घर आणि बगीचा

घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य आणतील हे (Lucky Plants Bring Happiness In Marathi)

Dipali Naphade  |  Sep 23, 2019
घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य आणतील हे (Lucky Plants Bring Happiness In Marathi)

आपल्याकडे नेहमीच निसर्गाला देवाचं रूप मानण्यात येतं. आपल्याला आयुष्यात ज्याप्रमाणे अन्न, पाणी आणि हवा या गोष्टींंची जगण्यासाठी गरज असते.  तसंच आपल्या आजूबाजूला हिरवळ अर्थात झाडं असणंही तितकंच गरजेचं आहे. कारण झाडांशिवाय शुद्ध हवा मिळणं अशक्य आहे. असं म्हटलं जातं की, घराच्या आसपास झाडंझुडपं असतील आणि हिरवळ असेल तर त्या घरापासून आजार लांब राहतात. पण प्रत्येकाच्या घराजवळ झाडंझुडपं असणं शक्य नाही. शहारांमध्ये तर फारच कमी ठिकाणी झाडं दिसतात. पण तुम्हाला माहिती आहे का? यापैकी काही झाडं आपल्या घरांमध्ये असणं हे आपल्यासाठी चांगलं असतं. घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य टिकून राहण्यासाठी घरात कोणती झाडे लावावी? त्या झाडांचं घरात असणं शुभ कसं मानलं जातं. या झाडांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा तर राहातेच त्याशिवाय तुम्हाला कायमस्वरूपी शुद्ध हवा मिळते. अशाच काही झाडांविषयी माहिती घेऊया. 

घरामध्ये झाडं लावण्याचे महत्त्व (Importance Of Plants At Home)

झाडं घरामध्ये लावणं हे शुभं मानलं जातं. आपल्या सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये जर आपल्याला व्यवस्थित राहायचं असेल झाडांची खूपच गरज आहे. वातावरणामध्ये असलेलं प्रदूषण कमी करण्यासाठी झाडांची मदत होते. यापासून मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला झाडांची गरज भासते. आपल्याला माहीत आहे की, बरीच झाडं आहेत जी रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात आणि दिवसा ऑक्सीजन पण काही इनडोअर झाडं अशीही आहेत जी रात्रीदेखील ऑक्सीजन वायू सोडतात. त्यामुळे अशी झाडं घरामध्ये असलेली अत्यंत चांगली. काही झाडं ही दूषित वायूलाही शुद्ध बनवतात. त्यामुळे घरामध्ये हवा शुद्ध ठेवण्यासाठी अशा झाडांचा उपयोग करून घेता येतो. 

तसंच तुळस, मोगरा, आवळा अशी झाडं ही सकारात्मक ऊर्जा घरात निर्माण करतात असं म्हटलं जातं. यामध्ये अनेक मनीप्लांटचाही समावेश आहे. आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि समाधान या झाडांच्या असण्याने कायमस्वरूपी राहातं असाही समज आहे. त्यामुळे अशी झाडं लावण्यात येतात. 

हेही वाचा: हिबिस्कसचे दुष्परिणाम

घरात सुखसमृद्धीसाठी कोणत्या झाडांची निवड करावी (How To Choose Indoor Plant To Attract Luck)

घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि समृद्धी यावी म्हणून घरात अनेक रोपं लावली जातात. वास्तुशास्त्रानुसारदेखील काही झाडांचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. अशी अनेक झाडं आहेत जी तुम्ही घरात लावू शकता. त्याचं नक्की काय महत्त्व आहे हे जाणून घेऊया. 

सकारत्मक ऊर्जा देणारी इनडोअर प्लांट्सची यादी (List Of Indoor Plants That Attract Luck And Positive Energy)

घरामध्ये जेव्हा झाडं लावायची वेळ येते तेव्हा नेमकी कोणती झाडं लावायची ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येईल असा प्रश्न प्रत्येकाचा पडतो. त्यामुळे अशा झाडांची यादी आम्ही देत आहोत, ज्यामुळे तुम्हाला घरात सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि घरामध्ये सुख, समृद्धी आणि आरोग्य या झाडांमुळे लाभेल. 

1. मनी ट्री (Money Tree)

पाचिरा मनी ट्री हे असं झाड आहे जे साधारणतः फेंगशुईमध्ये वापरण्यात येतं. तसंच या झाडामुळे नशीब उजळतं असा समज आहे. तसंच हे झाड जेव्हा तुम्ही घरात आणणार असाल तेव्हा किमान याला पाच फांद्या तरी असायला हव्यात असाही समज आहे. कारण चार हा आकडा चांगला नसल्याने किमान पाच फांद्या या झाडाला असाव्यात असं म्हटलं जातं. 

घरी झाडं लावायला आवडतात, मग ही 5 झाडे आवर्जून लावा

2. मनी प्लांट (Money Plant)

मनी ट्री आणि मनी प्लांटमध्ये नक्कीच फरक आहे. पण प्रत्येकाला तो फरक माहीत नसतो. कधीतरी मनी प्लांटऐवजी काहीजण मनी ट्री घरात लावतात. मनीप्लांट हे सर्वात प्रसिद्ध इनडोअर प्लांट आहे. कारण हे बऱ्याच घरांंमध्ये तुम्हाला दिसून येतं. हे दिसायला जितकं सुंदर आहे तितकाच याचा फायदाही आहे. हे झाड तुमच्या घरातील वातावरण शुद्ध बनवण्यासाठी उपयोगी ठरतं. वास्तुशास्त्रानुसार , घरात मनीप्लांट लावल्याने आर्थिक बाजू भक्कम होते. असं म्हणतात हे झाड जितकं हिरवंगार राहील तितका तुमच्या घरामध्ये पैशाची वाढ होते. या झाडाला लक्ष्मीचं रूप म्हटलं जातं. दक्षिण पूर्व दिशेमध्ये हे झाड लावल्यास, कोणतेही वास्तुदोष असतील तर ते नष्ट होतात असाही समज आहे. 

3. गोल्डन पाथोस (Golden Pathos)

गोल्डन पाथोसची जास्त काळजी घ्यावी लागत नाही. तसंच हे असं इनडोअर प्लांट आहे जे तुमच्या घराची शोभा अधिक वाढवतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा ठेवतं. याची पानं आणि रंग इतका सुंदर असतो की याच्याकडे पाहूनच मन प्रसन्न राहातं. तसंच हे झाड कुठेही पटकन वाढतं. या झाडाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हवा शुद्ध करणं. त्यामुळे घरात याची जास्त गरज भासते. सध्याच्या प्रदूषणाच्या दिवसांमध्ये या झाडांचा खूपच जास्त फायदा होतो. 

4. पीस लिली (Peace Lily)

हे प्लांट आर्टिफिशियल लाईट्सवरअर्थात सूर्यप्रकाशाशिवायही चांगलं वाढतं. तुमच्या घराची आणि कार्यालयाची शोभा वाढवण्यासाठी हे झाडं चांगलं आहे. यावर येणारी पांढऱ्या रंगाची फुलं अधिक मोहक दिसतात ज्यामुळे घराची शोभा वाढण्यास मदत होते. 

यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स

5. स्नेक प्लांट (Snake Plant)

स्नेक प्लांटमुळे हवा शुद्ध राहण्यास मदत होते.  इनडोअर प्लांटपैकी हे कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेणारं सर्वात चांगलं झाड आहे. तसंच हवेतील इतर प्रदूषणात्मक वायू आणि इतर टॉक्सिन्सदेखील हे झाड शोषून घेतं. त्यामुळे घरातमध्ये हे झाड असणं अत्यंत चांगलं मानण्यात येतं. 

6. अॅग्लोनेमा (Aglaonema)

हे चायनीज एव्हरग्रीन प्लांट आहे. घरामध्ये डेकोरेशनसाठी सर्वात जास्त वापरण्यात येणारं हे झाड आहे. हे दिसायला अतिशय सुंदर असून कायम हिरवं राहातं. म्हणूनच याला एव्हरग्रीन असंही म्हणण्यात येतं. चीनमध्ये या झाडाला जास्त महत्त्व आहे.

असं डेकोरेट करा तुमचं बाल्कनी गार्डन
 

7. ऑर्किड प्लांट (Orchid Plant)

रंगसंगतीने भरपूर असं दिसायला सर्वात सुंदर असलेलं ऑर्किड कोणाला आवडत नाही असं नाही. ऑर्किड हे इनडोअर प्लांट घरात लावल्याने घरची शोभा वाढते. तसंच हे झाड प्रेमाचं प्रतिनिधित्व करतं. मैत्री, प्रेम, सुख याचं प्रतिनिधित्व करणारं हे झाड आहे. त्यामुळे घरात हे झाड लावलं जातं. तसंच एखादा नव्या बाळाचा जन्म होतो तेव्हा साधारणतः ही फुलं गिफ्ट करणं चांगलं असतं असं म्हणतात. त्यामुळे तुम्ही नेहमी हे झाड घरात लावावं. 

8. लकी बांबू (Lucky Bamboo)

बांबूचे झाडं हे नशीबासाठी चांगलं असतं असं समजण्यात येतं.  हे झाड लवकर वाढतं. त्याच्या वाढीप्रमाणे घरात सुख, समृद्धी आणि समाधानाची वृद्धी होते असंही समजण्यात येतं. त्यामुळे इनडोअर प्लांट म्हणून याची जास्त मागणी आहे. हे दिसायलादेखील अतिशय सुंदर असतं. आरोग्य चांगलं राहण्यासाठी या झाडाचा सकारात्मक उपयोग होतो असाही समज आहे. 

9. जेड प्लांट (Jade Plant)

फेंगशुईनुसार जेड प्लांट तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घेऊन येतंच. नवा उद्योग सुरू करणाऱ्यांना हे झाड गिफ्ट दिल्याने त्यांची वृद्धी होते असा समज आहे. तुमच्या आयुष्यात यश आणि समृद्धी हे झाड घेऊन येते असाही समज आहे. तसंच घरामध्येही याचा असाच उपयोग होतो. 

10. पॉटेड ऑर्किड्स (Potted Orchids)

ऑर्किड्स आणि पॉटेड ऑर्किड्समध्ये फरक आहे. पण ही दोन्ही इनडोअर प्लांट्स सुख, समृद्धीचं प्रतीक आहेत असं मानण्यात येतं. या झाडाची जास्त काळजी घ्यावी लागत नाही. तसंच हे झाड पटकन वाढतं आणि घरात लावल्याने घराची शोभाही वाढते. 

11. फिलोडेंड्रॉन (Philodendron)

हे प्लांट नैसर्गिक आणि आर्टिफिशियल लाईट दोन्हीवर जगतं आणि हृदयाच्या आकाराची पानं असलेलं हे झाडं तुमच्या घरात अधिक थंडावा घेऊन येतं. उष्णतेच्या दिवसात याचा जास्त उपयोग होतो. तसंच अंधाऱ्या खोलीतही हे झाड खराब होत नाही. हवा शुद्ध ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

12. इंग्लिश इव्ही (English Ivy)

प्लास्टिकमध्ये आढणारा बेन्झिन वायूपासून संरक्षण करण्यासाठी इंग्लिश इव्ही या प्लांटचा उपयोग करता येतो. तसंच शुद्ध हवा मिळवण्यासाठी तुम्ही हे प्लांट घरामध्ये कायम लावून ठेवू शकता. इतर प्लांटच्या तुलनेत याचा कमी उपयोग केला जातो. पण तरीही हे इनडोअर प्लांटदेखील तुमच्या घरात चांगलं आरोग्य राहण्यासाठी उपयुक्त ठरतं.

बाल्कनीमध्ये कोणते प्लांट्स लावावेत (List Of Outdoor Plants To Grow In Balcony That Attract Luck And Positive Energy)

इनडोअर प्लांट्स कोणते लावायला हवेत हे तर आपण वाचलं. त्याचप्रमाणे आपल्याला नक्की कोणते आऊटडोअर प्लांट्स घराच्या बाल्कनीत लावता येतील याचीही यादी बघायला हवी. हे प्लांट्स आपल्या बाल्कनीची तर शोभा वाढवतातच. त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचं कामही करतात. 

1. तुळस (Tulsi)

आपल्याकडे तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्वात पवित्र वनस्पती म्हणून तुळशीकडे नेहमीच पाहिलं जातं. कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी तुळशीचा वापर करण्यात येतो. त्यामुळे घरात नेहमी तुळस लावलेली पाहायला मिळते. कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरात येऊ नये म्हणून घराच्या सुरुवातीलाच घराच्या बाहेर तुळशीचं रोपटं आपल्याला पाहायला मिळतं. तसंच औषधांची राणी म्हणूनही तुळशीची ओळख आहे. तुळच्या पानाफुलांत सगळ्यामध्ये औषधी तत्व आपल्याला सापडतात. बऱ्याच आजारांवर रामबाण इलाज म्हणून तुळशीचा वापर करण्यात येतो. त्यामुळेच घराघरात तुळशीइतकं महत्त्व कोणत्याही अन्य झाडांना नाही.  

वाचा – घरातच झाडे वाढवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

2. स्पायडर प्लांट (Spider Plant)

सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्लांटसाठी जास्त जागा लागत नाही. हे तुम्ही बाल्कनीत वरदेखील लटकवू शकता. हवेतील कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेण्याचं काम हे झाड जास्त चांगल्या प्रमाणात करतं. त्यामुळे घरातील बाल्कनीत हे झाड कायम लावणं चांगलं आहे. 

3. फिशटेल फर्न (Fish Tail Fern)

हे झाड लवकर वाढतं. या झाडाची शेपटी माशाप्रमाणे असते. त्यामुळे याला फिशटेल फर्न असं म्हणतात. तसंच हे झाडदेखील एव्हरग्रीन आहे. तसंच घरामध्ये शुद्ध हवा राहण्यासाठी या झाडाचा उपयोग होतो. आरोग्याच्या दृष्टीने हे झाड घरात लावणं योग्य आहे. 

4. लेमन बाम प्लांट (Lemon Balm)

लेमन बाम प्लांट घरामध्ये लावण्याचे अनेक फायदे आहेत. तुमच्या आरोग्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. याच्या पानाचा चहासाठीदेखील तुम्हाला उपयोग करून घेता येतो. शिवाय याचा सुगंध घरभर दरवळत राहतो. तसंच याची काळजी घेणंही सोपं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात तुमच्या आरोग्यासाठी याचा वापर करून घेऊ शकता. 

5. रबर प्लांट (Rubber Plant)

संपत्ती टिकवण्याच्या बाबतीत या रबर प्लांटची मुख्य भूमिका समजली जाते. घरात पैसे टिकवण्यासाठी या झाडाचं घरात असणं चांगलं समजण्यात येतं. तुमच्या धनलाभासाठी हे झाड घरात असू द्यावं असा समज आहे. त्यामुळे बऱ्याच घरात रबर प्लांट तुम्हाला दिसून येईल. 

6. पाम (Palm)

कोणत्याही खोलीला डेकोरेट करण्यासाठी अथवा अगदी घराबाहेरची बाल्कनी डेकोरेट करण्यासाठी पामचा सर्वात जास्त उपयोग करण्यात येतो.  कायम हिरवेगार राहणारी ही पाम्सची झाडं अतिशय सुंदर दिसतात. शिवाय यांची जास्त देखभाल करावी लागत नाही. त्यामुळे याचा बरेच जण आपल्या घरामध्ये वापर करतात.  

7. बॉस्टन फर्न (Boston Fern)

बॉस्टन फर्न हे झाड दिसायला खूप सुंदर असतं. त्यामुळे तुमच्या घराच्या बाहेर ठेऊन येणाऱ्यांचं स्वागत करण्यासाठी या झाडाचा तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकता. तसंच हवा शुद्ध ठेवण्यासाठीही याची मदत होते. 

वाचा – जाणून घ्या सेंद्रिय शेतीचे फायदे

8. मॉर्निंग ग्लोरी (Morning Glory)

उन्हाळ्याच्या दिवसात हे झाड तुमच्या घरात एक आनंदी वातावरण जागृत ठेवतं. सकाळीच लवकर येणारी ही फुलं मनाला प्रसन्नता देतात आणि तुमचा दिवस अधिक आनंदात घालवण्यास मदत करतात. तुमचा दिवस अधिक सुंदर करण्यासाठी तुम्ही घराबाहेरील बाल्कनीमध्ये नक्कीच या झाडाचा समावेश करू शकता. 

