xSEO

विद्यार्थ्यांसाठी मराठी सुविचार | Marathi Suvichar For Students

Vaidehi Raje  |  Mar 15, 2022
Marathi Suvichar For Students

आज आम्ही तुमच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी काही चांगले सुविचार (Marathi Suvichar For Students)आणले आहेत. आजकाल विद्यार्थी थोडेही अपयश आले कि निराश होतात व नैराश्य आल्याने प्रयत्न सोडून देतात.  त्यांची निराशा दूर करण्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी चांगले विचार आणले आहेत जे वाचून विद्यार्थी पुन्हा प्रेरित होतील आणि यशासाठी पुन्हा प्रयत्न करतील. विद्यार्थीदशेतील काळ हा आयुष्यातील खूप महत्वाचा काळ असतो. कारण या काळात मन संस्कारक्षम असते. संघर्ष हा आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहे हे लहानपणापासूनच मुलांना शिकवले पाहिजे म्हणजे पुढे जाऊन त्यांना नैराश्याशी लढण्याचे बळ येईल. विद्यार्थ्यांनी हे सुविचार नेहेमी वाचावे. कारण विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार वाचून एक ऊर्जा येते आणि यश मिळवण्यास ताकद देते.

एखाद्या टिपकागदाप्रमाणे लहान मुले आजूबाजूचे सगळे चांगले-वाईट विचार शोषून घेतात. त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले तर त्यांचे विचारही चांगले होतात. पण जर आजूबाजूचे वातावरण वाईट असले तर त्यांच्या मनावर वाईट प्रभाव पडतो व त्यांचे पुढचे सगळे आयुष्य खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच या वयात विद्यार्थ्यांनी उत्तम साहित्य वाचले पाहिजे. त्यांच्या मनावर चांगले संस्कार होतील अशी चांगली पुस्तके वाचली पाहिजेत, चांगले ऐकले पाहिजे, बोलले पाहिजे. त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या शिक्षक तसेच पालकांनीही हे भान ठेवले पाहिजे की आपण एक नवी पिढी घडवतो आहोत. ही नवी पिढी जर चांगली घडावी असे वाटत असेल तर विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले तेच बिंबवले गेले पाहिजे. यासाठी हे सुविचार (Marathi Suvichar Small For Students) आणले आहेत जे वाचून विद्यार्थ्यांना नक्कीच यशासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची, कष्ट करण्याची चांगली प्रेरणा मिळेल.  तुमच्या ओळखीतील कुणी विद्यार्थी आता परीक्षेच्या टेन्शनमध्ये असतील तर त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा संदेश नक्की पाठवा.

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मराठी सुविचार । Inspirational Marathi Suvichar For Students 

विद्यार्थीदशा हा आयुष्यातला असा एक टप्पा आहे ज्यामध्ये भरपूर मार्गदर्शन आवश्यक आहे कारण या वयात विद्यार्थी जीवनात चुकीचे मार्ग निवडू शकतात. या सुविचारांच्या माध्यमातून आम्ही काही चांगले आणि सकारात्मक विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.

Marathi Suvichar For Students

कायदा पाळा गतीचा , काळ मागे लागला, थांबला तो संपला धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे, भ्रांत तुम्हा कां पडे । – माधव ज्युलियन  म्हणजे, काळ कुणासाठीही थांबत नाही. तो त्याच्या वेगाने पळतच असतो. त्यामुळे जो थांबला, तो संपला! जो प्रयत्न करत राहील त्याला आपोआप मार्ग सापडून यश मिळेल. 

अवगुण त्यागिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती कुविद्या सांडूनि शिकती , शहाणे विद्या ।  – समर्थ रामदास स्वामी म्हणतात  प्रयत्न केले तर आपण स्वतःमध्ये चांगला बदल घडवून आणू शकतो आणि शहाणे होऊन अभ्यासपूर्वक उत्तम गुण आत्मसात करू शकतो. 

मना सर्वथा सत्य सांडूं नको रे। मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे। मना सत्य ते सत्य वाचे वदावे। मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें।। समर्थ रामदास स्वामी म्हणतात कायम सत्याची कास धरावी. खोटेपणाला थारा देऊ नये. जे खोटे आहे ते सोडून द्यावे आणि कायम खरे बोलावे.

अन्नदानं परं दानं विद्यादानमतः परम् ।अन्नेन क्षणिका तृप्ति र्यावज्जीवं च विद्यया॥ – अर्थात, अन्नाचे दान करणे उत्तम आहे पण विद्यादान त्याहीपेक्षा उत्तम आहे. अन्नाने माणूस क्षणभर तृप्त होतो, तर शिक्षणाने संपूर्ण आयुष्यभर समाधान मिळते.

विद्या ददाति विनयं विनयाद् याति पात्रताम्। पात्रत्वात् धनमाप्नोति धनात् धर्मं ततः सुखम्॥ अर्थात, विद्येने विनयाची प्राप्ती होते. विनय असला की माणूस पात्र होतो. माणसाकडे पात्रता आली की माणसाकडे पैसा येतो आणि पैसा आला की मग धर्म व सुखाची प्राप्ती होते. म्हणून विद्या मिळवणे महत्वाचे आहे. 

उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः। न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः ॥ अर्थात, प्रयत्न केल्यानेच आपली स्वप्ने पूर्ण होतात. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरीण स्वतःहून त्याची मान देत नाही. 

आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्य महारिपुः ।नास्त्युद्यमसमो बन्धुः कुर्वाणो नावसीदति ॥अर्थात, आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे आणि कष्टासारखा दुसरा मित्र नाही. कठोर परिश्रम केल्याने माणूस कधीच दुःखी होत नाही. 

न चोर हार्यं न च राज हार्यं न भ्रातृ भाज्यं न च भारकारि। व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधन प्रधानम्॥ अर्थात, जे चोर चोरू शकत नाही, जे राजा हिसकावून घेऊ शकत नाही, जे भावांमध्ये वाटून घेता येत नाही, ज्याचा भार जाणवत नाही आणि जे खर्च करून सतत वाढत जाते, अशा विद्येचे धन हे खरोखरच श्रेष्ठ धन आहे.

अलसस्य कुतो विद्या , अविद्यस्य कुतो धनम् | अधनस्य कुतो मित्रम् , अमित्रस्य कुतः सुखम् || अर्थात आळशी व्यक्तीला ज्ञान कुठून मिळणार, ज्याच्याकडे विद्या नाही त्याला धन कसे मिळणार, ज्याच्याकडे धन नाही त्याला मित्र कसे मिळणार आणि ज्याला मित्र नाहीत त्याला सुख कसे मिळणार?

आज कोणत्याही गोष्टीतील तज्ज्ञ असलेल्या माणसांनीही एकेकाळी शून्यातूनच सुरुवात केली होती. 

अधिक वाचा – तणावातून बाहेर काढतील असे स्टेटस 

विद्यार्थ्यांसाठी एका वाक्यातील मराठी सुविचार । Marathi Suvichar For Students In One Line

अनेक यशस्वी व महान व्यक्तींचे अनेक उपयुक्त आणि प्रेरक सुविचार आपल्याला प्रत्येक भाषेत सापडतात. या लेखात विद्यार्थ्यांसाठी हे सुविचार आणले आहेत जेणे करून त्यांना एकाच वाक्यातून मोठी शिकवण मिळेल. एका वाक्यातील मराठी सुविचारांद्वारे विद्यार्थ्यांना जीवनातील मौल्यवान धडे देण्याचा हा प्रयत्न आहे. 

Marathi Suvichar For Students

आळसामुळे सोप्या गोष्टी कठीण होतात आणि कठीण गोष्टी अशक्य होतात. म्हणून आळस करू नये. 

एखाद्या कामाची सुरुवात प्रेरणेपासून होते आणि त्या कामाची पूर्तता ही कष्टांच्या सवयींतूनच आणि सातत्यातून होते. 

यश म्हणजे अनेक लहान लहान प्रयत्नांची बेरीज व पुनरावृत्ती असते.

भविष्य त्यांचेच आहे जे त्यांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवून प्रयत्न करतात. 

तुम्ही जितके जास्त वाचाल, तितक्या जास्त गोष्टी तुम्हाला कळतील, जितक्या जास्त तुम्ही शिकाल तितके जास्त ठिकाणी तुम्ही पुढे जाल. 

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.  

कठीण परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली आहे. 

नशीब तुमच्यासाठी जे करू शकत नाही ते तुमचे परिश्रम तुमच्यासाठी करू शकतात. 

निंदा होण्याच्या भीतीने आपले लक्ष्य सोडू नका, कारण तुमचे लक्ष्य पूर्ण होताच निंदा करणाऱ्यांची मते पूर्ण बदलतात.

वेळ आणि शिक्षणाचा योग्य वापर करणारी व्यक्तीच केवळ यशाची चव चाखू शकते. 

कधी यशामागे नुसते धावू नका आणि एकाच जागेवर कधीही थांबू नका, फक्त नेहमी चालत राहा, हाच उत्तम विद्यार्थ्यांच्या यशाचा मूलमंत्र आहे. 

विद्यार्थी जीवनात लावून घेतलेल्या छोट्या छोट्या सवयींमुळे जीवनात खूप मोठा फरक पडतो.

जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर सूर्यासारखे जळायला शिका.” – डॉ. अब्दुल कलाम

शिक्षण हे जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे, या शस्त्राच्या मदतीने तुम्ही जग बदलू शकता. – नेल्सन मंडेला 

अधिक वाचा – संघर्ष स्टेटस मराठी

विद्यार्थ्यांसाठी उत्तम सुविचार । Marathi Suvichar Small For Students

विद्यार्थीदशेत लहान वयात मुलांचे मन खूप चंचल असते. अनेकवेळा असे घडते की, सतत मेहनत करूनही यश मिळत नाही, मग निराश होऊन आपण प्रयत्न सोडून देतो. पण विद्यार्थ्यांनो, तुम्ही कधीही निराश होऊ नका. अशा वेळी तुम्ही पुन्हा एकदा उभे राहून, पूर्ण ताकदीने प्रयत्न करायला हवेत. यशाची प्रेरणा मिळावी म्हणून हे सुविचार खास तुमच्यासाठी दिले आहेत.

Marathi Suvichar For Students In One Line

अपयशाचा हंगाम हाच यशाची बीजे पेरण्याचा सर्वोत्तम काळ असतो. – स्वामी परमहंस योगानंद

अपयश ही यशाची प्रथम पायरी आहे.

भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीही पोहचू शकणार नाही त्यापेक्षा त्याला बिस्किट टाका आणि पुढे चला- धीरूभाई अंबानी.

जोपर्यंत तुमच्या प्रगतीवर कोणी जळत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होत आहात हे कळत नाही.

तुम्ही तोपर्यंत हरत नाही जोपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न थांबवत नाही. -अल्बर्ट आईन्स्टाईन

जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला आपल्या कामात एकाग्रता आणावी लागेल.

मैदानात हरलेली व्यक्ती जिंकू शकते, परंतु मनातून हताश झालेली व्यक्ती कधीही जिंकू शकत नाही म्हणून मनातून कधीही हार मानू नका.

चुका करणे वाईट नाही, परंतु चुका करूनही त्यातून काहीच न शिकणे वाईट आहे. 

तुमची यशाची व्याख्या जर भक्कम असेल तर तुम्ही कायम अपयशाच्या दोन पावले पुढे राहाल. 

जी व्यक्ती संकटांपासून लांब पळते ती आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही.

कठीण काळात धैर्यवान व्यक्ती संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो तर भित्रा व्यक्ती त्या संकटाचे निमित्त साधून प्रयत्न सोडून देतो.

स्वप्ने आपोआप पूर्ण होण्याची फक्त वाट पाहत बसू नका,कारण वाट पाहणार्‍यांच्या नशिबी केवळ प्रतीक्षाच येते तर . प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीलाच यश मिळते.

वाचास्वामी विवेकानंदांचे अनमोल विचार मराठी

शालेय विद्यार्थ्यांवर संस्कार करणारे सुविचार । Good Thoughts For Students In Marathi

जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास आहे आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी आहे, तोपर्यंत तुम्ही जगातील प्रत्येक अडथळा पार करून यश प्राप्त करू शकता आणि काहीही साध्य करू शकता. मित्रांनो! जीवनात कोणतेही गंतव्यस्थान गाठण्यासाठी तुमची मेहनत आणि संयम ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे परिश्रम केलेत आणि संयम राखून योग्य मार्गावर वाटचाल केलीत तर जगातील कोणतीही शक्ती आणि कोणताही अडथळा तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. तुम्हाला रोज प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून रोज यातील एक सुविचार वाचा व त्यातील मूल्य अंगिकारण्याचा प्रयत्न करा. 

Marathi Suvichar For Students

एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, प्रयत्न करणाऱ्याला या जगात अशक्य काहीही नाही.

जर वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत तर त्या सवयीमुळे आयुष्यच बदलून जाते. 

 संघर्ष हे जीवनाचे दुसरे नाव आहे. संघर्षाशिवाय यश नाही.

जो चुकतो तोच शिकतो. ज्या व्यक्तीने आयुष्यात कधीही चूक केली नाही तो आयुष्यात कधीच नवीन काही शिकला नाही. 

स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, कारण जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पहाण्यासाठी तयार असतो तेव्हाच आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो. 

वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन होय. 

आयुष्य आपल्याला दररोज एक नवीन संधी देते, या संधीचा लाभ घ्या व आयुष्य घडवा. 

यश हे केवळ प्रामाणिक प्रयत्नांच्या मार्गावरून चालल्यासच प्राप्त होते. 

स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत”. –  स्वामी विवेकानंद

कधीही आपल्या पाठीमागे बोलणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. कारण ते आपल्या पाठीमागे आहेत म्हणजेच आपण त्यांच्यापेक्षा दोन पाऊल पुढे आहोत. 

विद्यार्थ्यांसाठी आजचा सर्वोत्तम प्रेरणादायी सुविचार । Thought Of The Day For Students In Marathi

समाजाच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. समाज सुधारण्यात आणि बळकट करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.आजचा विद्यार्थी देशाचे भविष्य आहे. विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळाले नाही तर देश कधीच प्रगती करू शकणार नाही. कारण विद्यार्थी पुढे जाऊन अशिक्षितांना शिक्षित करू शकतात, ते लोकांना देशाच्या प्रगतीसाठी काम करायला शिकवू शकतात, विविध क्षेत्रात जाऊन देशाच्या प्रगतीत सहभागी होऊ शकतात, ते देशातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढू शकतात. म्हणूनच त्यांच्यावर लहानपणापासूनच योग्य संस्कार होणे आवश्यक आहे. लहान मुलांच्या संस्कारक्षम मनावर चांगले संस्कार करण्यासाठी हे थोर व्यक्तींचे विचार सुविचार स्वरूपात वाचा. 

Marathi Suvichar For Students In One Line

नुसते टॅलेंट असून उपयोग नाही, कारण आयुष्यात कठोर परिश्रम केल्याशिवाय यश मिळत नाही. – क्रिस्टियानो रोनाल्डो 

जीवनात सर्वात मोठा आनंद म्हणजे आपण करू शकत नाही असे म्हणणाऱ्या लोकांची तोंडे आपल्या यशाने बंद करणे हा आहे. 

माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजेच शिक्षण होय.

वेळेचा अपव्यय हा आपल्याला विनाशाकडे नेतो.

आजच्या जगात दिसते तसे नसते, म्हणून नेहमी आपले डोळे आणि कान उघडे ठेवून जगाचे निरीक्षण करा. 

तुम्हाला पडण्याची भीती असेल तर तुम्ही कधीही स्वतःच्या पायांवर उभे राहू शकणार नाही.

कधीही कोणाचा विश्वास मोडू नका, कारण एकदा विश्वासाला तडा गेला तर तो परत पूर्वीसारखा होत नाही. 

आव्हाने ही आयुष्याला रुचीपूर्ण बनवतात. त्यांच्यावर मात करणे जीवनाला अर्थपूर्ण बनवते. ”- जोशुआ जे. मरीन

“काळ हा राजाला रंक बनवू शकतो, तर भिकाऱ्याला राजा बनवू शकतो. त्यामुळे कधीही उद्दामपणे वागू नये. 

तुमचे यश कधीही डोक्यात जाऊ देऊ नका किंवा अपयश मनाला लावून घेऊ नका. आपले पाय कायम जमिनीवर घट्ट रोवलेले असले पाहिजेत. 

शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे. – सावित्रीबाई फुले

विद्यार्थ्यांनी हे चांगले सुविचार (Marathi Suvichar For Students) वाचले तर त्यांना नक्कीच यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल. या छोट्या छोट्या सुविचारांतून (Marathi Suvichar For Students In One Line) आयुष्याची मोठी शिकवण मिळते.

अधिक वाचा –जगण्याला उभारी देतील या मराठी प्रेरणादायी कविता

Read More From xSEO