DIY सौंदर्य

अंडरआर्म्स शेव्ह करताना Do’s आणि Don’t ची घ्या काळजी

Dipali Naphade  |  Dec 20, 2021
know-the-dos-and-donts-of-shaving-your-underarms

अंडरआर्म्स (Underarms) हा आपल्या शरीराचा नक्कीच संवदेनशील भाग आहे आणि शरीरावर अन्य भागांपेक्षा लवकर केस वाढतात आणि त्यामुळे हे केस लवकर शेव्ह करावे लागतात आणि लवकर क्लिन (underarms cleaning) करावे लागतात. तसे तर अंडरआर्म्समधील केस काढण्यासाठी अनेक तऱ्हेच्या पद्धती आहेत. पण अनेक महिला अशाही आहेत ज्या अंडरआर्म्स करण्यासाठी वॅक्सिंग अथवा अन्य गोष्टी करण्यासाठी घाबरतात अथवा कचरतात. कारण वॅक्सिंग करताना होणारा त्रास त्यांना सहन होत नाही. तर शेव्ह केल्यानंतर अनेकदा काखेच्या खालचा भाग काळा पडतो. पण तरीही अंडरआर्म्स शेव्ह करणे अनेक महिलांना जास्त सोपे, सुरक्षित आणि वेदनाविरहीत वाटते. पण अंडरआर्म्स शेव्ह करताना काही गोष्टींची खास काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा हा भाग काळा होतो. तुमच्यासह असे होऊ नये यासाठी तुम्ही Do’s आणि Dont’s ची काळजी घ्या. काय आहेत नक्की Do’s आणि Dont’s जाणून घ्या. 

अंडरआर्म्स व्यवस्थित धुवा (Wash the underarms)

तुम्ही जर अंडरआर्म्स शेव्ह करण्याचे ठरवले असेल तर तुम्ही सर्वात पहिले त्यावर साबण लावणे गरजेचे आहे. यावर माईल्ड साबणाचा (mild soap) अथवा बॉडी वॉशचा वापर करावा. त्यानंतर गरम पाण्याचा वापर करून हे धुवा. तुमचे अंडरआर्म्स आपल्या शरीराच्या बाकी भागाच्या तुलनेत अधिक घाम उत्पन्न करतात. याशिवाय काखेमध्ये घामाचा दुर्गंध अथवा रोल-ऑनचे बारीक कणदेखील राहू शकतात. त्यामुळे केस काढण्याच्या या प्रक्रियेच्या रस्त्यात या गोष्टी येऊ शकतात. तसंच शेव्हिंग केल्याने या भागात जळजळ होण्याची शक्यताही असते. त्यामुळे अंडरआर्म्स शेव्हिंग आंघोळीच्या नंतर करणे अधिक योग्य ठरते.

अंडरआर्म्स असावेत ओले (Underarms should be wet)

तुम्ही जर रेजरचा उपयोग करत असाल आणि आपले अंडरआर्म्स शेव्ह करणार असाल तर कधीही सुक्या अंडरआर्म्सवर याचा उपयोग करू नका. कारण यामुळे फ्रिक्शन आणि इरिटेशन अधिक होते. तुम्ही शॉवरच्या घेताना अंडरआर्म्स शेव्ह करा. कारण त्यावेळी गरम पाणी आणि पाण्यामुळे त्वचा हायड्रेटेड असते आणि शेव्ह करताना त्रास होत नाही. तसंच अंडरआर्म्स करणे अशावेळी अधिक सोपे ठरते. जर तुम्ही वॅक्सिंग करणार असाल तर मात्र तुमचे अंडरआर्म्स सुके असणे गरजेचे आहे हे लक्षात ठेवा.

चुकीच्या दिशेने शेव्ह करू नका (Do not use wrong direction)

घरी अंडरआर्म्समधील केस शेव्ह करणे अथवा वॅक्स करणे हे काही मोठे काम नाही. केवळ याची योग्य पद्धत वापरणे माहीत असायला हवे. तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्ही हेअर ग्रोथ (Hair Growth) च्या विरूद्ध दिशेला तुम्ही शेव्ह केल्याने तुम्हाला चांगला परिणाम मिळेल, तर तुम्ही नक्कीच चुकीचे आहात. त्यामुळे नेहमी शेव्ह करताना हेअर ग्रोथची दिशा बघून मगच अंडरआर्म्स शेव्ह करा अथवा वॅक्स करा. अशा पद्धतीने अंडरआर्म्स शेव्हिंग करणेही सोपे होईल आणि तुमच्या त्वचेलाही काहीही त्रास होणार नाही. 

अंडरआर्म्स करताना काय गोष्टी करायला हव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्या हे तुमच्या त्वचेची काळजी अधिक घेण्यासाठी महत्त्वाचे आहे. तुम्ही घरीच अंडरआर्म्स शेव्ह करणार असाल तर या गोष्टींची काळजी तुम्ही नक्की घ्या. तर अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी काही झटपट उपायदेखील आहेत. तेदेखील तुम्ही नंतर वापरू शकता. 

Read More From DIY सौंदर्य