अॅस्ट्रो वर्ल्ड

जाणून घ्या राशीनुसार कोणता रंग आहे तुमच्यासाठी शुभ

Leenal Gawade  |  Nov 1, 2021
शुभ रंग आणि राशी

आपल्या सगळ्यांचे आयुष्य रंगाने भरलेले आहे. वेगवेगळे रंग वेगवेगळ्या रुपात आपल्यासमोर येत असतात. काही रंग हे आपल्याला शोभून दिसतात त्यामुळे ते अधिक आवडीचे असतात. पण काही रंग हे आपल्याला शोभून दिसले नाही तरी शुभ असतात. प्रत्येक राशीनुसार काही शुभ रंग सांगितले जातात. ते परिधान केले किंवा सोबत ठेवले की, त्याचा फायदा त्या व्यक्तीला होतो. जाणून घेऊया राशीनुसार नेमका कोणता रंग तुमच्यासाठी शुभ आहे ते. याशिवाय रंगाशिवाय काही अशुभ संख्याही असते. ज्या देखील तुम्हाला माहीत असायला हव्या.

मेष :

राशीमधील पहिली रास म्हणजे मेष रास.. या राशीचा शुभ रंग लाल आहे. अशा लोकांनी काही खास कामांसाठी किंवा एखाद्या महत्वाच्या ठिकाणी जर लाल रंग घातला तर त्याचा फायदा त्यांना होतो. याशिवाय पांढरा आणि पिवळा रंग हे देखील फायदेशीर असतात.

वृषभ:

वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ रंग हा गुलाबी आणि पांढरा हा आहे. त्यांनी चांगल्या कामासाठी या रंगाचे कपडे किंवा रुमाल सोबत ठेवावे हे नेहमी शुभ असते. याशिवाय अशा लोकांना पैशांची कमतरता असेल तर त्यांनी हिरव्या रंगाच्या गोष्टी सोबत ठेवणे अधिक चांगले असते.

मिथुन:

मिथुन राशीच्या व्यक्ती या फारच लाघवी असतात. अशा व्यक्तींनी पिवळा आणि हिरवा या रंगाचे शेड्स चांगल्या प्रसंगी किंवा कसोटीच्या क्षणी घालावे त्यामुळे त्यांना लढण्याची वेगळी उमेद मिळण्यास मदत मिळते. याशिवाय गुलाबी आणि पांढरा रंग हे देखील तुम्हाला लकी ठरतात. 

कर्क :

अतिशय संवेदनशील रास म्हणून कर्करास ओळखली जाते. या राशीचा शुभ रंग  पांढरा, मोती, राखाडी आहे.  अशा लोकांनी समाजात वावरताना अनेकदा या रंगाचा समावेश करायला हवा. त्याचा नक्कीच त्यांना फायदा होण्यास मदत मिळेल. 

सिंह:

सिंह राशीच्या व्यक्ती या स्वभावाने कराऱ्या असल्या तरी देखील त्यांच्यामध्ये एक प्रेमळ कोपरा नक्कीच असतो. सिंह राशीच्या केशरी, सोनेरी रंग फायद्याचे असतात. सूर्य हा त्यांच्यासाठी अत्यंत शुभ असून सूर्याच्या छटा असलेले रंग त्यांना चालू शकतात.

राशींसाठी शुभ रंग

कन्या:

 कन्या रास ही पृथ्वीतलाशी निगडीत अशी रास आहे. या राशीच्या लोकांसाठी पानांचा हिरवा, आकाशाचा निळा, सूर्याचा पिवळा असे काही रंग फारच फायद्याचे असतात. 

तूळ:

समतोल साधणाऱ्या या व्यक्ती स्वाभावाने तशा शांतच असतात. या राशीच्या लोकांनी नेहमी ताजे टवटवीत असे रंग निवडावे.या लोकांसाठी पांढरा आणि फिक्कट निळा हे रंग अत्यंत शुभ मानले जातात. 

वृश्चिक:

या राशीचे लोक फारच महत्वाकांक्षी असतात. कामांप्रती त्यांचे वेगळेच प्रेम असते. पांढरा, लाल आणि चॉकलेटी रंगाच्या शेड्स हे रंग त्यांच्यासाठी फारच शुभ असतात.  या शुभ रंगाचा फायदा त्यांना खासगी आणि कामाच्या ठिकाणी देतील होतो. 

धनु:

धनु राशीच्या लोकांसाठीही काही खास रंग वापरणे फायद्याचे ठरते. धनु राशीच्या लोकांनी गडद पिवळा, केशरी, रामा ब्लू असे काही रंग फारच फायद्याचे असतात. तुम्ही या रंगाचा वापर नक्कीच करायला हवा.

कुंभ:

 कुंभ राशीच्या लोकांसाठी निळा, पांढरा, जांभळ्या रंगाच्या शेड्स या फारच फायद्याच्या असतात. कुंभ राशीच्या लोकांनी हमखास याचा वापर करायला हवा. 

मकर:

मकर राशीच्या लोकांसाठी  काळा, जांभळा, चॉकलेटी  आणि हिरवा असे रंग शुभ असतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला फायदा हवा असेल तर तुम्ही नक्कीच याचा विचार करायला हवा. या रंगाचे कपडे परिधान करायला हवेत.

मीन:

 मीन राशीच्या लोकांसाठी पिवळा, केशरी आणि गुलाबी रंग हे शुभ मानले जातात. अशा लोकांनी चांगल्या कामांसाठी जाताना या रंगाचा वापर करावा. त्यांना नक्कीच फायदा होईल. 

आता तुमच्यासाठी कोणता रंग शुभ आहे हे पाहून त्याचा वापर करायला हवा.

अधिक वाचा

घरात सकारात्मक उर्जा टिकून राहण्यासाठी टाळा या गोष्टी

तळहातावरील या रेषा असतात फारच शुभ, जाणून घ्या अर्थ

घरात देवदेवतांचे असे फोटो मुळीच असू नयेत

Read More From अॅस्ट्रो वर्ल्ड