xSEO

मराठी चित्रपट नवीन 2021 | Marathi movies 2021

Vaidehi Raje  |  Mar 30, 2022
new marathi movies 2021

गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीने कात टाकली आहे. त्याच त्याच विषयांवर साचेबद्ध चित्रपट न बनवता निर्माते व दिग्दर्शक अनेक उत्कृष्ट विषय हाताळत आहेत. काही पारंपरिक तर काही बोल्ड विषयांवरचेही चित्रपट गेल्या काही वर्षांत आपण बघितले. मराठी चित्रपटसृष्टी आता अधिक प्रयोगशील झाली आहे व नव्या पिढीच्या मराठी प्रेक्षकांनीही या वेगळ्या विषयांवरच्या मराठी चित्रपटांना अगदी मनापासून दाद दिली आहे. यातील काही उत्कृष्ट चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले. अनेक चित्रपट देश -विदेशांत नावाजलेल्या चित्रपट महोत्सवांत देखील दाखवले गेले. वेगळा व संवेदनशील विषय हाताळणाऱ्या काही मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. श्वास हा चित्रपट आल्यापासून मराठी चित्रपटांचे  निर्मितीमूल्य आणि आशय अधिक सशक्त होत चालला आहे. मराठी चित्रपटांना जागतिक सिनेमाची भाषा गवसली आहे. त्यामुळे आता येणारे चित्रपट वैश्विक पातळीवर काहीतरी सांगताना दिसत आहेत. 2021 साली कोरोनाचा प्रभाव असून देखील अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपट (Marathi Movies 2021)  आले. लोक चित्रपटगृहांत जाऊ शकत नव्हते तरी त्यांनी घरातूनच OTT प्लॅटफॉर्म्सवरून मराठी नवीन चित्रपट (New Marathi Movies 2021) बघितले आणि जशी चित्रपटगृहे सुरु झाली तेव्हा तिथेही मराठी प्रेक्षकांनी त्यांचे आवडते मराठी चित्रपट बघण्यासाठी गर्दी केली. चला तर बघूया 2021 साली कोणते नवीन मराठी चित्रपट आले. 

2021 साली आलेले नवीन मराठी चित्रपट ।  Marathi Movies Released In 2021

मागच्याही  वर्षी कोरोनाने थैमान घातले होते. दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागले असूनही अनेक दर्जेदार चित्रपट आपल्याला बघायला मिळाले. मराठी चित्रपट नवीन 2021 पैकी उत्तमोत्तम चित्रपटांबद्दल जाणून घ्या. 

मराठी चित्रपट नवीन 2021
  1. पीटर 

कलाकार: मनीषा भोर, प्रेम बोऱ्हाडे, अमोल पानसरे

दिग्दर्शक : अमोल अरविंद भावे

प्रदर्शन तारीख: 22-01-2021

  1. ओह माय घोस्ट

   कलाकार: अपूर्व देशपांडे, कुरुष देबू अभिनेता, काजल शर्मा, पंकज विष्णू, प्रथमेश परब

दिग्दर्शक: वसीम खान

प्रदर्शन तारीख: 12-02-2021

  1. एक ती

कलाकार: प्रेमा किरण, विजय कदम, अनिकेत केळकर

दिग्दर्शक : अमर पारखे

प्रदर्शन तारीख: 12-02-2021

  1. कानभट

कलाकार: भव्य शिंदे, मनीषा जोशी, अनिल छत्रे, रुग्वेद मुळे, संजीव तांडेल

दिग्दर्शक: अपराणा एस होसिंग

प्रदर्शन तारीख: 19-02-2021

  1. प्रीतम

कलाकार: नक्षत्र मेढेकर, प्रणव रावराणे, आभा वेलणकर, अजित देवरे

दिग्दर्शक: सिजो रॉकी

प्रदर्शन तारीख: 19-02-2021

  1. बेफाम

कलाकार : सखी गोखले, सिद्धार्थ चांदेकर, कमलेश सावंत, नचिकेत पूर्णपात्रे, सीमा देशमुख

दिग्दर्शक : कृष्णा कांबळे

प्रदर्शन तारीख: 26-02-2021

  1. जीवन संध्या

कलाकार: रमेश देव, सीमा देव, समीर धर्माधिकारी, रवींद्र मंकणी, अशोक सराफ

दिग्दर्शक : दीपक प्रभाकर मांदाडे

प्रदर्शन तारीख: 09-11-2021

  1. जयंती

कलाकार: अमर उपाध्याय, किशोर कदम, अतुल महल्ले, रुतुराज वानखेडे, तितीक्षा तावडे

दिग्दर्शक : शैलेश बळीराम नरवडे

प्रदर्शन तारीख: 12-11-2021

  1. झिम्मा

कलाकार: सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी

दिग्दर्शक: हेमंत ढोमे

प्रदर्शन तारीख: 19-11-2021

  1. पिरेम

कलाकार: दिव्या सुभाष, विश्वजीत पाटील, विठ्ठल खलसे, प्रदीप लायकर

दिग्दर्शक : प्रदीप लायकर

प्रदर्शन तारीख: 03-12-2021

  1. पांडू 

कलाकार : सोनाली कुलकर्णी, भाऊ कदम, कुशल बद्रिके, हेमांगी कवी, प्रवीण तरडे

दिग्दर्शक : विजू माने

प्रदर्शन तारीख: 03-12-2021

  1. बळी 

कलाकार: अभिषेक बचनकर, स्वप्नील जोशी, पूजा सावंत, समर्थ जाधव 

दिग्दर्शक: विशाल फुरिया

प्रदर्शन तारीख: 10-12-2021

  1. डार्लिंग

कलाकार: प्रथमेश परब, रितिका श्रोत्री, आभा वेलणकर, आनंद इंगळे, जयवंत वाडकर

दिग्दर्शक : समीर आशा पाटील

प्रदर्शन तारीख: 10-12-2021

  1. फ्री हिट दणका 

कलाकार : सोमनाथ अवघडे, अपूर्व शेलगावकर, अनिल नगरकर, अरबाज शेख, सुरेश विश्वकर्मा

दिग्दर्शक : सुनील गोविंद मगरे

प्रदर्शन तारीख: 17-12-2021

  1. ईमेल फिमेल 

कलाकार: विक्रम गोखले, निखिल रत्नपारखी, कांचन पगारे, दिप्ती भागवत, कमलेश सावंत

दिग्दर्शक : योगेश जाधव

प्रदर्शन तारीख: 17-12-2021

  1. हॅशटॅग प्रेम

कलाकार: मिताली मयेकर, सुयश टिळक, मिलिंद दास्ताने, संदीप पाठक, स्नेहा रायकर

दिग्दर्शक : राजेश बाळकृष्ण जाधव

प्रदर्शन तारीख: 17-12-2021

  1. जून 

कलाकार: नेहा पेंडसे, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, जितेंद्र जोशी

