xSEO

महाबळेश्वर पर्यटन स्थळे | Tourist Places Of Mahabaleshwar In Marathi

Leenal Gawade  |  May 27, 2022
mahabaleshwar tourist placese

कोणताही ऋतू असो हिल स्टेशनवर जाणे हे सगळ्यांनाच आवडते. देशात अनेक हिल्स स्टेशन्स आहेत. पण त्यापैकी महाबळेश्वर हे असे ठिकाण आहे जे महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे हिल स्टेशन आहे. फॅमिली पिकनिक असो की हनिमून महाबळेश्वरला पहिली पसंती दिली जाते. महाबळेश्वरला जाण्याचा विचार करत असाल तर महाबळेश्वर पर्यटन स्थळे याविषयींची माहिती असायला हवी. महाबळेश्वरला गेल्यानंतर तुम्ही नेमके कुठे कुठे फिरायला हवे हे देखील माहीत हवे. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे महाबळेश्वर याची माहिती घेत आपण त्या ठिकाणी नेमके कसे पोहोचायचे हे देखील जाणून घेणार आहोत. ही माहिती तुम्हाला आवडली तर ती तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायला विसरु नका. या शिवाय महाराष्ट्रातील समुद्रकिनारे ही तुम्ही फिरु शकता.

Table of Contents

  1. महाबळेश्वर पर्यटन स्थळे ठिकाणे | Most Vsited Places In Mahabaleshwar In Marathi
  2. प्रतापगड – महाबळेश्वर मधील ऐतिहासिक पर्यटन स्थळ
  3. पाचगणी – महाबळेश्वर मधील निसर्गरम्य पर्यटन स्थळ
  4. मॅप्रो गार्डन – महाबळेश्वर मधील बघण्यासारखे ठिकाण
  5. महाबळेश्वर मार्केट – महाबळेश्वर पर्यटन स्थळे
  6. महाबळेश्वर मंदिर – महाबळेश्वर धार्मिक पर्यटन स्थळ
  7. तापोला लेक – महाबळेश्वर मधील निसर्गरम्य पर्यटन स्थळ
  8. एलिफंट पॉईंट – महाबळेश्वर मधील निसर्गरम्य पर्यटन स्थळ
  9. महाबळेश्वर हिल स्टेशन
  10. महाबळेश्वरमधील इतर बघण्यासारखी ठिकाणे
  11. महाबळेश्वरला कसे पोहोचायचे | How To Go Mahabaleshwar In Marathi
  12. बस (Bus)
  13. रेल्वे (Railway)
  14. विमान (Plane)
  15. FAQ – महाबळेश्वर पर्यटन स्थळे | Tourist Places Of Mahabaleshwar In Marathi

महाबळेश्वर पर्यटन स्थळे ठिकाणे | Most Vsited Places In Mahabaleshwar In Marathi

महाबळेश्वरमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा जाणवतो तो म्हणजे सुखद गारवा. या गारव्यात आल्यानंतर आपण कुठेतरी फार दूर रम्य अशा ठिकाणी आल्याचा आनंद जाणवतो. खूप जण महाबळेश्वरला आराम करण्यासाठी येतात. पण जर तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी आला असाल तर तुम्ही येथील महाबळेश्वर पर्यटन स्थळे ठिकाणे पाहायला हवीत. यामागे असलेला इतिहास आणि त्याचे सौंदर्य अनुभवायला हवे.

प्रतापगड – महाबळेश्वर मधील ऐतिहासिक पर्यटन स्थळ

किल्ले प्रतापगड

महाबळेश्वरचा दौरा प्रतापगडला भेट दिल्यावाचून पूर्ण होणार नाही. प्रतापगड हा गिरिदूर्ग प्रकारातील किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरुन प्रतापगडाचे बांधकाम करण्यात आले. जावळीच्या तालुक्यात महाबळेश्वरपासून 8 मैल अंतरावर हा किल्ला आहे. महाराज या ठिकाणी अगदी काहीच काळासाठी वास्तव्यास होते. याच किल्ल्याच्या पायथ्याशी काकरखानसोबत शिवाजी महाराजांनी दोन हात केले होते. या किल्ल्याचा इतिहास सांगायचे झाले तर अफजलखान हा मजल दरमजल करत छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करणार होता हे लक्षात येताच त्याला जावळीच्या जंगलात अडकून मारण्यासाठी शिवाजी महाराजांनी कट रचला होता. अफजलखानाने दगा दिल्यावर त्याला याच परिसरात मारण्यात आले होते. त्याचे शीर किल्ल्याच्या बुरुजात पुरण्यात आले.  अफजलखानाची कबर देखील याच परिसरात आहे. पण त्या ठिकाणी कोणालाही जाऊ दिले जात नाही. गडावरुन ही कबर दिसते. गडावर अजूनही लोकं वास्त्व्यास आहे.येथे महाराजांचा मोठा अश्वारुढ पुतळा आहे.  येथे जिजाऊंचा वाडा देखील आहे. या किल्ल्यावर गेल्यावर गाईड नक्की घ्या म्हणजे तुम्हाला किल्ल्यावरील बुरुजांची, किल्ल्याच्या बांधकामाची योग्य माहिती मिळते. महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळ यांमध्ये याचा समावेश होतो

अधिक वाचा: पुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळं | Places To Visit In Pune In Marathi

पाचगणी – महाबळेश्वर मधील निसर्गरम्य पर्यटन स्थळ

पाचगणी

महाबळेश्वरपासून काहीच अंतरावर असलेले आणखी एक हिलस्टेशन म्हणजे पाचगणी. महाबळेश्वरपासून 18 ते 20 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. हे तितक्याच उंचावर असलेले हिलस्टेशन आहे. महाबळेश्वरला गेल्यावर या ठिकाणी एक फेरफटका नक्कीच मारायला हवा. असे म्हणतात की, पूर्वी या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक झाला असावा या उद्रेकातून जो डोंगर समूह तयार झाला या पाचगणी असे म्हटले जाते. पाचगणीमध्ये अनेक बोर्डिंग स्कुल आहेत.  या ठिकाणी पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. यामध्ये पाचगणीच्या गुंफा, कमलगड, दऱ्या, धबधबे,टेबल लँड अशा काही पर्यटन स्थळांचा समावेश आहे. 

अधिक वाचा: औरंगाबाद पर्यटन स्थळे | Aurangabad Travel Destinations In Marathi

मॅप्रो गार्डन – महाबळेश्वर मधील बघण्यासारखे ठिकाण

मॅप्रो गार्डन

महाबळेश्वरला जाणार आणि मॅप्रो गार्डनमध्ये जाणार नाही असे मुळीच होऊ शकत नाही. महाबळेश्वरमधील मॅप्रो हा खवय्यांचा अड्डा आहे. कारण याठिकाणी तुम्हाला पिझ्झा, पास्ता, सँडवीच असे चमचमीत पदार्थ मिळतात. इतकेच नाही तर महाबळेश्वरची खासियत असलेल्या अनेक गोष्टी येथे विक्रीला असतात. महाबळेश्वहून कोणाला काही न्यायाचे असेल तर तुम्ही या ठिकाणाहून तुम्हाला जेली, सरबत असे सगळे काही तुम्हाला  नेता येते.

महाबळेश्वर मार्केट – महाबळेश्वर पर्यटन स्थळे

महाबळेश्वर मार्केट

 महाबळेश्वरला गेलात आणि मार्केटमध्ये जाणार नाहीत असे मुळीच होणार नाही. कारण महाबेश्वरच्या मार्केटमध्ये एक वेगळीच मजा आहे. कारण या ठिकाणी वेगवेगळ्या खान पान संस्कृतीचा आनंद घ्यायला हवा. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या मेजवान्यांचा आनंद घेता येईल. महाबळेश्वरच्या मार्केटच्या जवळ राहता आले तर जास्त चांगले. कारण त्यामुळे अगदी चालत मार्केटमध्ये जाता येते. मार्केटमध्ये तुम्हाला स्ट्रॉबेरी क्रिम, आईस्क्रिमचा आनंद घेता येतो. महाबळेश्वरची नाईटलाईफ पाहण्यासाठी अनेक जण रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. महाबळेश्वर मार्केटमध्ये हल्ली कॅफेज देखील झाले आहेत. तेथे ही मित्रांसोबत आनंद घेता येतो. 

