घरात लग्नकार्य असेल तर लग्नाची धामधूम सुरु होते. लग्नाच्या सगळ्या तयारीला कितीही वेग असला तरी देखील तो कमीच असतो. लग्नाच्या या काळात आपल्या भावनांना बांध फुटतो. आनंद, दु:ख असे हळवे क्षण या दरम्यान येत असतात. त्याला सामोरे जाण्याखेरीज काही पर्यायही नसतो. या प्रत्येक क्षणाचा आनंद हा घेताच आला पाहिजे. यासाठी लग्न कविता मराठी Marathi Lagna Patrika Wordings Kavita निवडल्या आहेत. लग्नादरम्यानच्या वेगवेगळ्या कार्यक्रमासांसाठी तुम्ही या छान कविता मांडू शकता. लग्न पत्रिका संदेश यावरही कविता लिहू शकता. marathi lagna patrika kavita या तुमच्या मनात दाटलेल्या भावनांना नक्कीच वाट करुन देणाऱ्या आहेत.
Table of Contents
लग्न पत्रिका कविता मराठी – Marathi Lagna Patrika Wordings Kavita
लग्न पत्रिकेत हटके कविता असावी असे तुम्हाला वाटत असेल तर लग्न कविता मराठी Marathi Lagna Patrika Wordings Kavita मधील काही निवडक कविता तुम्ही निवडू शकता. या कविता तुमच्या पत्रिकेला चारचाँद लावतील.
- एक क्षण मंगल प्रहराचा, एक क्षण मेंहदीच्या बहराचा
एक क्षण लगीन घाईचा, एक क्षण शुभ शहनाईचा
एक क्षण जन्मगाठीचा, एक क्षण लग्न लग्नगाठीचा - लग्नामुळे जुळतात सासर आणि माहेर,
तुमची उपस्थिती हाच आमचा आहेर - तुमचा आशीर्वाद सदैव राहो आमच्या पाठीशी,
नक्की या, जुळताना _____ आणि ____ च्या रेशीमगाठी - लग्नकार्य म्हणजे सुख- आनंदाची सभा,
तुमच्या येण्याने वाढेल समारंभाची शोभा - लग्न म्हणजे काय?
कुणाचा तरी विश्वास
लग्न म्हणजे आयुष्यभराची साथ,
लग्न म्हणजे हळुवारपणे घातलेली कुणाला तरी साद,
लग्न म्हणजे मैत्रीही,
लग्न म्हणजे नात्यातला गोडवा आणि दोन कुटुंबाशी जोडणारा
एकमेव दुवाही - हे प्रेमाचे धागे…
नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले - मंगल बोला, मंगल बोला,
_____ चा आला लग्नसोहळा,
सगे सोयरे मंगलवाद्ये,
वाजूनी अक्षता मोदे,
गुलाबी थंडीत शीतल वारा,
दवबिंदूचा उडवी फवारा,
देती सर्वच शुभाशिर्वाद,
सदा सर्वदा सुखात नांदो, द्या आम्हाला हा आशीर्वाद - गगन मंडपी चमकून गेली विजेची एक रेघ,
वाजत गाजत मागून आले काळे काळे मेघ,
वरातीतून हळूच आला मृदगंधित वारा,
नवरदेवावर उधळण्या गार गार या गारा,
नवरोबांचे आगमनझाले वादळवाटेवरुनी,
तप्त वधुही वाट पाहते डोळ्यात प्राण आणूनी
भावनिक मराठी लग्न कविता – Emotional Marathi Lagna Kavita
प्रत्येक मुलीसाठी लग्न हा एक भावनिक क्षण असतो. आई-बाबांचे घर सोडून जाताना कंठ दाटून येतो. अशावेळी मनात येणाऱ्या भावनांना वाट करुन देण्यासाठी भावनिक अशा मराठी लग्न कविता. रुखवताच्या ठिकाणी देखील अशी छान कविता तुम्हाला लिहून ठेवता येऊ शकते. हिंदू लग्न विधी कसा असतो हे देखील जाणून घ्या
- लग्न म्हणजे केवळ अडीच अक्षरे नव्हेत,
सात पावलांनी जोडले जाणारे जन्मभराचे ऋणानुबंधन,
आयुष्यातला एक अनोखा मनस्वी प्रसंग,
काही क्षण ह्रदयाच्या कप्प्यात साठवण्यासाठी,
तर काही डोळ्यांच्या पापण्यांवर ओथंबण्यासाठी
आयुष्य जतन करण्यासाठीच आनंदी सोहळे साजरे करताना,
साथ आशीर्वाद हवेत सज्जनांचे - लग्न म्हणजे दोन जीवांचे मधूर मिलन,
सनई-चौघड्यांच्या स्वरात नवजीवनात केलेले पदार्पण,
सुख -स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन,
सासर- माहेरच्या नात्याची मंगळसूत्रात केलेली पवित्र अशी गुंफण,
यासाठी हवा तुमचा शुभाशीर्वाद,
शुभेच्छांची सुखद रम्य पखरण, त्यासाठी तुम्हाला हे आग्रहाचे निमंत्रण - लग्न म्हणजे काय?