दिग्दर्शक: सुहृद गोडबोले

प्रदर्शन तारीख :  30-06- 2021 

  1. अजिंक्य 

कलाकार: भूषण प्रधान, प्रार्थना बेहेरे, पल्लवी पाटील, उदय टिकेकर

दिग्दर्शक: ए. कादिर 

प्रदर्शन तारीख : 19-11- 2021

  1. वेल डन बेबी 

कलाकार :  पुष्कर जोग, अमृता खानविलकर, वंदना गुप्ते, सोनाली खरे 

दिग्दर्शक :  प्रियांका तन्वर 

प्रदर्शन तारीख : 09-04-2021

  1. पेन्शन 

कलाकार: सोनाली कुलकर्णी, नीलांबरी खामकर, नारायण जाधव, सुमित गुट्टे 

दिग्दर्शक: पुंडलिक यशोदा लक्ष्मण धुमाळ 

प्रदर्शन तारीख : 27-02-2021

  1. बस्ता

कलाकार: सायली संजीव, पार्थ भालेराव, सुबोध भावे, भारत गणेशपुरे, शुभांगी गोखले

दिग्दर्शक: तानाजी घाडगे 

प्रदर्शन तारीख: 29-01-2021

  1. झॉलिवूड

कलाकार: अश्विनी लांडेकर, दिनकर गावंडे, काजल रंगारी, अनिल उत्तलवार, आसावरी नायडू

दिग्दर्शक: तृषान्त इंगळे 

प्रदर्शन तारीख: 09-04-2021

  1. द डिसायपल

कलाकार: आदित्य मोडक , अरुण द्रविड 

दिग्दर्शक: चैतन्य ताम्हणे 

प्रदर्शन तारीख: 30-04-2021

  1. गोदावरी 

कलाकार: नीना कुलकर्णी, जितेंद्र जोशी, विक्रम गोखले 

दिग्दर्शक: निखिल महाजन 

प्रदर्शन तारीख: 03-12-2021

  1. फोटो-प्रेम 

कलाकार: नीना कुलकर्णी, अमिता खोपकर, विकास हांडे 

दिग्दर्शक: गायत्री पाटील, आदित्य राठी 

प्रदर्शन तारीख: 07-05-2021

अधिक वाचा – बेस्ट मराठी चित्रपटांची यादी 

2021 मध्ये गाजलेले मराठी चित्रपट । Hit Marathi movies 2021

 2021 साली गाजलेले मराठी चित्रपट कोणते होते ते बघूया. 

  1. बस्ता

कलाकार: सायली संजीव, पार्थ भालेराव, सुबोध भावे, भारत गणेशपुरे, शुभांगी गोखले

दिग्दर्शक: तानाजी घाडगे 

प्रदर्शन तारीख: 29-01-2021

आपल्याकडे एकदा लग्न ठरले की सर्वप्रथम तयारीला सुरुवात होते ती मुहूर्त आणि मग बस्ता बांधायच्या कार्यक्रमाने! बस्ता ही वर व वधूच्या कुटुंबाने एकमेकांसाठी तसेच नातेवाईकांसाठी आहेर व भेटवस्तू खरेदी करण्याची प्रक्रिया आहे. बस्ता हा चित्रपट नामदेव पवार नावाच्या एका कष्टाळू शेतकऱ्याबद्दल आहे ज्याची कमाई पावसावर अवलंबून असते. गावातील अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या मुलीही शेतकऱ्यांच्या मुलाशी लग्न करायला तयार नसतात.  नामदेवची मुलगी स्वाती हिला उत्पन्नाचा स्रोत म्हणून शेतीवर अवलंबून नसलेला वर हवा आहे.  4-5 मुलांना नकार दिल्यावर अखेर स्वाती एका सरकारी कर्मचारी असलेल्या मुलाला  होकार देते आणि नामदेव वराकडच्या सर्व मागण्यांना सहमती देतो कारण त्याला फक्त आपल्या लाडक्या मुलीला आयुष्यात आनंदी झालेले बघायचे आहे. पण खरंच स्वाती या लग्नामुळे सुखी होऊ शकेल का?

IMDB रेटिंग – * 7.9/10

बस्ता
  1. बळी  

कलाकार: अभिषेक बचनकर, स्वप्नील जोशी, पूजा सावंत, समर्थ जाधव 

दिग्दर्शक: विशाल फुरिया

प्रदर्शन तारीख: 10-12-2021

श्रीकांत नावाच्या एका विधुर गृहस्थाच्या आयुष्यात उलथापालथ होते जेव्हा त्याचा एकुलता एका सात वर्षांचा मुलगा मंदार,  खेळता खेळता अचानक बेशुद्ध पडतो.मंदारवर  उपचार करण्यासाठी आणि त्याच्या आजाराचे निदान करण्यासाठी त्याला रुग्णालयात नेले जाते. तिथे तो एलिझाबेथ नावाच्या एका गूढ नर्सशी बोलू लागतो जी आजारी मुलांना कायमचे बरे करण्याचा दावा करते आणि जी हॉस्पिटलच्या पडक्या, बंद बिल्डिंगमध्ये राहत असल्याचा दावा करते. गंमत म्हणजे एलिझाबेथ फक्त लहान मुलांनाच दिसते आणि त्यांच्याशीच एका खास फोनवरून संपर्क साधते. इतर मुलांसारखेच एलिझाबेथ मंदारलाही कायमचे बरे करेल की श्रीकांत त्याला एलिझाबेथपासून वाचवू शकेल? 