महाबळेश्वर मंदिर – महाबळेश्वर धार्मिक पर्यटन स्थळ

महाबळेश्वर मंदिर

महाबळेश्वरमध्ये गेल्यानंतर महाबळेश्वर मंदिर आहे. हे तेथील फार पुरातन असे मंदिर असून महाबळेश्वरला गेल्यानंतर पहिल्यांदा त्या मंदिरात नेले जाते. महाबळेश्वरमध्ये असलेले हे मंदिर महादेवाचे मंदिर आहे.  महाबली या नावापासून याला महाबळेश्वर हे नाव मिळाले आहे. याला श्रीक्षेत्र महाबळेश्वर असे देखील म्हटले जाते. हे मंदिर 13 व्या शतकातील आहे. या मंदिरात कृष्णाई देवीचे मंदिर आहे. या ठिकाणी भाविकांची फार गर्दी नसते. त्यामुळे दर्शनही अगदी सहज होते.

अधिक वाचा: महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंग

तापोला लेक – महाबळेश्वर मधील निसर्गरम्य पर्यटन स्थळ

तापोला लेक

काश्मीरला जाण्याची ज्यांची इच्छा अपुरी राहिली आहे. त्यांच्यासाठी तापोला लेक हे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाते. तापोला लेकमध्ये मस्त बोटींग केली जाते. या व्यतिरिक्त बरेच वॉटर स्पोर्ट देखील या ठिकाणी केले जातात. थोडासा निवांत असा वेळ घालवायचा असेल तर तुम्ही नक्कीच येथे जा. बोटींग न करतानाही काही वेळ निवांत बसून येथील रम्या वातावरणाचा आनंद घेता येईल. तापोला लेक हा येथील प्रसिद्ध असा मोठा लेक आहे. येथे पोहण्यास मनाई आहे.

एलिफंट पॉईंट – महाबळेश्वर मधील निसर्गरम्य पर्यटन स्थळ

Elephant Point

महाबळेश्वरच्या वेगवेगळ्या पॉईंटपैकी एक प्रसिद्ध असा पॉईंट म्हणजे एलिफंट पॉईंट. या पॉईंटमध्ये असे एक दगडाचे शिल्प तयार झाले आहे जे दुरुन पाहिल्यानंतर हत्तीचे तोंड असल्यासारखे दिसते. हा पॉईंटही बराच उंचीवर आहे. येथून तुम्हाला महाबळेश्वरचे दर्शन घडते. या ठिकाणी माकडांचा सुळसुळाट असल्यामुळे माकडांपासून जपून राहा. कॅमेरे आणि फोन सांभाळा. कारण माकड माणसाळल्यामुळे ते जवळ येण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे माकडांपासून सावध राहिलेले बरे.  महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे यामध्ये या पॉईंटचा उल्लेख आहे

महाबळेश्वर हिल स्टेशन

महाबळेश्वर हिल्स

आता तुम्हाला वाटेल महाबळेश्वर एक हिल स्टेशन असताना अजून हिल स्टेशन वेगळे ते कोणते? महाबळेश्वर हिलस्टेशनवर बरेच वेगवेगळे पॉईंट आहेत. त्यालाचा हिल स्टेशन असे म्हटले जाते. महाबळेश्वर संपूर्ण फिरायचे म्हणजे तुम्हाला हे सगळे हिल स्टेशन फिरावे लागते. या ठिकाणी आर्थर सीट, विल्सन पॉईंट, सनसेट पॉईंट असे अनेक पॉईंट आहेत. हे थोडे खालीवर असल्यामुळे तुमची थोडी दमछाक होऊ शकते. शिवाय या ठिकाणीही तुम्हाला मस्त असा रानमेवा चाखता येतो. येथे स्ट्रॉबेरीजचा आस्वाद घ्यायला अजिबात विसरु नका.

महाबळेश्वरमधील इतर बघण्यासारखी ठिकाणे

महाबळेश्वरमधील वरील काही प्रसिद्ध ठिकाणे वगळता जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही वेगळी ठिकाणे पाहायची असतील तर तुम्ही अशा ठिकाणांनाही भेट देऊ शकता.

  1.   लोकलं बाजार, काही मंदिरे, स्ट्रॉबेरीजचे मळे फिरु शकता
  2.   टायगर स्प्रिंग, घोडस्वारी, पंचगंगा टेंपल, वेण्णा लेक, लॉडवेक पॉईंट,पारसी पॉईंट अशी अन्य काही पॉईंट देखील आहेत.

महाबळेश्वरला कसे पोहोचायचे | How To Go Mahabaleshwar In Marathi

महाबळेश्वर पर्यटन स्थळे माहिती घेतल्यानंतर कुटुंबासोबत, मित्रांसोबत महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही प्रवास नेमका कसा करायला हवा? हे देखील जाणून घ्यायला हवे. प्रवास सुखकर होण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणताही प्रवासाचा पर्याय निवडू शकता.

