंटेशन, डाग यावर त्याचा परिणाम होत नाही. पण तुमच्या त्वचेच्या रंगामध्ये फरक आणण्यासाठी याचा उपयोग होत नाही. त्यामुळे तुम्ही कितीही वेळा ब्लीचचा वापर केलात तर तुमचा रंग उजळत नाही. 

अधिक वाचा –

चौथा गैरसमज – ब्लीच क्रिम सर्व काही एकसमान असतात 

काय आहे सत्यता – असे अजिबातच नाही. बाजारामध्ये अनेक ब्रँड्सचे ब्लीच उपलब्ध आहेत. इतकंच नाही तर अनेक प्रकारचे ब्लीच एकाच ब्रँडमध्येही मिळतात. प्रत्येक ब्लीचच्या लेबलवर तुम्ही व्यवस्थित पाहिले तर यामध्ये वेगवेगळ्या घटकांचा वापर करण्यात आलेला तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे प्रत्येक ब्लीच हे वेगवेगळ्या प्रकारे आपल्या त्वचेवर काम करते. यामध्ये मॉईस्चराईझिंग ऑईलचाही वापर करण्यात येतो. जे तुमच्या त्वचेवर होणारी जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे सर्व ब्लीच क्रिम हे एकसमान नसतात. त्याचा वेगवेगळा उपयोग असतो हे जाणून घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य