IMDB रेटिंग– * 6.8/10

बळी
  1. पांडू

कलाकार : सोनाली कुलकर्णी, भाऊ कदम, कुशल बद्रिके, हेमांगी कवी, प्रवीण तरडे

दिग्दर्शक : विजू माने

प्रदर्शन तारीख: 03-12-2021

पांडू आणि म्हादू हे महाराष्ट्रातील एका छोट्याशा खेड्यातील विनोदी कलाकार असतात. एकदा या दोघांकडे शक्तिशाली राजकारणी बाबासाहेब पठारे यांचे लक्ष वेधले जाते. विरोधी पक्षाचे लोक नेहेमी बाबासाहेबांच्या वाईटावर टपलेले असतात. बाबासाहेब पांडू आणि म्हादूच्या कामगिरीवर खुश होऊन त्यांना मुंबई पोलीस मध्ये नोकरी देतात.एका नाटकात पोलिस म्हणून काम केल्यानंतर ते मुंबई पोलिस दलात नोकरी करतात. पोलिस दलात ते थेट सामील झाल्याने इतर पोलिसांच्या डोळ्यांत ते खुपतात. म्हणून त्यांना योग्य प्रशिक्षण घेण्यास सांगितले जाते. ते दोघेही त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून पोलिस दलात पांडू हवालदार व म्हादू हवालदार म्हणून सामील होता. म्हादू लोकांकडून लाच घेणारा भ्रष्ट पोलिस बनतो. पण पांडू एक प्रामाणिक पोलिस असतो जो अट्टल गुन्हेगारांना अटक केल्यावर प्रसिद्ध होतो. पांडूची उषा केळीवाली या सुंदर स्त्रीशी भेट होते आणि दोघांचेही त्यांच्या कुटुंबाच्या आणि बाबासाहेबांच्या आशीर्वादाने लग्न लागते. परंतु यामागे विरोधी पक्षातील लोकांची बाबासाहेबांना संपवण्याची योजना असते. ती सफल होईल? पांडू हवालदाराला या षडयंत्राबद्दल कळेल की बाबासाहेबांच्या जीवाला धोका निर्माण होईल?  

IMDB रेटिंग– * 6.2/10

पांडू
  1. प्रीतम

कलाकार: नक्षत्र मेढेकर, प्रणव रावराणे, आभा वेलणकर, अजित देवरे

दिग्दर्शक: सिजो रॉकी

प्रदर्शन तारीख: 19-02-2021

प्रीतम ही कथा कोकणात घडते. कोकणच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या एका दूधवाल्याची ही कथा आहे. कथेतील नायक हा त्याच्या  काळ्या रंगाचा सामना करण्यासाठी संघर्ष करतो. प्रेमात खरंच शारीरिक सौंदर्य महत्त्वाचे आहे की मनाचे सौंदर्य या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेत चित्रपटाची कथा पुढे सरकते.काळया रंगामुळे सतत ऐकाव्या लागणाऱ्या टोमण्यांना  कंटाळून प्रीतमने त्याचे नशीब जवळजवळ मान्य केले असते आणि तो प्रतिकार करण्याचा प्रयत्नही करणे सोडून देतो. त्याचे मित्र आणि वडिलांसह संपूर्ण गाव त्याची थट्टा करत असते आणि यामुळे प्रीतमच्या स्वाभिमानाला मोठा धक्का बसतो. त्याची मदत करण्याची वृत्ती आणि यश कधीच विचारात घेतले जात नाही. अशातच सुवर्णा प्रीतमच्या गावात येते आणि तो बघताक्षणीच तिच्या प्रेमात पडतो. लवकरच, दोघे बोलू लागतात आणि प्रेमात पडतात. म्हणजे प्रीतमला असे वाटते की सुवर्णा त्याच्यावर प्रेम करते. पण सुवर्णा खरंच त्याच्यावर प्रेम करते का?

IMDB रेटिंग– * 7.3/10

प्रीतम

अधिक वाचापाहायला हवेत असे नवीन मराठी चित्रपट 2020 

  1. बेफाम

कलाकार : सखी गोखले, सिद्धार्थ चांदेकर, कमलेश सावंत, नचिकेत पूर्णपात्रे, सीमा देशमुख

दिग्दर्शक : कृष्णा कांबळे

प्रदर्शन तारीख: 26-02-2021

चित्रपटाचा नायक सिद्धार्थ याला लांबचे दिसत नसल्याचे निदान होते. सिद्धार्थ हा प्रसिद्ध न्यूरोसर्जन चिन्मय शारंगपाणी यांचा एकुलता एक मुलगा आहे. त्याच्या वडिलांची इच्छा आहे की त्यानेही डॉक्टर होऊन हॉस्पिटल सांभाळावे, तर सिद्धार्थला मात्र डॉक्टर व्हायचे नाही. त्याचे वडील त्याला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी सर्व काही करतात, परंतु तो वैद्यकीय प्रवेश परीक्षेत नापास होतो. रागाच्या भरात चिन्मय सिद्धार्थला सैन्यात भरती होण्यास सांगतो. सिद्धार्थला ही कल्पना आवडते आणि तो त्यासाठी मनापासून तयारी करतो. तथापि, त्याच्या शारीरिक चाचणीच्या दिवशी त्याच्या डोळ्यांच्या समस्येमुळे तो सैन्यात प्रवेश मिळवू शकत नाही, त्याचे वडील त्याला डॉक्टर होण्यासाठी राजी करतात, पण त्याची आई त्याच्या वडिलांना पटवून देते की त्यांनी सिद्धार्थला स्वतःचे करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे. अखेर सिद्धार्थ कोणते करियर निवडतो? 

IMDB रेटिंग– * 4.4/10

बेफाम

 2021 मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट । Best marathi movies 2021

2021 साली आलेल्या चित्रपटांपैकी कोणते चित्रपट सर्वोत्कृष्ट होते? वाचा. 

  1. पेन्शन 

कलाकार: सोनाली कुलकर्णी, नीलांबरी खामकर, नारायण जाधव, सुमित गुट्टे 

दिग्दर्शक: पुंडलिक यशोदा लक्ष्मण धुमाळ 

प्रदर्शन तारीख : 27-02-2021

जेव्हा एखाद्यावर कसेही करून उदरनिर्वाह करण्याची वेळ येते, तेव्हा एखादी व्यक्ती अशा टोकाला जाऊ शकते जिचा कुणी विचारही केला नसेल. पेन्शन ही अशाच एका महिलेची कथा आहे, विमल एक विधवा स्त्री आहे जी तिच्या आजारी सासूची काळजी घेत असते. तसेच तिचा तरुण मुलगा बाळू हा जीवनात यशस्वी व्हावा म्हणून ती सर्वतोपरी प्रयत्न करत असते. विमल सावकाराच्या घरी शिवणकाम करणे, दळणे आणि घरकामात मदत करणे यासारखी पडतील ती कामे करून पैसे  कमावते पण या तीन जणांचे कुटुंब मुख्यत्वे सासूला तिच्या दिवंगत पतीच्या सैन्याच्या नोकरीमुळे मिळणाऱ्या पेन्शनवर अवलंबून असते. पण जेव्हा तिची प्रकृती दिवसेंदिवस ढासळते तेव्हा विमलला तिचे भविष्य अंधकारमय वाटते कारण सासूची पेन्शन ती जिवंत असेपर्यंतच मिळेल. पण पुढे काय? उदरनिर्वाह कसा करणार हे प्रश्न विमलपुढे आ वासून उभे राहतात.  

IMDB रेटिंग– * 8 /10

पेन्शन
  1. डार्लिंग

कलाकार: प्रथमेश परब, रितिका श्रोत्री, आभा वेलणकर, आनंद इंगळे, जयवंत वाडकर

दिग्दर्शक : समीर आशा पाटील

प्रदर्शन तारीख: 10-12-2021

डार्लिंग ही एक उत्कृष्ट प्रेम कथा आहे. मुलगा आणि मुलगी एकमेकांवर प्रेम करतात आणि त्यांना त्यांचे आयुष्य एकत्र घालवायचे असते. परंतु नियतीच्या मनात मात्र काही वेगळेच असते. बबली (ऋतिका श्रोत्री) आणि तुषार (प्रथमेश परब) यांची प्रेमकहाणी अशीच आहे. त्यांचेही एकमेकांवर प्रेम आहे पण परिस्थितीच विचित्र असल्यामुळे ते एकत्र येऊ शकत नाहीत. पण बबली मात्र तुषारला सोडून आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेते आणि तिच्या पालकांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करण्यास सहमत होते. पण यातही अनेक ट्विस्ट येतात. कोणते ट्विस्ट ते चित्रपटात बघणे मनोरंजक ठरेल. 

IMDB रेटिंग– * 6.9 /10

डार्लिंग
  1. फोटो-प्रेम 

कलाकार: नीना कुलकर्णी, अमिता खोपकर, विकास हांडे 

दिग्दर्शक: गायत्री पाटील, आदित्य राठी 

प्रदर्शन तारीख: 07-05-2021

फोटो-प्रेम ही कथा माई या एक सर्वसामान्य गृहिणीची आहे. माई एका अंत्यसंस्काराला गेली असताना,तिच्या हे लक्षात येते की अशा परिस्थितीत लोक अनेकदा मृत व्यक्तीचा फोटो शोधतात जो त्याच्या/तिच्या आठवणीत ठेवता येईल. परंतु माईच्या हे लक्षात येते की ती फोटोफोबिक आहे. तिला फोटो काढण्याची भीती वाटते. म्हणून ती गेल्यानंतर ठेवण्यासाठी तिचा असा एखादा चांगला फोटोच नाही. यामुळे तिला असे वाटू लागते की ती कदाचित येणाऱ्या पिढ्या तिला विसरून जातील कारण फोटोशिवाय कुणीही तिची आठवण ठेवणार नाही. या काळजीमुळे ती कॅमेऱ्याच्या भीतीवर मात करण्यासाठी आणि स्वतःचा चांगला फोटो काढून घेण्यासाठी प्रयत्न करते. पण तिच्या मनासारखा फोटो तिला मिळू शकेल का? 

IMDB रेटिंग– * 7.2 /10

फोटो प्रेम
  1. जून 

कलाकार: नेहा पेंडसे, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, जितेंद्र जोशी

दिग्दर्शक: सुहृद गोडबोले

प्रदर्शन तारीख :  30-06- 2021 

जून या चित्रपटाची कथा औरंगाबाद मध्ये घडते. लेखक-निर्माता निखिल महाजन यांच्या स्वतःच्या बालपणातील आणि त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवरून प्रेरित ही कथा आहे.  जून ही अशा दोघांची कथा आहे ज्यांच्या आयुष्यात खूप काही वाईट घडतेय किंवा घडून गेलेय आणि त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर याचा परिणाम झाला आहे. हे दोघे योगायोगाने औरंगाबाद मध्ये एकमेकांना भेटतात आणि एकमेकांना बरे होण्यास मदत करतात.

IMDB रेटिंग– * 7.7 /10

जून
  1. ओह माय घोस्ट

   कलाकार: अपूर्व देशपांडे, कुरुष देबू अभिनेता, काजल शर्मा, पंकज विष्णू, प्रथमेश परब

दिग्दर्शक: वसीम खान

प्रदर्शन तारीख: 12-02-2021

जगण्याची इच्छा नसलेला अनाथ जग्गू अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न करतो. एकदा अचानक भूतांशी त्याची भेट होते  व त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलतो. ओह माय घोस्ट’ ही जग्गू या तरुणाची कथा आहे, जो दिशाहीन आहे आणि अनेकदा आपला जीव देण्याचा विचार करतो. चार भुते त्याच्या आयुष्यात येईपर्यंत त्याला कोणतीही आशा आणि आकांक्षा नसते. संकटात सापडलेले हे आत्मे जग्गूला जीवनाचा खरा अर्थ व उद्देश समजावून सांगतील का?

IMDB रेटिंग– * 7.2 /10 

ओह माय घोस्ट

2021 मधील टॉप रेटेड चित्रपट । Top Rated Marathi Movies 2021

2021 साली आलेले टॉप रेटेड चित्रपट कोणते होते ते जाणून घ्या. 

  1. झिम्मा

कलाकार: सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी

दिग्दर्शक: हेमंत ढोमे

प्रदर्शन तारीख: 19-11-2021

वेगवेगळ्या वयोगटातील आणि विविध सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या 7 महिला एका टूर कंपनीसोबत इंग्लंडला एकत्र जातात. घरापासून लांब, कुटुंबापासून लांब त्यांना या प्रवासादरम्यान नव्या मैत्रिणी भेटतात. या मैत्रीणींबरोबर या महिला आपला प्रवास उलगडतात. ही सहल त्यांना मनाला झालेल्या जखमा भरून काढण्याची, स्वतःच्या प्रेमात पडण्याची, त्यांच्या सर्वात वाईट भीतीशी लढण्याची आणि आयुष्य साजरे करण्याची संधी देते. त्यांना एक नवा आत्मविश्वास देते. 

IMDB रेटिंग– * 8.3/10

झिम्मा
  1. अजिंक्य 

कलाकार: भूषण प्रधान, प्रार्थना बेहेरे, पल्लवी पाटील, उदय टिकेकर

दिग्दर्शक: ए. कादिर 

प्रदर्शन तारीख : 19-11- 2021

ही कथा अजिंक्य नावाच्या व्यक्तीभोवती फिरते, जो एक कट्टर व्यापारी आहे आणि त्याला त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी घडवायला आवडतात.रितिकाशी त्याचे लग्न झालेले असते.रितिका एक एनजीओ चालवत असते. त्यांच्या आयुष्यात अचानक झालेल्या एका शोकांतिकेमुळे त्याच्या नातेसंबंधावर परिणाम होतो आणि लोकांकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलतो. या चित्रपटात शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचे जास्त नाट्यीकरण न करता योग्यरित्या चित्रण केले आहे.

IMDB रेटिंग– * 9.9/10

अजिंक्य
  1. जयंती

कलाकार: अमर उपाध्याय, किशोर कदम, अतुल महल्ले, रुतुराज वानखेडे, तितीक्षा तावडे

दिग्दर्शक : शैलेश बळीराम नरवडे

प्रदर्शन तारीख: 12-11-2021

एका ध्येयहीन तरुणाला जेव्हा कळते की आपला केवळ गुलाम म्हणून वापर केला जात आहे, तेव्हा तो त्याच्या जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी प्रवासाला निघतो. संत्या हा एक आक्रमक तरुण आहे, जो त्याच्या कुटुंबासाठी व समाजासाठी काळजीचा आणि भीतीचा विषय आहे. समाजात त्याची प्रतिमा गुड फॉर नथिंग अशीच आहे. परंतु एका घटनेने संत्याचे पूर्ण आयुष्यच बदलून जाते. शेजारी घडलेल्या एका खुनामुळे संत्यापुढे एक गंभीर आव्हान उभे राहते.

IMDB रेटिंग– * 9.9/10

जयंती
  1. कानभट

कलाकार: भव्य शिंदे, मनीषा जोशी, अनिल छत्रे, रुग्वेद मुळे, संजीव तांडेल

दिग्दर्शक: अपराणा एस होसिंग

प्रदर्शन तारीख: 19-02-2021

कानभट हा चित्रपट एका मुलाची कथा आहे ज्याला वेदांचा अभ्यास करण्यात रस नसतो. पण घरच्यांच्या सक्तीमुळे त्याला तो अभ्यास करावा लागतो. गुरूंकडून शिकून घेत असताना त्याला ज्ञान मिळते आणि अखेर तो वेद शिकून जगाला समजावून सांगतो की वेद आणि विज्ञान कसे एकमेकांना पूरक आहेत.

IMDB रेटिंग– * 8.8/10

कानभट
  1. गोदावरी 

कलाकार: नीना कुलकर्णी, जितेंद्र जोशी, विक्रम गोखले 

दिग्दर्शक: निखिल महाजन 

प्रदर्शन तारीख: 03-12-2021

गोदावरी हा चित्रपटाची कथा नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर घडते. ही एका कुटुंबाची कथा आहे. हे कुटुंब नुकत्याच झालेल्या एका मृत्यूशी सामना करत आहे. एका मृत्यूबद्दल त्यांना माहिती आहे तर दुसऱ्या मृत्यूबद्दल त्यांना काहीही माहित नाही आणि त्यासाठी ते तयार नाहीत. 

IMDB रेटिंग– * 7.2/10 

गोदावरी

हे उत्कृष्ट व टॉप रेटेड चित्रपट मराठी प्रेक्षकांनी नक्कीच बघायला हवेत. जेणे करून मराठी कलाकारांना असेच दर्जेदार चित्रपट बनवण्याचे प्रोत्साहन मिळेल.

फोटो क्रेडिट  – IMDB

अधिक वाचा – देशभक्ती पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी पाहा हे चित्रपट

Read More From xSEO