कॅज्युअल लुक्समध्ये (Casual Look) महिलांना वेगवेगळे लुक्स करण्याच्या अनेक संधी असतात. मात्र जेव्हा ऑफिसमध्ये कोणते कपडे घालायचे असा प्रश्न निर्माण होतो तेव्हा मात्र सतर्क राहावं लागतं. काही ऑफिसचे कपड्यांचे असे वेगळे नियम असतात. विशेषतः कॉर्पोरेट ऑफिसमध्ये (Corporate Office). तुम्ही कोणतेही कपडे घालून ऑफिसमध्ये नक्कीच जाऊ शकत नाही. याचा थेट परिणाम तुमच्या प्रोफेशनल इमेजवर होत असतो. साधारणतः आपलं शरीर कसं आहे याप्रमाणेच ऑफिसमध्ये जाताना कपडे घालावे लागतात. बारीक मुलींना कपड्यांची फॅशन करण्यासाठी बरेच पर्याय असतात. पण त्रास होतो तो प्लस साईज (Plus size) असणाऱ्या महिलांना. रोज सकाळी ऑफिसला जाताना नक्की काय घालायचं आणि कॉर्पोरेट लुकमध्ये आपण विचित्र तर दिसणार नाही ना याचा विचार करावाच लागतो.
काही महिला आपल्या शरीराचा आकार लपविण्यासाठी काही निवडक कपड्यांचा पर्याय निवडतात. त्यामुळे त्यांचा तोच तोच लुक पाहूनही स्वतःलाच कंटाळा येतो. याचा परिणाम त्यांच्या स्वतःच्या कामावर आणि मनावरही होत असतो. पण तुम्हाला डोक्याला ताप करून घेण्याची गरज नाही. असे अनेक आऊटफिट्स आहेत ज्यामुळे तुम्ही सुंदरही दिसू शकता आणि ऑफिसमध्ये घालणे सोपे होते. प्लस साईज महिलांसाठी काही सोपे पर्याय जाणून घेऊया.
बिझनेस सूट (Business Suit)
तुम्ही जर प्लस साईज असाल पण तुम्हाला आपल्या ऑफिसमध्ये बॉस लुक हवा असेल तर तुम्ही बिझनेस सूटचा नक्की विचार करू शकता. तुमचा बिझनेस सूट हा योग्यरित्या शिवलेला असेल याची तुम्ही काळजी घ्या. तुमच्या शरीरानुसार, बिझनेस सूट सैलसर अथवा टाईट असा ठेवू नका. योग्य स्टिचिंग असेल तरच तुम्हाला हा लुक अधिक स्मार्ट दर्शवू शकतो. याशिवाय तुम्ही एक साधा आणि स्मार्ट पॅटर्नचा बिझनेस सूट (Business suit) निवडा ज्यावर कमी डिझाईन असेल. हा तुम्हाला प्रोफेशनल लुक मिळवून देतो आणि शरीरावरील अतिरिक्त जाडीदेखील दिसून येणार नाही. तसंच काळ्या रंगाशिवाय तुम्ही अन्य गडद रंगाचे बिझनेस सूटदेखील घालू शकता.
अधिक वाचा – साडी नेसताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी, मिळवा परफेक्ट लुक
पेन्सिल स्कर्ट (Pencil Skirt)
तसं तर महिला अनेक प्रकारचे स्कर्ट घालतात, पण तुम्हाला ऑफिससाठी स्कर्ट हवा असेल तर तुम्ही पेन्सिल स्कर्ट नक्की ट्राय करा. हा स्कर्ट तुमच्या शरीराचे कर्व्ह्स योग्य स्वरूपात दाखवण्यास मदत करतो. तसंच याशिवाय तुम्हाला अधिक प्रोफेशनल लुक मिळवून देतो. तुम्ही जर प्लस साईज असाल तर आपल्या ऑफिसमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही शर्ट आणि पेन्सिल स्कर्ट घाला. तसंच यासह तुम्ही ब्लेझर लेअर करू शकता. तुम्ही असा पेन्सिल स्कर्ट घाला जो तुमच्या ढोपराच्या वर असू शकतो आणि शर्ट इन करू शकता. जेणेकरून तुमचा लुक अधिक व्यावसायिक दिसून येतो.
अधिक वाचा – प्लस साईज कपड्यांची खरेदी करताना लक्षात ठेवा 11 Tips!!!
ए लाईन ड्रेस (A Line Dress)
प्लस साईज महिलांवर ए लाईन ड्रेस खूपच चांगला दिसतो. या ड्रेसमध्ये महिला अधिक उठावदार आणि आकर्षक दिसतात. इतकंच नाही तर तुम्ही या ड्रेसमध्ये तुमची जाडी लपवू शकता. तुम्ही ऑफिसमध्ये केवळ कॅज्युअलच नाही तर ए लाईन ड्रेसचा वापर करू शकता. जर ऑफिसमध्ये ए लाईन ड्रेस घालायचा असेल तर तुम्ही प्रयत्न करा की, त्यामध्ये एम्रॉयडरी असू नये. याशिवाय ए लाईन ड्रेसचा स्मार्ट लुक कॅरी करण्यासाठी तुम्ही यासह बारीक बेल्टचा वापरही करू शकता.
घाला कुरती (Wear Kurti)
तुम्ही ऑफिसमध्ये जर सेमी फॉर्मल (Semi Formal) अथवा एथनिक कपडे (Ethnic Cloths) घालणार असाल तर तुम्ही कुरतीचा वापर करावा. सर्वात महत्वाचे म्हणजे प्लस साईज महिला कुरतीमध्ये अधिक बारीक दिसतात. तसंच यासह तुम्ही जीन्स, लेगिन्स अथवा ट्राऊझर्स पँटचा उपयोग करावा. यामुळे तुमचा लुक अधिक खास दिसून येतो.
अधिक वाचा – प्लस साईज फॅशनबाबत तुमच्या मनात असू शकतात हे गैरसमज
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक