मनोरंजन

गानसम्राज्ञी लतादीदींना अजूनही काही काळ ठेवणार आयसीयुमध्ये, डॉक्टरांची माहिती

Dipali Naphade  |  Jan 16, 2022
गानसम्राज्ञी लतादीदींना अजूनही काही काळ ठेवणार आयसीयुमध्ये, डॉक्टरांची माहिती

काही दिवसांपूर्वीच गानसम्राज्ञी आणि जागाच्या लाडक्या दीदी अर्थात लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना कोरोना (Corona) झाल्यामुळे ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार चालू असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. इतकंचन नाही तर अजून काही काळ त्यांना आयसीयूमधून हलविण्यात येणार नाही असं डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यामुळेच काळजी घेण्यासाठी त्यांना पुढील काही दिवस आयसीयुमध्येच ठेवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या बातम्या पसरवू नयेत अशी विनंतीही करण्यात आली आहे. 

अधिक वाचा – इंद्रा आणि दिपूच्या नात्यात ट्विस्ट, सानूसोबत लागणार इंद्राचं लग्न

डॉक्टरांनी दिली माहिती 

Lata Mangeshkar – Instagram

ब्रीच कँडी रूग्णालयात (Breach Candy Hospital) गेल्या काही दिवसांपासून डॉ. प्रतित समदानी (Dr. Pratit Samdani) हे लतादीदी यांच्यावर उपचार करत आहेत. त्यांच्या देखरेखीखाली लतादीदींच्या तब्बेतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले आहे. डॉक्टर त्यांची योग्य काळजी घेत असून त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. मात्र त्यांना भेटण्याची कोणालाही परवानगी नाही हेदेखील त्यांनी एएनआयशी बोलताना स्पष्ट केले आहे. त्यामुळे चाहत्यांचा जीव आता नक्कीच भांड्यात पडला असणार. लतादीदींच्या प्रकृतीची सर्वांनाच काळजी लागून राहिली आहे. मात्र आता डॉक्टरांनी स्वतः याबाबत स्पष्टीकरण दिले असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याचेही सांगितले आहे. तसंच त्यांच्या आरोग्याविषयी उलटसुलट चर्चा करू नये अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली आहे. तसंच त्यांच्यावर योग्य उपचार होत असून त्या उपचारांना व्यवस्थित दुजोरा देत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या बाबतीत घाबरून जाण्याचीही गरज नाही असेही यावेळी डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे चाहत्यांना आता जास्त काळजी करण्याची गरज नाही. 

अधिक वाचा – टिकटॉक फेम सूरज चव्हाण झळकणार चित्रपटात, “का रं देवा” चित्रपटातून भेटीला

कोरोनासह न्यूमोनियाचीही लागण 

एका हिंदी वृत्तपत्राने जाहीर केलेल्या माहितीनुसार लतादीदी या कोरोनासह न्यूमोनियाशीही झुंज देत आहे. लतादीदींचे वय अधिक आहे. त्यामुळे त्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी नाही. याशिवाय दोन वर्षांपूर्वीही लतादीदींना न्यूमोनिया झाला होता आणि त्यावेळी साधारण 28 दिवसांनी त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. 

याशिवाय गायक अनुप जलोटा (Anup Jalota) यांनी दिलेल्या माहितीनुसार, वयोमानानुसार लतादीदींना लवकर संसर्ग होतो त्यामुळे त्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी नाही. गेल्यावेळी रूग्णालयातून घरी आल्यापासून त्या केवळ आपल्या खोलीतच असायच्या. बाहेरच्या कोणालाही त्या भेटलेल्या नाही. अनेकदा त्यांच्याशी फोनवरून संपर्क आम्ही करतो असंही त्यांनी सांगितले आहे. आताही कोरोना झाला असून घाबरण्यासाठी काहीही नाही. त्यांना लवकर बरे वाटावे आणि योग्य काळजी घेतली जावी यासाठीच रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या चाहते लतादीदींना लवकर बरे वाटावे यासाठीच प्रार्थना करत आहेत. तर लवकरात लवकर लतादीदी बऱ्या होऊन घरी परताव्या अशीही इच्छा सर्वांनी सोशल मीडियावरही व्यक्त केली आहे. तसंच लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी अनेक ठिकाणी चाहते प्रार्थनाही करत आहेत. 

अधिक वाचा – कडक उपवासानंतर अजय देवगणने घेतलं सबरीमाला मंदिरात अय्यपाचं दर्शन

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन