Stories

2022 महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती | Mahashivratri Information In Marathi

Leenal Gawade  |  Feb 15, 2021
Mahashivratri Information In Marathi

महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा अत्यंत महत्वाचा असा सण आहे. फाल्गुन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाते. असं म्हणतात की, यान दिवशीच सृष्टीची निर्मिती झाली म्हणून या दिवसाला पौराणिक आणि आध्यात्मिक असे दोन्ही महत्व आहे. वर्षात प्रत्येक महिन्याला एक शिवरात्र येते. पण त्यापैकी ‘महाशिवरात्री’ म्हणून हा दिवस ओळखला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराची मनोभावे पूजा केली जाते. शंकराला विशेष प्रसाद दाखवला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यातून देशातील भाविक शंकराची अत्यंत वेगळेपणाने या खास दिवशी पूजा करतात. एकमेंकाना आवर्जून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. यंदा महाराशिवरात्री 1 मार्च 2022 रोजी येत आहे.  महाशिवरात्रीचे महत्व जाणत तुम्हाला अजूनही महाशिवरात्रीची माहिती (mahashivratri information in marathi) नसेल तर आज या दिवसाची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेऊया. महाशिवरात्रीची ही माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्हाला या  दिवसाचे महत्व आणि ती साजरी करण्याची योग्य पद्धत कोणती ते ही लक्षात येईल.

महाशिवरात्री म्हणजे काय? – Mahashivratri Information In Marathi

mahashivratri information in marathi

समुद्र मंथनाची कथा आतापर्यंत आपल्या सगळ्यांना माहीत असेल. ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यावेळी या समुद्र मंथनातून अनेक गोष्टींची निर्मिती झाली. सृष्टीसाठी आवश्यक अशा अनेक गोष्टी या मंथनातून बाहेर आल्या पण त्यासोबतच ‘हलाहल विष’ ही बाहेर आले. हलाहल हे असे विषारी विष होते. ज्यामध्ये सृष्टीचा नाश करण्याची ताकद होती. हे विष प्राशन करुन सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान शंकरांनी हे हलाहल विष प्राशन केले. हे विष प्राशन करताच त्यांचा कंट निळा पडला. त्यांच्या संपूर्ण देहाचा दाह होऊ लागला. ती रात्र भगवान शंकरांसाठी फारच महत्वाची होती. वैद्यांनी शंकराना जागण्याचा सल्ला दिला. भगवान शंकरांना बरे वाटावे म्हणून त्या रात्री गायन आणि वादन करुन त्यांना जागे ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्यांना बरे वाटले आणि समस्त सृष्टीला आशीर्वाद दिला. हलाहल विष प्राशन केल्यानंतरची ही रात्र ‘महाशिवरात्र’ म्हणून साजरी केली जाते. आता तुम्हाला महाशिवरात्री म्हणजे काय? ते नक्कीच कळले असेल. या शिवाय महाशिवरात्रीच्या शुभेच्छा पाठवून हा दिवस साजरा करु शकता. 

महाशिवरात्री कथा – Mahashivratri Katha In Marathi

महाशिवरात्रीची माहिती

महारशिवरात्री संदर्भात दोन कथा अत्यंत स्वाभाविकपणे सांगितल्या जातात. एक म्हणजे समुद्र मंथनाची कथा जी आपण महाशिवरात्र म्हणजे काय ते माहीत करुन घेताना जाणली. पण यासोबतच शिव भक्तीचा महिमा आणि महाशिवरात्रीसंदर्भात पारधी आणि हरीणाची एक कथा सांगितली जाते.

एकदा पार्वतींनी भगवान कृष्णाला विचारले की, असे कोणते सोपे- सरळ व्रत आहे जे केल्यामुळे मृत्युलोकातील प्राण्यांवरही तुमची सहज कृपादृष्टी पडते. त्यावेळी भगवान शंकरांनी ‘महाशिवरात्री व्रता’चा उल्लेख केला आणि माता पार्वतीला एका पारध्याची कथा सांगितली. चित्रभानू नावाचा एक पारधी होता. प्राण्याची शिकार करुन तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत होता. शिकाऱ्याच्या डोक्यावर सावकाराचे मोठे कर्ज होते. जे कर्ज तो चुकवू शकत नव्हता. एके दिवशी कर्ज भरता येणार नाही हे लक्षात आल्यानंतर सावकाराने त्याला एक शिवमंदिरात कोंडून ठेवले. तो दिवस शिवरात्रीचा होता. मंदिरात बसून तो भगवान शिवाविषयी अत्यंत धार्मिक गोष्टी मन लावून ऐकू लागला. दिवसभर उपवास घडल्यामुळे तो थोडा कमजोर झाला होता. संध्याकाळी शांत झाल्यानंतर सावकाराने त्याला कर्जाची रक्कम कधी देणार हे विचारण्यासाठी बोलावले. त्यावेळी त्याने सगळे पैसे उद्या परत करतो असे सांगून शिकारीसाठी निघून गेला. थकून गेलेल्या पारध्याने सहज शिकार मिळवण्यासाठी तलावाकडील एका झाडावर जाऊन पाळत ठेवणे पसंत केले. हे झाड बेलाचे होते याची माहिती त्याला नव्हती. त्या झाडाच्या खाली एक शंकराची पिंड होती. शिकारीसाठी त्याने बेलाच्या काही फांद्या छाटल्या होत्या. त्या पिंडीवर जाऊन पडल्या आणि त्यामुळे शिकारऱ्याकडून न कळतपणे शिवलिंगावर अभिषेक झाला होता. दुसऱ्या दिवशी एक हरीण त्याला दिसले. प्रसुती काळ जवळ आलेले अशी ही हरीण होती. तिने शिकाऱ्याला पाहिले आणि सांगितले की, ‘मी आई होणार आहे. मला आता मारु नकोस. मला मारलेस तर तू दोन जीवांना मारशील. अशी चूक करु नकोस. हरीणीचे बोलणे ऐकून त्याने तिला सोडून दिले. त्यानंतर आणखी एक हरीण तेथे आली. तिने पारध्याला नेम घेताना पाहिले ती म्हणाली, मी विरहात आहे . मी माझ्या प्रेमाच्या शोधात आहे. मला आता जाऊ दे. मी नंतर तुझ्याकडे नक्की येईन.हे ऐकून शिकाऱ्याने त्या हरीणीलाही सोडून दिले. पण भुकेने व्याकुळ झालेल्या आणि कुटुंबाच्या चिंतेत असलेल्या शिकाऱ्याला पुढे काय करावे मुळीच कळत नव्हते. तो रागाने बेलाची पाने पिंडीवर टाकून लागला. तोच पुन्हा एकदा एक हरीणी तिच्या पिलांना घेऊन तळ्याकाठी आली. आता शिकार सोडायची नाही हा विचार करुन तो बाण मारणात तिच हरीणी म्हणाली की, मी या पिलांना त्यांच्या वडिलांच्या स्वाधीन करते. माझे कर्तव्य पूर्ण करते मग तू मला मार. उपवास, शिव पिंडीवर बेलाचा अभिषेक करुन पारध्याच्या मनात करुणाभाव आला होता. त्याने त्या आई हरीणीला सोडून दिले. पण सावकाराचे कर्ज आणि कुटुंबाची जबाबदारी लक्षात घेत त्याने आता शिकार हातून जाऊ द्यायची नाही असे ठरवले आणि तो शिकार शोधू लागला. त्यावेळी तिथे एक तरणाबांड हरीण आला. आपल्यावर रोखलेला बाण पाहत तो म्हणाला की, हे शिकारी तू या आधी आलेल्या हरीणींना मारुन टाकले असेल तर माझ्या जीवनाला काही अर्थ नाही. पण जर तू त्यांना मारले नसशील तर त्या माझ्या तीन पत्नी आहेत. मला त्यांना भेटण्याची गरज आहे. तू थोडा वेळा वाट बघं मी त्यांना भेटून लगेचच तुझ्याकडे येतो. यावेळी शिकारी थोडा कठोर झाला होता. पण त्याचा ह्रदयातून करुणा भाव जात नव्हता. त्याने त्या हरीणालाही जाऊ दिले. ज्यावेळी तो हरीण परत आला. त्यावेळी त्याच्या संपूर्ण कुटुंबाला पाहून त्यांना मारण्याची इच्छा मुळीच झाली नाही. स्वर्ग लोकातून सगळे देव पारध्यामधील बदल पाहात होते. त्याने सगळ्यांनी मन जिंकून घेतली. त्याच्यावर स्वर्गातून पुष्प वृष्टी होऊ लागली. भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. या पारध्याकडून नकळत हे व्रत झाले आणि त्याला मोक्ष प्राप्ती झाली.

महाशिवरात्री कशी साजरी केली जाते? – How To Celebrate Mahashivratri

महाशिवरात्री सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. जर तुम्ही पहिल्यांदा ही महाशिवरात्र करणार असाल तर या वेळी नक्की करा. महाशिवरात्रीचा उपवास मनोभावे केल्याने चांगला पती मिळतो असे म्हणतात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाशिवरात्री संदेश पाठवून तुम्ही हा आनंद साजरा करु शकता. 

महाशिवरात्रीचा आहार (Mahashivratri Food Upwas)

Instagram

महाशिवरात्रीला इतर उपवासासारखा आहार घेतला जात नाही. तर या दिवशी काही खास पदार्थ खाल्ले जातात. यादिवशी काही खास उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. महाशिवरात्रीसाठी उपवासाचे पदार्थ हे तितकेच वेगळ्या पद्धतीने बनवले जातात. महाशिवरात्रीसाठी आहारात तुम्ही साबुदाणा आणि रताळ्याचा समावेश करु शकता.

महाशिवरात्रीची अत्यंत महत्वाची माहिती जाणून घेतल्यानंतर ही महाशिवरात्री आनंदाने साजरी करा.

हेही वाचा – 

महाकाल शायरी (Mahakal Shayri in Hindi)

Mahashivratri Shayari in Hindi

Happy MahaShivratri Wishes in English

रामनवमी की हार्दिक शुभकामनाएं

Read More From Stories