9. कमळ (Lotus)

कमळाची फुलं घरामध्ये सुख, समृद्धी आणि समाधान राखून ठेवतात असं मानलं जातं. घरामध्ये नेहमी सकारात्मक एनर्जी राहण्यासाठी या फुलांची वाढ घराच्या परिसरात करावी असंही म्हटलं जातं. ही फुलं चिखलात जरी वाढत असली तरीही तुमच्या घराच्या सुखासाठी याचा घराबाहेर वास असणं चांगलं असण्याचा समज आहे. 

10. मोगरा (Jasmine)

मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध फारच कमी जणं असतील ज्यांना आवडत नसेल. मोगरा हे अत्यंत मनमोहक फुल आहे.  त्यामुळे घराच्या अंगणात अथवा बाल्कनीमध्ये तुम्ही नेहमी मोगरा लावावा. जेणेकरून घरात नेहमी मोगऱ्याचा दरवळ राहातो आणि घरात प्रसन्न वातावरण राहातं. 

घरात कोणते झाड लावू नये (How Not To Select The Plants)

घरात ज्याप्रमाणे काही झाडं लावणं हे सकारात्मक समजलं जातं. त्याचप्रमाणे काही झाडं घरात लावणं हे नकारात्मक समजण्यात येतं. अशी कोणती झाडं आहेत आणि त्याची कारणं काय आहेत ते पाहूया – 

Lucky Plants संदर्भात प्रश्नोत्तरं (FAQ)

1. बोन्सायचं रोपटं घरात लावता येतं का?

वर माहिती दिल्याप्रमाणेच बोन्सायचं रोपटं घरात लावता येत नाही किंवा ते बाहेरून तुमच्याकडे आणणंही चुकीचं समजलं जातं. संपत्तीमध्ये बाधा आणण्याचं काम हे रोपटं करतं असा समज असल्याने सहसा हे रोपटं लावण्याला कोणीही प्राधान्य देत नाही. 

2. मनी प्लांट तुमच्या घरात गुडलक आणतात का?

हे तुमच्या मानण्यावर सर्वस्वी अवलंबून आहे. मनी प्लांट नेहमी आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा ठेवतात. त्यामुळे मन प्रसन्न राहातं. पण गुडलक आणतात हे मानण्याचा प्रश्न ज्याचा त्याचा आहे.  

3. घरासाठी कोणतं झाड सर्वात जास्त भाग्यशाली आहे?

तुळस हे झाड प्रत्येक घरात लक्ष्मीचं रूप मानलं जातं. वास्तविक तुळशीमध्ये अनेक औषधीय गुण असतात ज्यामुळे आजारापासून दूर राहण्यास मदत होते. त्यामुळे तुळस हे झाड सर्वात जास्त भाग्यशाली आहे.

4. वास्तुसाठी कोणती झाडं सर्वात जास्त चांगली आहेत?

तुळस, चंपा, मोगरा, मनी प्लांट, बांबू प्लांट ही झाडं वास्तुसाठी चांगली मानण्यात येतात. त्यामुळे वास्तुसाठी या झाडांचा उपयोग करावा. 

5. निवडुंग (Cactus) हे झाडं Lucky plant आहे का?

निवडुंगाला अनेक काटे असतात आणि अशा प्रकारची काटेरी झाडं ही नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानली जातात. त्यामुळे निवडुंग सहसा घरात लावू नये आणि हे झाड घरासाठी Unlucky समजण्यात येतं. 

6. झाडांमुळे नशीब खराब होतं का?

ही गोष्टदेखील प्रत्येकाच्या मानण्या न मानण्यावर आहे. ज्याप्रमाणे काही झाडं ही शुभं समजली जातात. तशीच काही झाडं ही अशुभ समजली जातात.  त्यामुळे त्याने नशीब खराब होतं की नाही हे प्रत्येकाच्या अनुभवाचा एक भाग आहे. 

वास्तू टीप्स: चूकून ही तुमच्या बेडजवळ ‘या’ वस्तू ठेऊ नका, होऊ शकतं नुकसान

Read More From घर आणि बगीचा