बस (Bus)

महाबळेश्वरला जाण्यासाठी अगदी कुठूनही बस उपलब्ध आहेत. मुंबई असो वा पुणे तुम्हाला कुठूनही अगदी सहज महाबळेश्वरला जाण्यासाठी बस मिळू शकतात. एसी, नॉन एसी अशा बसेसचा पर्याय सगळीकडे उपलब्ध असतात. मुंबईत अनेक ठिकाणी याचे थांबे आहेत. तुम्ही अगदी आयत्यावेळीही महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन करु शकता. फक्त सीझनच्या वेळात आणि वीकेंड पाहून प्लॅन कराल तर तुम्हाला प्रवासात कोणताही अडथळा येणार नाही.

रेल्वे (Railway)

 खूप जणांना बसचा प्रवास हा अजिबात जमत नाही. अशांना ट्रेन हा देखील पर्याय आहे. मुंबईहून तुम्हाला वातर ( WATHAR) येथे जाण्यासाठी गाड्या मिळतील. या स्टेशनला उतरुन तुम्हाला पुढे गाडी करुन जावे लागते. पण वाथरवरुन महाबळेश्वर हा 60 किलोमीटर इतकाच प्रवास तुम्हाला करावा लागतो. त्यामुळे थकवा येत नाही. याशिवाय सातारा आणि कोल्हापूर स्टेशनातूनही तुम्हाला महाबळेश्वरला जाता येईल.

विमान (Plane)

महाबळेश्वरला स्वतंत्र असे विमानतळ नाही. त्यामुळे तुम्हाला विमानप्रवास करुन थेट तेथे जाता येणार नाही. महाबळेश्वरला जाण्यासाठीचे सगळ्यात जवळचे असे विमानतळ म्हणजे पुणे. पण त्यानंतर तुम्हाला पुन्हा रोडवेज ने जावे लागते.त्यामुळे या सगळ्यात सोयीस्कर असा प्रवास म्हणजे बसचा प्रवास

FAQ – महाबळेश्वर पर्यटन स्थळे | Tourist Places Of Mahabaleshwar In Marathi

प्रश्न: महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी सहज वाहन मिळतात का?
उत्तर : एखाद्या ठिकाणी गेल्यावर जर आपल्याला सहज प्रवास करता आला तर तो प्रवास अधिक सुखकर होतो. महाबळेश्वर हे प्रसिद्ध असे हिल स्टेशन आहे. या ठिकाणी पर्यटकांची बरीच गर्दी असते. वर्षभर या ठिकाणी पर्यटक असतात. पर्यटकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी याठिकाणी तुम्हाला टॅक्सी अगदी सहज मिळतात. ज्या हॉटेलमध्ये तुम्ही राहात आहात तेथून देखील तुम्हाला ही गाड्यांची सोय करता येऊ शकते.

प्रश्न: महाबळेश्वर जाण्याचा योग्य काळ कोणता आहे?
उत्तर: महाबळेश्वरला वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. उन्हाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक खास थंड होण्यासाठी येतात. थंडीच्या दिवसात येथे मोठ्या प्रमाणात थंडी असते. ही थंडी कदाचित काही जणांना सहनही होणार नाही. शिवाय स्ट्रॉबेरीजचा आस्वाद घेण्यासाठी खास जात असाल तर त्याचीही शेती वर्षभर केली जाते. त्यामुळे तुम्ही अगदी कोणत्याही महिन्यात आपल्या सोयीने महाबळेश्वरला जाऊ शकता.

प्रश्न: महाबळेश्वरवरुन काय खरेदी करता येईल?
उत्तर: पर्यटनाचे ठिकाण म्हटले की, त्याठिकाणी खरेदी ही आलीच. महाबळेश्वरला काहीही खरेदी करण्यापेक्षा तुम्ही या ठिकाणी खाण्यापिण्याचा मनमुराद आनंद घ्यायला हवा. महाबळेश्वरमधून तुम्ही स्ट्रॉबेरी, तुतीची फळं, मस्त स्ट्रॉबेरी क्रिम, मँगो डुबा डुबा, तेथील वाईब्स आणि खानपानाचा आस्वाद नक्कीच घ्यायला हवा.

महाबळेश्वर पर्यटन स्थळे माहिती घेतल्यानंतर या गोष्टींचा आनंद घ्यायला नक्की विसरु नका.

Read More From xSEO