नाते दृढ करण्यासाठी अनेक जण चुकीच्या पद्धतीचा अवलंब करतात. त्यामुळे नाते घटट् व्हायचे सोडून नात्यात कटुता यायला लागते. नाते दृढ करण्यासाठी अगदी साध्या साध्या गोष्टी करायच्या असतात. नात्यातील प्रत्येक गोष्ट ही पैशाने तोलली जात नाही. तर त्यात प्रेम महत्वाचे असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचेही नाते होऊ शकते अधिक दृढ. तुमच्या नात्यात तुम्हाला दुरावा येतोय असे वाटत असेल तर तुम्हाला नेमंक काय करायला हवं ते पाहुया…
कधीही बोलू नका खोटं
नात्यात सगळ्यात महत्वाचा असतो तो विश्वास. विश्वासावरच सगळे नाते टिकून असते. त्यामुळे कधीही खोटं बोलू नका. अनेकांना एकदा खोटं बोलले म्हणून काय झाले? असे वाटते. पण नात्यात जर तुम्हाला कधीही कोणता संशय़ नको असेल तर तुम्ही कधीही खोटं बोलू नका. कारण एक खोटं बोलायला तुम्ही जाल त्याचा वाईट परिणाम तुमच्या नात्यात होईल
उदा. काही कामानिमित्त तुम्हाला अचानक बाहेर जावे लागणार असेल. जोडीदाराला ही गोष्ट सांगायची राहून गेली असेल तर तुम्हाला जेव्हा लक्षात येईल त्यावेळी आवर्जून मेसेज करा. एक टेक्स्ट मेसेज करायला हल्ली फारसा वेळ जात नाही.
आता वरील परिस्थितीत तुम्हाला कामामुळे वेळ मिळाला नाही म्हणून मेसेज करणे राहून गेले तर ठीक आहे. जर तुम्ही काम सोडून कोणाला तरी भेटायला बाहेर जाणार असाल तर ते देखील तुम्ही तुमच्या पार्टनरला सांगा.तुम्ही त्याला किंवा तिला काहीतरी गैरसमज होईल म्हणून सांगणे टाळत असाल तर लक्षात ठेवा तुम्ही काहीतरी लपवत आहात असे समोरच्याला वाटेल त्यापेक्षा तुम्ही जर सांगून गेलात तर तुमच्या जोडीदाराचा तुमच्यावरील विश्वास अधिक दृढ होईल.
रिलेशनशीपमध्ये तुमच्यासोबतही होत असेल असे तर आताच करा ब्रेकअप
वेळ द्या
तुम्हाला कितीही वेळ नसेल. तुम्हाला प्रत्यक्षात भेटता येणं शक्य नसेल पण नात्यात तुम्हाला एकमेकांसाठी वेळ काढणे गरजेचे असते. 24 तासात तुम्हाला तुमच्या जोडीदारासाठी वेळ काढताच आला पाहिजे तो वेळ काढता येणार नसेल तर तुम्ही कोणत्याही रिलेशनशीपमध्ये राहू नका. नात्यात एकमेकांना वेळ देणे ही खूप महत्वाची गोष्ट असते. वेळ देणे म्हणजे केवळ फोनवर बोलणे नाही. तुम्ही प्रत्यक्षातही त्या माणसाला जाऊन भेटायला हवे. तुम्ही त्याच्याशी गप्पा मारायला हव्यात. ज्या गोष्टी तुम्हाला फोनवर बोलता येत नाहीत. त्या तुम्हाला समोरासमोर बोलता येतात. त्यामुळे एकमेकांना वेळ द्या.
भांडणं वेळेत मिटवा
दोन वेगळ्या स्वभावाची माणसे एकत्र येणार म्हटल्यावर खटके उडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे कधीना कधी तरी भांडणं होणार. पण भांडण झाल्यानंतर रुसवा कितीवेळ टिकवून ठेवायचा याचाही विचार करायला हवा. तुम्ही जितका तुमच्यामध्ये दुरावा वाढवाल तितकाच तुम्हाला त्रास होईल. मनात नको नको ते विचार यायला लागतील. त्यामुळे भांडणं वेळीच मिटवायला शिका. तुमची चुकी नसेल तर मनाचा मोठेपणा दाखवून जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बोलायला घेतले तर भांडणं अधिक लवकर मिटतील. त्यामुळे नात्यात एकमेकांना माफ करुन पुढे जायला शिका.
उदा. तुमच्या जोडीदारासोबत क्षुल्लक कारणावरुन तुमचे भांडण झाले आहे. तुम्ही दोन दिवस एकमेकांशी बोलत नाहीत. अशावेळी तुमच्या मनात एकमेकांबद्दल संशय निर्माण होणे स्वाभाविक आहे. तुमचे विचार नकारात्मक दिशेने जाऊ लागल्यावर हीच ती वेळ आहे हे लक्षात घ्या आणि तातडीने भांडणं मिटवा.
रिलेशनशीपमध्ये गैरसमज होतायत? मग हे नक्की वाचा
संशयाला जागा नको
नात्यात एकदा संशय आला की, तो कधीच जात नाही हे लक्षात ठेवा. संशय गेला असे जरी तुम्हाला वाटत असेल तरी तो कधीच जात नाही. तुमच्यावर जोडीदाराचा संशय येईल असे वागू नका. सगळ्या गोष्टी पारदर्शक असून द्या. म्हणजे समोरच्याला तुमच्यावर संशय येणार नाहीच.
उदा. तुम्ही अगदी शॉपिंगसाठी उद्या जाण्याचा विचार केला असेल तर तुमच्या पार्टनरला त्याची पूर्वकल्पना द्या. या मागे दोन गोष्टी आहेत. एक तुम्ही उद्या कुठे आणि कोणासोबत जाणार आहात हे तुमच्या पार्टनरला कळते आणि दुसरे तुमचा फोन लागला नाही. तर त्याला जास्त टेन्शन येणार नाही कारण तुम्ही कुठे आहात हे त्याला माहीत असते.
तुमच्या खरे बोलण्याच्या सवयीमुळे तो तुम्हाला कधीच कुठल्या गोष्टीत रोखणार नाही.तुमच्यावर कायम त्याचा विश्वास राहील. तो तसाच राहायला हवा असेल तर नात्यात संशय येईल अशी कोणतीच गोष्ट करु नका.
एकमेकांचा आधार व्हा
माणूस हा कळपात राहणारा प्राणी आहे. त्याला एकमेकांवर अवलंबून राहायला आवडते. तो त्याचा स्वभाव आहे. त्यात मानवी आयुष्य म्हणजे चढ- उतार आलेचय तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात असे दिवस आले तर त्याचा आधार व्हा. त्याला अडचणीत कधीच एकटं सोडू नका. तुम्हाला त्याची अडचण क्षुल्लक वाटली तर त्याच्यासाठी ती डोकेदुखी असू शकते. त्यामुळे अशावेळी तुम्ही त्याचा आधार होणे गरजेचे असते. तुमचे प्रेम खरे असेल तर तुम्ही अगदी वाईटातल्या वाईट परिस्थितीत तुमच्या जोडीदाराला सोडून जाणार नाही. त्याची नेमकी समस्या जाणून घेऊन त्यातून त्याला कसे बाहेर पडता येईल यासाठी मार्ग दाखवा. तुम्ही त्याच्या त्या काळातील राग, त्रागा, त्याची मानसिकता समजून घ्याल
उदा. तुमच्या जोडीदाराच्या घरात काही समस्या असेल तर ती तुम्ही समस्या समजून जोडीदाराला शांत करा आणि त्याला त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग सुचवा.
जबरदस्ती करु नका
नात्यात कोणीही एकमेकांवर जबरदस्ती करुन चालत नाही. ही जबरदस्ती कसल्याच बाबतीत नको.एखादी गोष्ट जोडीदाराला आवडत नसेल आणि ती तुम्हाला माहीत असेल तर ती करु नका. कारण मुद्दाम माहीत असून तसे करणे म्हणजे तुमच्या नात्यात कटुता आणणे आहे.
तुमचे निर्णय, तुमची आवड कोणावर लादू नका. दोन वेगळ्या माणसांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. सुदैवाने तुमची आवड निवड एक असेल तर चांगलेच आहे. पण नसेल तर तुमच्या सगळ्या गोष्टीची जबरदस्ती त्यांच्यावर नको.
डेटवर तुम्हीही करता का या चुका?
मनमोकळेपणा महत्वाचा
नात्यात तुम्ही एकमेकांची मने जाणून घेणे गरजेचे असते.तुम्ही जितके तुमच्या जोडीदारासमोर मोकळे व्हाल तितके तुम्ही एकमेकांच्या जवळ याल. त्यामुळे तुमच्यात मनमोकळा संवाद हवा. तुमच्यातील चांगली वाईट गोष्ट तुम्ही शेअर केली तर उत्तम.त्यामुळए लक्षात ठेवा तुमच्यात कायम मनमोकळा संवाद ठेवा.
उदा. तुमच्यासोबत घडलेला एखादा मजेशीर किस्सा तुम्हाला तुमच्या जोडीदाराला सांगावासा वाटत असेल तर नक्की सांगा. तुमच्या मनमोकळेपणाने समोरची व्यक्तिही त्याच्या काही आठवणी सांगते. आणि मग यामुळेच तुम्ही एकमेकांना अधिक जाणून घेता. तुम्हाला एकमेंकाबद्दल स्वभावाबद्दल अधिक कळत जाते.
आदर महत्वाचा
नात्यात प्रेम असले तरी आदर हा महत्वाचा असतो. तुम्ही एकमेकांचा आदर ठेवायला आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला असे करुन चालत नाही. तुमच्या जोडीदारालाही तुम्ही नेहमीच आदराने वागवायला हवे. हा आदर फक्त दुसऱ्यांसमोर नको तर चार भिंतीतही असायला हवा. आदर दिला तरच आदर मिळतो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि एकमेकांना नेहमी सन्मानाने वागवा.
उदा. आदरार्थी बोलणे म्हणजे अहो किंवा मान देणे इतकेच नाही. तर आदर हा तुम्ही करत असलेल्या कामाचा असतो. तू अगदीच क्षुल्लक काम करते. तुला कसलं आलं टेन्शन असे जोडीदाराने अजिबात म्हणता कामा नये कारण तुमचे असे वागणे तुमच्यात दुरावा आणण्याचे काम करत असते.
पाहायला गेलं तर वर सांगितलेल्या गोष्टी या क्षुल्लक असतील. पण तुमचे नाते याच लहान लहान गोष्टी दृढ करु शकतात. या व्यतिरिक्त तुम्हाला नात्यात आणखी काय महत्वाचे वाटते ते आम्हाला नक्की सांगा
(फोटो सौजन्य- Shutterstock,Giphy)
Read More From Love
(70+ Best) Birthday Wishes For Girlfriend In Marathi | तुमच्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
Dipali Naphade
120+ Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
Trupti Paradkar