लग्न म्हणजे एक रेशीमगाठ,
जशी सोनेरी किरणांची पहाट,
कडू आणि गोड क्षणांची लाट,
जन्मभर समजूतदारपणाची साथ - हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो आपला संसार,
लग्नाचा क्षण आहे खास - आई बाबा थोर तुझे उपकार,
हे विश्व दाखवून केला तुम्ही माझ्या जीवनाचा उद्धार,
अशक्य आहे फेडणे या जन्मीचे तुमचे उपकार
प्रेमपूर्ण मराठी लग्न कविता – Romantic Lagna Kavita In Marathi
लग्न म्हणजे प्रेम.. हे प्रेम केवळ दोन व्यक्तींचे नसते तर दोन कुटुंबाचे असते. एकमेकांना समजून घेत दोन कुटुंबाचा हा प्रवास सुरु होतो. या प्रवासाची सुरुवात प्रेमपूर्ण मराठी लग्न कविता यांनी करायला काहीच हरकत नाही. जाणून घेऊया Romantic Marathi Lagna Kavita
- समईला साथ असते ज्योतीची,
अंधाराला साथ असते प्रकाशाची,
चंद्राला साथ असते चांदण्यांची,
प्रेमाला साथ असते फक्त दोघांची - महासागराहूनही खोल असावे दोघांचे नाते,
आकाशापेेक्षाही उंच असावे दोघांचे नाते,
मागणी आहे देवाकडे सदा कायम राहावे दोघांचे नाते,
आयुष्यातील प्रेमळ क्षण तुम्ही साजरे करावे - अनमोल जीवनात
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेरपर्यंत
हाथ तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे तरीही,
न डगमगणारा विश्वास तुझा हवा आहे - तुझ्यापासूनच सुरु होऊन
तुझ्यापर्यंतच असे माझे जग,
तुझ्या अवती भोवती फिरे
असेच असावे,
असेच राहावे,
आयुष्यभर
- विश्वासाचे बंधन असेच कायम राहावे,
दोघांच्या जीवनात तुमच्या प्रेमाचे वलय यावे,
एकच मागणी आहे आता परमेश्वर चरणी,
जीवन दोघांचे आनंदाने आणि समृद्धीने भरुन जावे - लग्न म्हणजे लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या बेफिकिरीला
तिच्या जाणीवांचं कोंदण हवं,
त्याच्या चुकांना
तिच्या पदराच पांघरुण असतं - प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्यात
साथ देणाऱ्या एका साथीदाराची गरज असते,
अन प्रत्येक मुलाला त्याच्या आयुष्यात त्याच्यावर
प्रेम करणाऱ्या एका मुलीची गरज असते,
अन त्यासाठी दोघांनाही अतूट नात्याची गरज असते,
अनं ते नातं म्हणजे ‘लग्न’ - तुझ्यासारखा नवरा मिळणे,
हे माझ्या आयुष्याचे पुण्य आहे,
आणि जीवापाड प्रेम करणारा नवरा मिळणं,
हे भाग्य असतं - कधी समझोता तर कधी भांडण असतं,
तो चिडला तरी त्याने शांत राहायचं असतं,
कपाटातल्या वादळाला चहाबरोबर संपवायचं असतं,
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
प्रेमाचं ते बंधन असतं - लग्न म्हणजे एक विश्वास,
दोघांना एकमेकांची साथ,
असाच ठेवावा अतुट विश्वास,
आज होणार या नात्याची सुरुवात
मराठी लग्न कविता चारोळ्या – Marathi Lagna Kavita Charolya
लग्नात एकमेकांची साथ ही फारच गरजेची असते एकमेकांची साथ देताना दिवसामागून दिवस जातात. अशा वेळी लग्न कविता (marathi kavita on lagna) आपल्याला सुंदर आठवण देऊन जातात. कधी वर्ष सरत ते कळत नाही. जश्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा या आनंदात भर घालू शकतात तसंच लग्न कविताही घालतात.
- तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं,
तू रुसवा आणि मी तुला मनवावं असं आपलं नात हवं,
करुया आज आपण या गोड नात्याची सुरुवात - विश्वाचे नाते कमजोर होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका,
जोडी तुमची अशीच टिकून राहो, हीच इश्वरचरणी प्रार्थना - हळदीचा वास, मेंदीचा रंग,
खुलवेल तुमच्या आयुष्याच्या प्रेमाचा रंग - प्रेमाचे तसे नाते,
हे तुम्हा उभयंताचे नाते,
तुमच्या सुखी संसाराची वाटचाल,
सुख दु:खात मजबूत राहिली
एकमेकांची आपआपसातील,
आपुलकी माया- ममता,
नेहमीच वाढत राहिली क्षणाक्षणाला - विश्वास आणि प्रेम प्रत्येक
नात्यात असते महत्वाचे,
जपावे हेच संसारात
कायमचे
लग्नाच्या या खास आनंदाच्या प्रसंगी तुम्ही अशा छान मराठी लग्न कविता नक्की शेअर करायला हव्यात. या मराठी लग्न कविता तुमच्या लग्नातील सगळ्या सोहळ्यांना चारचांँद नक्कीच लावतील.
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade