Care

एव्हरग्रीन माधुरी दीक्षित केसांची घेते अशी काळजी, सिक्रेट केले शेअर

Dipali Naphade  |  Nov 26, 2020
एव्हरग्रीन माधुरी दीक्षित केसांची घेते अशी काळजी, सिक्रेट केले शेअर

प्रत्येकाला सुंदर आणि कुरळे केस छान वाटतात. कुरळे केस म्हटलं की सर्वात आधी समोर चेहरा येतो तो म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षितचा (Madhuri Dixit Nene). मराठमोळ्या माधुरीने अनेक वर्ष बॉलीवूडवर राज्य केलं आहे. आजही माधुरी समोर आली की हृदयाची ‘धक-धक’ वाढतेच.  माधुरीचे हास्य, तिची त्वचा तर सुंदर आहेच. पण तिचे केसही तितकेच सुंदर आहेत. माधुरीने आपल्या केसांची काळजी कशी घेते याच्या काही टिप्स शेअर केल्या होत्या. आम्ही तुमच्यासाठी खास या टिप्स सांगत आहोत.  तुम्हीही तुमच्या केसांची काळजी माधुरीप्रमाणे घेऊ शकता.  माधुरी आपल्या केसांसाठी ऑलिव्ह ऑईल आणि एरंडाच्या तेलाच्या मिक्स्चरचा वापर करते. या दोन्हीचे मिश्रण करून ती केसांना मसाज करते. अशाच काही महत्त्वाच्या टिप्स तुमच्यासाठी. 

हेल्दी डाएट आहे महत्त्वाचा भाग

केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये पालेभाज्यांचा समावेश करून घ्यायला हवा.  यामुळे शरीराला आवश्यक पोषण प्राप्त तर होतेच. त्याशिवाय तुम्हाला घनदाट आणि काळेभोर केस राखण्यासाठीही मदत मिळते. आहारामधून केसांना मिळणारे पोषण तुमचे केस अधिक चांगले राखण्यास मदत करते.  

तेलाने वेळोवेळी करा मसाज

Shutterstock

माधुरी दीक्षितप्रमाणे तुम्ही आठवड्यातून एकदा केसांना ऑलिव्ह ऑईल आणि एरंडाच्या तेलाने मसाज करा. हे दोन्ही समप्रमाणात घ्या आणि तेल केसांना लाऊन मसाज करा. तेल लावण्यापूर्वी केसांना माईल्ड शँपू करा. जेणेकरून केसांवर जमा झालेली धूळ, कोंडा आणि तेल बाहेर निघून जाईल. त्यानंतर केस सुकवून केसांना तेल लावा आणि मसाज करा. साधारण एक तासाने शँपू,  कंडिशनर लावा आणि केस धुवा. त्यानंतर सीरम लाऊन केस अधिक सुंदर दिसतील. 

ओल्या केसांची घ्या काळजी

Shutterstock

तुम्ही जर बाहेर जाण्यापूर्वी केस धुतले असतील आणि ते ओले असतील तर त्याची काळजी घ्या. विशेषतः कुरळ्या केसांची. कारण ओल्या केसांमध्ये जास्त गुंता होतो. ओल्या केसांमध्ये फणी फिरवताना हलक्या हाताने विंचरा. त्यामुळे केस तुटणार नाही. त्यापेक्षा केस ओले असताना अथवा केस धुत असताना कंडिशनर लावताना केस विंचरलेत तर गुंता कमी होईल. 

लांबसडक आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी 10 घरगुती उपाय (Home Remedies For Hair Growth In Marathi)

ठराविक कालावधीनंतर करा ट्रिम

लांब केस सर्वांनाच आवडतात. पण त्याची काळजी घेणं तितकंच कठीण आहे. तुम्हाला लांब केसांची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही काही ठराविक कालावधीनंतर केस ट्रिम करणं योग्य आहे. केस तुटल्याने सहसा खराब होता. ट्रिमिंगमुळे अनहेल्दी केस निघून जातात. तुटणाऱ्या  केसांकडे दुर्लक्ष करू नका. जर रोज 100-150 केस तुटत असतील तर काळजीची गरज नाही. पण त्याहीपेक्षा अधिक केस तुटत असतील तर तुम्ही याकडेही लक्ष द्या. 

निरोगी केसांसाठी घरीच तयार करा मास्क आणि तेल

माधुरीसारखे केस हवे असतील तर तुम्ही घरच्याघरीही मास्क आणि तेल तयार करून काळजी घेऊ शकता. त्यासाठी नक्की कशाचा आणि कसा वापर करायचा ते जाणून घ्या.

केसांना अधिक घनदाट, लांब आणि चमकदार बनवण्यासाठी वापरा मुलतानी माती

मध, अंडे आणि अॅपल साईड व्हिनेगर (Honey, Egg and Apple Cide Vinegar)

Shutterstock

तुमचे केस सतत गुंतत असतील आणि तुटत असतील तर मध, अंडे आणि अॅपल साईड व्हिनेगरचा मास्क तुमच्यासाठी परफेक्ट आहे. हे तिन्ही एकत्र मिक्स करून घ्या आणि हे मिश्रण तुम्ही केसांच्या मुळांपासून लावा. साधारण पाऊण तासाने केसांना माईल्ड शँपू करा आणि फरक पाहा. 

बेसन आणि ऑलिव्ह ऑईल (Besan and Olive Oil)

Shutterstock

तुमचे केस कोरडे असतील तर तुम्ही अगदी बिनधास्त हे मिश्रण वापरू शकता. बेसनमध्ये ऑलिव्ह ऑईल मिक्स करा आणि ही पेस्ट केसांना लावा. अर्ध्या तासानंतर तुम्ही केस पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर शँपू आणि कंडिशनर लावा. तुम्हाला मऊ केस मिळतील. 

गर्भारपणात कशी घ्याल त्वचा आणि केसांची काळजी

केळं आणि नारळाचे तेल (Banana and Coconut Oil)

Shutterstock

बऱ्याचदा वेगवेगळ्या हेअरस्टाईल आणि केसांना काढलेल्या रंगांमुळे केस खराब होतात. तुम्हाला केस निरोगी ठेवायचे असतील तर तुम्ही नारळ तेल, ग्लिसरीन आणि मध एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना लावा आणि  अर्धा तास तसेच ठेवा. नंतर केस धुवा.  

माधुरी दीक्षितप्रमाणे तुम्हाला केस हवे असतील तर वर दिलेल्या टिप्सचा वापर करून तुम्ही असे केस मिळवू शकता. तुम्हाला जास्त  त्रासही होणार नाही आणि केसही निरोगी राहतील. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Care