बहुप्रतिक्षित आणि मल्टिस्टारर चित्रपट ‘मीडियम स्पाइसी’चे चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं. या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर, पर्ण पेठे, ललित प्रभाकर, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, सागर देशमुख, इप्शिता, नीना कुळकर्णी, रवींद्र मंकणी अशा तगड्या स्टारकास्ट आहे. त्यामुळे या मल्टिस्टारर सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे या फ्रेश पेअर आपल्याला मराठी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. या सिनेमाच्या पोस्टरचा लुक खूपच युथफुल होता. त्यामुळे सिनेमाच्या कहाणीबाबतही उत्सुकता वाढली आहे.
चित्रीकरण झाले पूर्ण
नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं. विधि कासलीवाल निर्मित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘मीडियम स्पाइसी’ या सिनेमाचं चित्रीकरण मुंबई आणि पुण्यामध्ये करण्यात आलं आहे. चित्रीकरण पूर्ण झाल्याच्या बातमीला दूजोरा देताना चित्रपटाच्या निर्मात्या विधि कासलीवाल म्हणाल्या की, “मीडियम स्पाइसी’ सिनेमाच्या निर्मितीची प्रक्रिया चित्रपटाच्या नावाप्रमाणेच अतिशय मजेदार होती. नामवंत कलाकार, तंत्रज्ञ आणि मोहितसारखा उत्तम दिग्दर्शक यामुळे या सिनेमावर काम करतानाचा अनुभव आठवणीत राहील. आता आम्ही हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहचवायला उत्सुक आहोत. चित्रपटाची टीम सध्या पोस्ट प्रॉडक्शनच्या कामात व्यस्त आहे. ज्यामुळे हा अद्भूत अनुभव अजून व्दिगुणीत होईल. यासाठी संपूर्ण टीम झटत आहे.”
या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित टाकळकर आहेत. मोहित यांनी आत्तापर्यंत मराठी, उर्दू, कन्नड आणि इंग्रजी थिएटरसाठी काम केलं आहे. मराठीतला दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. या चित्रपटाबाबत सांगताना ते म्हणाले की, “माझ्यासाठी ‘मीडियम स्पाइसी’ हा गेल्या काही महिन्यांतला एक अविस्मरणीय अनुभव होता. आपण पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्याची ही प्रक्रिया खूप अव्दितीय आहे. सर्व कलाकारांचा मी आभारी आहे की, त्यांनी या विलक्षण अनुभवात मला उत्तम साथ दिली. आम्ही मुंबई आणि पुण्यात चित्रीकरण केलंय. आजपर्यंत खरंतर अनेक सिनेमांतून आपण मुंबई तुम्ही पाहिली असेल. पण या सिनेमात दिसलेली मुंबईची एक आगळी छटा तुम्हांला आवडेल, याचा मला विश्वास आहे. कदाचित हेच तर या शहराचं वैशिष्ठ्य आहे, ते तुम्हांला दरवेळी काही तरी वेगळेपण दाखवतं. पुण्यात चित्रीकरण करताना तर मी या शहराच्या पुन्हा प्रेमातच पडलो.”
लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’ शहरी जीवनातल्या प्रेम, नातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
हेही वाचा –
सर्वाधिक मानधन घेणारे मराठी कलाकार
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade