Recipes

अक्रोडचा वापर करून तयार करा या स्वादिष्ट रेसिपीज

Trupti Paradkar  |  Jul 8, 2020
अक्रोडचा वापर करून तयार करा या स्वादिष्ट रेसिपीज

लॉकडाऊनमुळे अनेकांमध्ये कुकींगची आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे घरोघरी आज काय स्पेशल ? हा प्रश्न नकीच विचारला जात आहे. असं असलं तरी जेवणाची वेळ सोडली तर सकाळी आणि संध्याकाळी नाश्ता काय करायचा हे मात्र सध्या एक मोठं कठीण काम होऊन बसलं आहे. एकतर या लॉकडाऊनच्या काळात अगदी पारंपरिक डिशपासून जवळजवळ सर्वच डिश प्रत्येक घरी ट्राय करून झाल्या आहेत. त्यामुळे नेहमीपेक्षा काहीतरी नवीन करावं असं प्रत्येकाला वाटत आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अगदी नवीन आणि काहिशा स्पेशल डिश शेअर करण्याचा प्रयत्न करत आहोत. 

स्वयंपाकाची आवड असली तरी सध्या जवळजवळ सर्वांनाच ऑफिसचं कामदेखील घरातून करावं लागत आहे. ज्यामुळे वर्क फ्रॉम होम करण्याऱ्या लोकांना आवड असूनही स्वयंपाक घरात फार वेळ घालवणं शक्य नाही.तुमची मधल्या वेळेची भुक भागवण्यासाठी या रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडतील कारण त्या मुळीच वेळकाढू नाहीत.

निरोगी जीवनासाठी दररोज मुठभर अक्रोड (California Walnuts)  खा असं सर्व आरोग्यतज्ञ्ज सांगतात. पण अक्रोड नुसते खाणं कंटाळवाणं असतं. यासाठीच आज आम्ही तुमच्यासोबत अक्रोडापासून तयार करण्यात येणाऱ्या काही गोड आणि तिखट रेसिपीज शेअर करत आहोत. ज्या तुम्ही तुमच्या लागोपाठ होणाऱ्या व्हर्चुअल ऑफिस मिटींग्स, ऑफिस वर्क, ऑनलाईन कोर्सेस आणि अगदी घरातील जबाबदाऱ्यादेखील सांभाळून करू शकता. या स्नॅक्समुळे तुमची मधल्या वेळेची भुक तर भागेलच शिवाय अक्रोडमुळे तुमचं योग्य पोषणही होईल. या रेसिपिज आमच्यासोबत शेअर केल्या आहेत शेफ वरूण इनामदार आणि शेफ सब्यसाची गोराय यांनी तेव्हा पाहा आणि झटपट करा या अक्रोड रेसिपीज

कॅलिफोर्निया अक्रोड चौपाटी भेळ पुरी (शेफ वरूण इनामदार)

साहित्य –

चार कप लाह्या, दोन बारीक चिरलेले कांदे, दोन बारिक चिरलेला टोमॅटो, दोन चिरलेल्या मिरच्या, चार चमचे पुदिन्याची चटणी, चार चमचे चिंचेची गोड चटणी, एक चमचा चाट मसाला, पाव कप चणा डाळ, पाव कप भाजलेले चणे, मीठ चवीनुसार, अर्धा कप जाडसर चॉप केलेले कॅलिफोर्निया अक्रोड, पाव कप शेव आणि दहा ते पंधरा पापडी पुरी  

भेळ करण्याची कृती –

Chef Varun Inamdar

कॅलिफोर्निया अक्रोडचे इन्स्टंट लोणचे ( शेफ वरूण इनामदार)

साहित्य – 

एक कप कॅलिफोर्निया अक्रोड, कडीपत्ता, मोहरीचे तेल

लोणचं मसाला –

एक चमचा मीठ, दोन चमचे व्हाईट व्हिनेगर, एक चमचा लाल तिखट, एक चमचा रेड चिली फ्लेक्स,  अर्धा चमचा धना पावडर, एक चमचा मोहरीची पावडर, अर्धा चमचा काळीमिरी पावडर, पाऊण चमचा मेथी पावडर, अर्धा चमचा बडिशेप पावडर

लोणचं तयार करण्याची कृती –

Chef Varun Inamdar

नो बेक वॉलनट कोका चेरी बार ( शेफ सब्यसाची गोराय)

साहित्य –

अर्धा कप ओल्ड फॅशन ओट्स,दहा बारा खजूर, अर्धा कप अक्रोड, अर्धा कप सुकलेल्या चेरीज, दोन चमचे कोका पावडर, अर्धा चमचा मीठ 

केक करण्याची कृती –

Chef Sabyasachi Gorai

या रेसिपीज तयार करा आणि कंमेट बॉक्समध्ये आमच्यासोबत त्याचे फोटोदेखील शेअर करा. या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या तेही आम्हाला कळवा.

अधिक वाचा –

दररोज काहीतरी नवीन स्वयंपाक करण्यासाठी ट्राय करा या ‘टॉप 25’ भारतीय डिनर रेसिपीज

तोंडाची चव बदलतील या 5 चटकदार रेसिपी,नक्की करुन पाहा

विविध राज्यातील खास चटकदार चटण्या

Read More From Recipes