भारतीय संस्कृतीमध्ये पूजापाठ, व्रतवैकल्यांना अधिक महत्त्व आहे. शिवाय राशीनुसार काही गोष्टी केल्या तर अधिक लाभ मिळतो असं मानलं जातं. दुर्भाग्य टाळण्यासाठी आणि घरात समृद्धी येण्यासाठी हनुमानाची पूजा केली जाते. आज 16 एप्रिल रोजी हनुमान जयंतीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जात आहे. हनुमान जयंतीला मारूती रायाचा जन्म झाला होता. या शुभ मुहूर्तावर तुमच्या जीवनातील पीडा नष्ट होण्यासाठी तुम्ही मारूती रायाला साकडं घालू शकता. मात्र त्यासाठी तुमच्या राशीनुसार करा भगवान हनुमानाची पूजा… यासोबत सर्व मारूती भक्तांना द्या हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा (Hanuman Jayanti Wishes In Marathi)
मेष रास (Aries)
भगवान हनुमान हे स्वतः मंगळाचे स्वामी आहेत. मेष राशीसाठी मंगळवार आणि शनिवारी अतिशय शुभ दिवस असतात. या दिवशी भगवान हनुमानाला शेंदूर वाहणे मेष राशीसाठी अतिशय शुभ मानलं जातं. या राशीच्या जीवनात सुखसमृद्धी येण्यासाठी मारूती रायाची मनोभावे पूजा करावी.
वृषभ राशी (Taurus)
वृषभ राशीचा स्वामी सुखदेव आहे. त्यामुळे भगवान हनुमानाला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि जीवनात सुखाची बरसात होण्यासाठी मारूती रायाची मनापासून पूजाअर्चा करा. वृषभ राशीच्या लोकांनी दिवसातून एकदा तरी हनुमान चालिसा अथवा मारूती स्त्रोत्राचे पठण करावे. ज्यामुळे तुम्हाला चांगला लाभ नक्कीच मिळेल.
मिथुन राशी (Gemini)
मिथुन राशीचा स्वामी आहे बुधदेव… त्यामुळे या राशीच्या लोकांवर मारूतीरायची कृपा कायमच असते. जर तुम्ही हनुमान जयंतीला मनोभावे मारूतीरायाची पूजा केली तर तुमच्या जीवनात आनंदाची बरसात होईल. मात्र हनुमानजयंती निमित्त हनुमानाला खास बुंदीचा प्रसाद जरूर दाखवा.
कर्क राशी (Cancer)
कर्क राशीवर चंद्रदेवाचे अधिराज्य चालते. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी मारूती रायाला प्रसन्न करण्यासाठी खास पूजापाठ करायला हवे. मारूती रायाला शेंदूर चढवत स्वच्छ आणि कोरी लाल वस्त्र नेसून हनुमान जयंतीला मारूती रायाची पूजा करा. तुमच्या जीवनातील सर्व दुःख नष्ट होतील.
सिंह राशी (Leo)
सिंह राशीचा स्वामी आहे सूर्यदेव. विशेष म्हणजे पुराणात सांगितल्यानुसार हनुमानाने जन्मापासूनच सूर्यदेवाला आपलं गुरू मानलं होतं. या दिवशी जर सिंह राशीच्या लोकांनी सूर्योपासना केली तर भगवान हनुमान अधिक प्रसन्न होतात. सिंहराशीला यामुळे दुहेरी लाभ मिळू शकतो.
कन्या राशी (Virgo)
कन्या राशीचा स्वामी आहे बुधदेव, हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी आणि तुमच्या जीवनातील सर्व पीडा कमी करण्यासाठी तुम्ही हनुमान जयंतीला खास पूजापाठ करू शकता. या दिवशी एकशे आठ वेळा हनुमान चालिसा अथवा मारूती स्त्रोत्राचे पठण केल्यास चांगला लाभ मिळेल.
तूळ राशी (Libra)
तूळ राशीचा स्वामी आहे सुखदेव, तूळ राशीच्या जीवनात आनंद येण्यासाठी, आरोग्य लाभण्यासाठी, सुखसमृद्धी येण्यासाठी हनुमान जयंतीला पूजापाठ करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही रामरक्षा अथवा मारूती स्त्रोत्र म्हणू शकता.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ देव. ज्यामुळे वृश्चिक राशीवर हनुमानाची कृपा कायम असते. हनुमानाची पूजा करताना वृश्चिक राशीच्या लोकांनी मारूती स्त्रोत्राचे कायम पठण केल्यास अधिक लाभ मिळू शकतो. आरोग्य लाभण्यासाठी आणि मनशांतीसाठी असे जरूर करावे.
धनुराशी (Sagittarius)
गुरू हा धनुराशीचा स्वामी आहे. जर धनुराशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला सीताराम जपाचा जयघोष केला तर मारूती राया नक्कीच प्रसन्न होईल. या शिवाय या दिवशी प्रभू रामचंद्राच्या मंदीरात जाऊन रामरक्षा अथवा मारूती स्त्रोत्राचे पठण जरूर करावे.
मकर राशी (Capricorn)
शनिदेव मकर राशीचा स्वामी आहे. हनुमानाला शनिदेवाचे रूप मानले जाते. दयाळू अशा मारूती रायाची कृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी तुम्ही शनिदेवाच्या मंदीरात अथवा मारूती रायाच्या मंदीरात जाऊन पूजा करू शकता. मंगळवार आणि शनिवार मारूती स्त्रोत्राचे पठण जरूर करावे.
कुंभ राशी (Aquarius)
कुंभ राशीचे स्वामी देखील शनिदेव आहेत. ज्यामुळे कुंभ राशीच्या लोकांवर मारूती रायाचा प्रभाव अधिक असतो. जीवनात सुख, शांती, प्रेम आणि समृद्धी प्राप्त होण्यासाठी या दिवशी कुंभ राशीच्या लोकांनी सतत रामानामाचा जप करावा.
मीन राशी (Pisces)
मीन राशीवर गुरू राशीचा प्रभाव असतो. हनुमानाची कृपा संपादन करण्यासाठी या दिवशी मीन राशीच्या लोकांनी रामरक्षा अथवा मारूती स्त्रोत्राचे पठण करावे. या शिवाय मारूती रायाची मनोभावे पूजा करून त्याला सर्वांच्या सुरक्षेसाठी साकडं झालावं.
भगवान हनुमान हे शक्तिशाली असल्यामुळे ते सर्वांच्या रक्षणासाठी समर्थ आहेत. जर एखाद्याने मनापासून मारूतीरायाची पूजा केली तर त्याला इच्छित फळ नक्कीच मिळते.
Read More From आपलं जग
नागपंचमी मराठी माहिती | Nag Panchami Chi Mahiti | Nag Panchami Information In Marathi
Aaditi Datar