नातीगोती

नात्यात ‘मी’पणा आणू शकतो अनेक अडचणी

Leenal Gawade  |  Nov 15, 2021
नात्यात नको मी पणा

नात्यात भांडण आणि मनमुटाव आलेच. भांडणं ही वेळच्या वेळी मिटली नाहीत की मात्र त्यात अनेक अडचणी येऊ लागतात. हल्ली काही जणांमध्ये भांडणाचे कारण हे क्षुल्लक असते. पण त्याचे पर्यवसान कधी मोठ्या भांडणात होते हे सांगता येत नाही.पूर्वी लग्न करताना शिक्षण ही गोष्ट फार पाहिली जायची नाही. नवरा हा जास्ती शिकलेला आणि बायको तुलनेने कमी शिकलेली असं असायचं. पण आता जोडीदार निवडताना प्रत्येक जण तोला-मोलाचा जोडीदार निवडतात. पण त्यामुळेच ज्यावेळी अशा जोडप्यांमध्ये भांडणं होतात. त्यावेळी ती निस्तरताना खूप अडचणी येतात. या भांडणामध्ये मी पणा जास्त येऊ लागतो. तुमच्याही नात्यात मीपणा आला असेल तर तुम्हाला काय करायला हवे ते जाणून घेऊया.

नात्यातून बाहेर पडण्याची वेळ झाल्याचे हे आहेत संकेत

अहं सोडून द्या

खूप जणांना भांडणं झाल्यानंतर माघार घ्यायला मुळीच आवडत नाही. चूक लक्षात आली तरी देखील मी का चुकलो किंवा चुकले नाही यासाठी तुम्ही जर वाद घालत असाल तर तुम्हाला ग ची आणि अहं ची बाधा झालेली आहे हे लक्षात घ्या. ज्यावेळी भांडणात तुम्हाला तुम्हीच बरोबर वाटता आणि समोरच्याची बाजू ऐकून घेण्यास तुम्ही तयार होत नसाल तर त्यामुळे नात्यात अनेक अडचणी येण्यास सुरुवात होतात. तुमचे म्हणणे ऐकून घेण्याची सवय झालेली व्यक्ती तुमच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात करेल. पण जर नव्या नात्यात असताना तुम्ही असे करत असाल तर तुमच्या जोडीदाराला तुमचे असे वागणे त्रास देऊ शकते. त्यामुळे तुम्ही अहं सोडून द्या.

चूक होते ती मान्य करा

पुरुष असो वा स्त्री नात्यात दोघांकडूनही चूक होऊ शकते. चूक कबुल करण्यात मोठेपणा असतो. चुका कबूल केल्यामुळे भांडणं सोडवण्यात मदत मिळते. तुमच्याकडून काही कारणास्तव चूक झाली असेल आणि तरीही तुम्ही भांडत असाल तर तुम्ही थोडे थांबा. थोडावेळ विचार करुन तुम्ही काय बोलताय? किंवा कशासाठी भांडताय? हे लक्षात घ्या. त्यामुळे भांडण सोडवण्यास मदत मिळते. त्यामुळे चूक मान्य करा आणि ही चूक मान्य केल्यामुळे नात्यात भांडण कमी होण्यास मदत मिळेल.

दुसऱ्यांना चुका दाखवू नका

खूप जणांना चुका दाखवलेल्या आवडत नाहीत. म्हणजे चुका दाखवणे हे अजिबात वाईट नाही. चुका दाखवायला हव्यात. पण कधी कधी दुसऱ्यांच्या चुका दाखवताना आपण एखाद्याचे मन दुखावतो हे कधीही आपल्याला लक्षात येत नाही. त्यामुळे जर एखाद्याला त्याच्या चुका सतत दाखवणे आवडत नसेल तर तुम्ही त्या चुका अजिबात दाखवू नका किंवा सतत दाखवू नका. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला तुम्ही कमीपणा दाखवत आहात असे वाटते. जे कोणत्याही नात्यासाठी अजिबात चांगले नाही

आता तुमच्या नात्यात मी पणा येत असेल तर तुम्ही काही गोष्टी आधीच टाळायला हव्यात.

अधिक वाचा


घोरण्याच्या सवयीचा रिलेशनशीपवर होतो का परिणाम

घटस्फोट नक्की का होतात, काय आहेत कारणे

Read More From नातीगोती