DIY फॅशन

कुरता आणि कुरतीमध्ये नक्की फरक काय आहे, माहीत आहे का तुम्हाला

Dipali Naphade  |  Mar 6, 2022
know-the-difference-between-kurta-and-kurti

कुर्ता (कुरता) आणि कुर्ती (कुरती) हे खरं तर वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे आहेत. मात्र यातला फरक अनेक जणांना कळत नाही. फॅशन ट्रेंडप्रमाणे यामध्ये अनेक बदल झाले आहेत. कुरता असो वा कुरती दोन्ही घालणे अत्यंत आरामदायी असते. पण यातील फरक बऱ्याच जणांना कळत नाही. तुम्हाला वाटेल की, हे असं कसं होऊ शकतं. आतापर्यंत आपण सगळ्यालाच कुरता अथवा कुरती असं म्हणत आलो आहोत. पण कुर्ता आणि कुर्ती हे दोन्ही वेगळे आहेत. यातील फरक आम्ही या लेखातून तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही नक्की कुर्ता घालताय की कुर्ती हे तुम्हीही जाणून घ्या. 

कुर्ता (Kurta)

Kurta

तुम्ही कुर्ता तर नेहमी घातला असेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, कुर्ता आणि कुर्ती या दोन वेगवेगळ्या स्टाईल आहेत आणि यातील वेगळेपणा नक्की कसा ओळखायचा? तर कुर्ता हा कॉलरशिवाय असतो आणि सैलसर असतो, जो तुमच्या गुडघ्याच्या वरपर्यंत असतो. कॅज्युअल, पारंपरिक आणि आरामदायी कपड्यांच्या स्वरूपात कुर्ता ही स्टाईल दिसून येते. अधिक प्रमाणात कुर्ते हे सिल्क अथवा कॉटनच्या कपड्यांमध्ये बनविण्यात येतात. 

तुम्ही जर ऑफिसला जाण्यासाठी अथवा कोणत्याही पार्टीला जाण्यासाठी कपडे निवडत असाल तर तुम्हाला नक्की कुर्ता स्टाईल वापरता येते. जीन्स अथवा बेल बॉटम जीन्स आणि सलवार, पटियाला यासह तुम्ही कुर्ता स्टाईल करू शकता. ऑफिसमध्ये घालून जाण्यासाठी ही उत्तम स्टाईल आहे. त्याशिवाय तुम्हाला आज नक्की काय घालायचं असा प्रश्न पडला असेल तेव्हा तुम्ही पर्याय म्हणून कुर्ता निवडू शकता. 

कुर्ती (Kurti)

Kurti

कुर्ती म्हणजे स्लाईड स्लिटमध्ये असणाऱ्या आणि कंबरेच्या वरपर्यंत याची उंची असते. याशिवाय यामध्ये मिड्रिफ असते. सर्वात जास्त उत्तरेकडे प्रसिद्ध असणारी ही कुर्ती वेगवेगळ्या स्टाईलची असते. पंजाबी कुर्ती, बिहारी कुर्ती, उत्तर प्रदेश, सिंध, गुजरात आणि राजस्थान या ठिकाणीची विविधता घेऊन कुर्ती बनविण्यात येते. याशिवाय व्ही नेक, बोट नेक, मँडरिन कॉलर, किहोल आणि ऑफशोल्डर अशा वेगवेगळ्या स्टाईलच्या आणि कॉलर्सच्या कुर्ती आपल्याला बाजारात उपलब्ध आहेत. लिनन, रेशम, कपास आणि शिफॉन या कपड्यांचा वापर करून कुर्तीची स्टाईल शिवण्यात येते. 

कोणत्याही पारंपरिक कार्यक्रमाला अथवा पूजेमध्ये तुम्ही जाणार असाल, तर कुर्ती हा उत्तम पर्याय आहे. कुर्ती दिसण्यात अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसते आणि याखाली सलवार पटियाला असा वेगवेगळा पर्याय घालण्यासाठी निवडू शकता. 

कुर्ता आणि कुरतीमध्ये काय आहे समान 

कुर्ता आणि कुर्तीमधील फरक 

स्टायलिंग टिप्स 

Styling tips

आम्ही सांगितलेला फरक आता तुमच्या लक्षात आला असेलच. तुम्हीही तुमच्या स्टाईलमध्ये आता कुर्ता आणि कुर्तीचा समावेश अशा पद्धतीने करून घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन