लाईफस्टाईल

Mahatma Gandhi Information In Marathi : महात्मा गांधी यांची माहिती

Aaditi Datar  |  Sep 28, 2021
Mahatma Gandhi Information In Marathi

सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालताना आपल्या कर्तव्याचं पालन करण्याची शिकवण महात्मा गांधींना त्यांच्या आईकडून मिळाली होती. इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेल्यावर त्यांना अनेक वेळा अपमान सहन करावा लागला. पण तरीही ते सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर कायम राहिले. अशा अनेक घटना आहेत ज्या वरून तुम्हालाही प्रेरणा मिळेल. यासाठी वाचा महात्मा गांधींबद्दलची माहिती (Mahatma Gandhi Information In Marathi) तसंच गांधीजींचे विचार (mahatma gandhi quotes in marathi) ही वाचा आणि शेअर करा.

महात्मा गांधीजींचा जन्म (Mahatma Gandhi Birth)

राष्ट्पिता महात्मा गांधी यांचा जन्म गुजरातमधल्या पोरबंदरमध्ये 2 ऑक्टोबर 1869 ला झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचं नाव पुतलीबाई होतं. ब्रिटीश राजवटीत त्यांचे वडील पोरबंदर आणि राजकोट येथे दीवाण होते. महात्मा गांधी यांचं खरं नाव मोहनदास करमचंद गांधी होतं आणि आपल्या तीन भावंडांमध्ये ते सर्वात लहान होते. गांधीजींचं साधं आणि सरळ जीवन हे त्यांच्या आईवरून प्रेरित होतं. गांधीजींच पालन पोषण वैष्णव विचारांच्या कुटुंबात झालं आणि त्यांच्या जीवनावर प्रभाव पडला तो जैन धर्माचा. ज्यामुळे त्यांचा सत्य आणि अहिंसेवर अतूट विश्वास होता आणि आजीवन त्यांनी त्यांचं पालन केलं.

महात्मा गांधींची शिक्षा आणि दीक्षा (Mahatma Gandhi Mahiti And Shiksha)

गांधीजींचं प्राथमिक शिक्षण हे पोरबंदरमध्ये झालं होतं. पोरबंदरमध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षणाची सुरूवात केली आणि त्यांच्या वडिलांची बदली राजकोटला झाली. त्यामुळे त्यांचं नंतरच शिक्षण राजकोटलाच झालं. 1887 साली राजकोट हायस्कूलमधून त्यांनी मॅट्रीकची परीक्षा पास केली आणि पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी भावनगरच्या सामलदास कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण ते घरापासून दूर असल्याने त्यांना लक्ष केंद्रित करता आलं नाही आणि अस्वस्थ होऊन ते पोरबंदरला परत आले. 4 सप्टेंबर 1888 ला ते इंग्लंडला रवाना झाले. लंडनमध्ये गांधीजी लंडन व्हेजिटेरियन सोसायटीच्या संमेलना भाग घेऊ लागले आणि ते त्याचे कार्यकारी सदस्यही बनले. इथे 3 वर्षांपर्यंत राहून त्यांनी आपलं बॅरिस्टरच शिक्षण पूर्ण केलं आणि 1891 मध्ये ते भारतात परत आले. पण भारतात गांधीजींना वकिली जमली नाही. 1893 मध्ये गुजराती व्यापारी शेख अब्दुल्ला यांचा वकील म्हणून काम करण्यासाठी गांधीजी दक्षिण अफ्रिकेला गेले. गांधीजींच्या आफ्रिका प्रवासाने त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. जवळपास 23 वर्षांच्या मोहनदास यांना तेव्हा कदाचितच माहीत असेल की, पुढची 21 वर्ष ते दक्षिण अफ्रिकेत व्यतित करणार आहेत. महात्मा गांधी यांची माहिती (mahatma gandhi information in marathi) वाचताना दक्षिण आफ्रिकेचा उल्लेख हा फार महत्त्व पूर्ण आहे. गांधीजीनी दक्षिण आफ्रिकेत प्रवासी भारतीयांच्या अधिकार आणि ब्रिटीश शासकांच्या रंगभेद नीतीविरूद्ध यशस्वी आंदोलन केलं. दक्षिण आफ्रिकेमध्ये केलेल्या त्यांच्या सामाजिक कार्याची पोच भारतातही मिळाली. 1915 साली जेव्हा ते कायमस्वरूपी भारतात परतले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मुंबईचे अनेक कॉग्रेस नेते पोचले होते. या नेत्यांमध्ये गोपाळ कृष्ण गोखलेही होते. ज्यांना गांधी आपले राजकीय गुरू मानत होते. गांधीच्या परत येण्यामागे गोखले यांची प्रमुख भूमिका होती. भारतात आल्यानंतर 1915 साली गुजरातमधील अहमदाबादमध्ये गांधीनी सत्याग्रह आश्रमाची स्थापना केली. इथून पुढच्या त्यांच्या स्वांतत्र्यलढाच्या प्रवासाची माहिती (mahatma gandhi mahiti) आपण गांधीजींच्या जीवनीमध्ये आणि शाळेच्या इतिहासात अनेकदा वाचली आहेच.

गांधीजींच वैवाहीक जीवन (Married Life Of Gandhiji)

गांधीजींचा विवाह 1883 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी कस्तुरबा यांच्याशी झाला होता. लोक त्यांना प्रेमाने ‘बा’ अशी हाक मारत. कस्तुरबा गांधी यांचे वडील एक श्रीमंत व्यवसायी होते. लग्नाआधी कस्तुरबा यांना लिहीता-वाचता येतं नव्हतं. पण गांधीजींनी त्यांना लिहायला-वाचायला शिकवलं. एका आदर्श बायकोप्रमाणे त्यांनी गांधीजींच्या प्रत्येक कामात त्यांची साथ दिली. 1885 मध्ये गांधीजींच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला. पण काही काळातच त्याचं निधन झालं.

महात्मा गांधींचा मृत्यू (Mahatma Gandhi Death)

30 जानेवारी 1948 साली संध्याकाळी 5 वाजून 17 मिनिटांनी नथुराम गोडसे आणि त्याचा सहकारी गोपाळदासने बिर्ला हाऊसमध्ये गांधीजीची गोळी मारून हत्या केली. गांधीजीना तीन गोळ्या मारण्यात आल्या होत्या. अंतिम क्षणी त्यांच्या तोंडून ‘हे राम’ हे शब्द बाहेर पडले होते. त्यांच्या मृत्यूनंतर नवी दिल्ली राजघाट येथे त्यांचं समाधी स्थळ बनवण्यात आलं आहे. महात्मा गांधीची यांची माहिती (mahatma gandhi information in marathi) तर महत्त्वपूर्ण आहेच. त्यांच्या जन्मदिवसाला आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवसाच्या स्वरूपात साजरा करण्यात येतं.

Read More From लाईफस्टाईल