बॉलीवूड

‘काळे धंदे’ उघड झाल्यामुळे आता होणार भलभल्यांचे वांदे

Trupti Paradkar  |  Sep 5, 2019
‘काळे धंदे’ उघड झाल्यामुळे आता होणार भलभल्यांचे वांदे

सध्याचा जमाना हा वेबसिरिजचा आहे. त्यामुळे एकामागून एक निरनिराळ्या विषयांवर आधारित वेबसिरिज येत आहेत. दिग्गज अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरदेखील सध्या एका वेबसिरिजमधून डिजिटल माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहेत. या वेबसिरिजचे नाव काळे धंदे असं असून  त्याच महेश मांजरेकर, संस्कृती बालगुडे, शुंभकर तावडे, निखिल रत्नपारखी, ओंकार राऊत, ऋतुराज शिंदे आणि नेहा खान प्रमुख भूमिकेत असणार आहेत. रामचंद्र गावकर दिग्दर्शित या वेबसिरिजमध्ये महेश मांजरेकरांची भूमिका महत्त्वाची असणार असल्याचं म्हटलं जात आहे. अर्थातच ही वेबसरिज कॉमेडी असल्याचं तिच्या पोस्टरवरील कॅप्शनवरून वाटत आहे कारण या पोस्टरसोबत “होणार भल्या भल्यांचे वांदे जेव्हा उघड होणार लपवलेले काळे धंदे” असं लिहीलेलं आहे. या पोस्टरमध्ये शुभंकर तावडे आणि संस्कृती बालगुडे महेश मांजरेकरांच्या मागे लपलेले दिसत आहेत. एका लव्हेंडर रंगाच्या फरच्या हार्टमागे  ते लपलेले आहेत. ज्यावरून या दोघांच्या काळ्या धंद्यांचा महेश मांजरेकर पर्दाफाश करणार असं वाटत आहे. महेश मांजरेकर यांच्या हातात दोन बंदूकदेखील आहेत. त्यामुळे नेमकं असं या वेबसिरिजमध्ये काय आहे याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागलेली दिसून येत आहे. अर्थातच हे काळे धंदे नेमके कोणते असणार हे वेबसिरिज पाहिल्याशिवाय लक्षात येणार नाही. मात्र या पोस्टर, शीर्षक आणि पोस्टरसोबत शेअर केलेलं कॅप्शन प्रेक्षकांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. 

काळे धंदे कधी होतेय प्रदर्शित

काळे धंदे ही वेबसिरिज झी 5 या अॅपवरून येत्या 24 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. काळे धंदे वेबसिरिज एकूण आठ भागात प्रदर्शित केली जाणार आहे. दिग्दर्शक रामचंद्र गावकर यांनी शेअर केलं की, “काळेधंदे वेबसिरिजच्याय प्रत्येक भागातील प्रत्येक सीनमध्ये प्रेक्षकांना खमंग कॉमेडीची मेजवानी मिळेल. यातील प्रत्येक परिस्थिती प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवेल ज्यातून पुढे अनेक विनोदी किस्से घडत जातील. शिवाय महेश मांजरेकर या वेबसिरिजच्या माध्यमातून पहिल्यांदाच डिजिटल माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.” बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व नुकतेच संपले आहे. त्यामुळे महेश मांजरेकरांना आणखी एका वेगळ्या भूमिकेत पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. 

नेहा खानची असणार का बोल्ड भूमिका

काही दिवसांपूर्वी नेहा खानने तिच्या अकाऊंटवरून काळेधंदेचं पोस्टर शेअर केलं होतं. त्यात तिने लिहीलं होतं की माझं आगामी प्रोजेक्ट. एकाच लफड्यातून अनेकांचे गेम होणार. सगळ्यांचे काळे धंदे आता उघडे पडणार, तुम्ही मात्र हसून हसून येडे होणार!  येतेय तुमच्या भेटीला नवीन सिरिज काळे धंदे! नेहा खानने शिकारी चित्रपटात बोल्ड भूमिका केली होती. काळे धंदे मध्ये नेहाची भूमिका बोल्ड असणार का हे पाहण्यासाठी काळे धंदे पाहायलाच हवी. नेहाने मराठी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी काही मल्याळम चित्रपटातून काम केले आहे. युवा या हिंदी चित्रपटात छोटी भूमिका साकारली होती. शाहरूख खान सोबत तिने हिंदी जाहीरातीत देखील काम केलेलं आहे.  

फोटोसौजन्य –  इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

टीव्हीवरील 5 प्लस साईज अभिनेत्री, ज्यांना वजनापेक्षा टॅलेंट वाटतो महत्त्वाचा

करण जोहरला मिळाला आणखी एक नवा चेहरा… हा स्टार किड करणार ‘दोस्ताना 2’

#BBM2 ही दोस्ती तुटायची नाय….

 

Read More From बॉलीवूड