Diet

लिक्विड डाएटच्या मदतीने महिन्याभरात करा वजन कमी

Trupti Paradkar  |  Aug 11, 2020
लिक्विड डाएटच्या मदतीने महिन्याभरात करा वजन कमी

वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. आहारातून वजन कमी करण्यासाठी लिक्विड डाएट हा एक सोपा पर्याय आहे. या डाएटने पंधरा ते तीस दिवसांमध्ये तुमचे किमान दहा किलो वजन कमी होऊ शकते. लिक्विड डाएट म्हणजे फक्त पाणी किंवा  जलयुक्त आहार घेणे. तुम्ही दोन जेवणापैकी एकावेळी फक्त सूप, पेज, रस अथवा स्मूदी असं काहीतरी यातून घेऊ शकता. यामुळे तुमच्या शरीरात कमीतकमी  कॅलरीज जातात आणि तुमचे वजन लवकर कमी होते. बऱ्याचदा डॉक्टर अपचनाच्या समस्या असलेल्या लोकांना अथवा शस्त्रक्रिया झालेल्या लोकांना लवकर बरं होण्यासाठी काही दिवस हे डाएट घेण्याचा सल्ला देतात. मात्र तज्ञ्जांच्या सल्ल्याशिवाय हे डाएट घेण्यापूर्वी तुम्हाला याच्या चांगल्या आणि वाईट परिणामांविषयी माहीत असायला हवं. कारण जर तुमच्या शरीराला हे डाएट सूट झालं नाही तर तुम्हाला  याचा त्रासही होऊ शकतो. कारण तुमचे वजन, शारीरिक स्थिती, आरोग्य समस्या यासर्वांचा याबाबत आधीच विचार करणे गरजेचं आहे. 

Shutterstock

लिक्विड डाएटचे काही प्रकार

सुरूवातील तुम्हाला लिक्विड डाएट करणं थोडं कठीण वाटू शकतं. म्हणूनच जर महिनाभर पूर्णपणे लिक्विड डाएट करणं तुम्हाला जड वाटत असेल तर तुम्ही हे खाली दिलेले प्रकार यासाठी निवडू शकता. पण कोणताही डाएट करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

डिटॉक्स अथवा क्लिंझिंग लिक्विड डाएट –

सध्या डिटॉक्स डाएट खूपच लोकप्रिय डाएट बनत चालले आहे. कारण यामुळे तुमचे संपूर्ण शरीरच डिटॉक्स होते. महिन्यातच काय अगदी काही दिवसांमध्ये अथवा आठवड्यातच तुम्हाला या डाएटचा परिणाम जाणवू लागतो. डिटॉक्स डाएटसाठी तुम्हाला फक्त फळांचा अथवा भाज्यांचा  ज्यूस अथवा स्मूदी दिवसभर घ्यायची आहे. चवीसाठी तुम्ही या स्मूदीमध्ये मसाले अथवा तुमच्या आवडीचे हर्ब्स टाकू शकता. मात्र साखर अथवा मीठ यामध्ये टाकल्यामुळे तुम्हाला हवा तसा परिणाम मिळणार नाही. या रसांमुळे तुमचे वजनच कमी होईल असं नाही तर तुम्हाला दिवसभर फ्रेशही वाटेल. 

Shutterstock

मील रिप्लेसमेंट लिक्विड डाएट –

मील रिप्लेसमेंट लिक्विड डाएटमधून तुमच्या शरीराला कमी प्रमाणात कॅलरिज मिळतात आणि याचा परिणाम तुमच्या संपूर्ण आरोग्यावर जाणवतो.या डाएटसाठी बाजारात तयार उत्पादने मिळतात. ज्यांच्यामध्ये प्रोटिन्स आणि फायबरचे प्रमाण जास्त आणि फॅट्स कमी  असतात. तुम्ही तुम्हाला दोन जेवणाच्या मध्ये जेव्हा जेव्हा भुक लागेल तेव्हा तेव्हा तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता. तुम्ही हे शेक्स अथवा ज्युस तुमच्या नाश्ता अथवा जेवणाच्यावेळीही घेऊ शकता. या उत्पादनांची निर्मिती खास तुमच्या सॉलिड अन्नपदार्थांना पर्याय ठरावी अशी केलेली असते.

मेडिकल लिक्विड डाएट –

मेडिकल डाएट हे वजन कमी करण्यासाठी नसून काही खास रूग्ण अथवा आरोग्य समस्यांसाठी आहे. हे डाएट तुम्ही फक्त तुमच्या डॉक्टरांच्या सल्लानुसारच घेऊ शकता. शस्त्रक्रिया अथवा एखाद्या आरोग्य समस्येतून बाहेर पडण्यासाठी डॉक्टर तुम्हाला लिक्विड डाएट करण्यासाचा सल्ला देतात. ज्यामध्ये तुम्हाला काही काळासाठी फक्त पाणी, सफरचंदाचा रस एखादे सिरप अथवा चहा घेण्यास सांगण्यात येते.

Shutterstock

सूचना – जर तुम्हाला लिक्विड डाएट करण्याची इच्था असेल तर तुम्ही आधी एक ते दोन दिवस डिटॉक्ट डाएट करून पाहू शकता. तुम्हाला झेपत असेल तर ते पुढे सुरू ठेवा. वजन कमी करण्यासाठी महिनाभर जर तुम्ही मील रिप्लेसमेंट लिक्विड डाएट केले जर चांगला परिणाम होऊ शकतो.  शिवाय गरोदर महिला, स्तनपान देणाऱ्या महिला, लहान मुले आणि वृद्धांनी हे डाएट मुळीच करू नये. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा –

सायकल चालवण्याचे फायदे वाचाल तर थक्क व्हाल (Benefits Of Cycling in Marathi)

सगळे करुन झाले पण पोटाचा घेर होत नाही कमी, जाणून घ्या कारण

कंबरेवरील चरबी करायची असेल कमी तर प्या लवंगेचे पाणी

Read More From Diet