लाईफस्टाईल

90+ मिस यू फादर कोट्स मराठी | Miss You Father Quotes in Marathi

Trupti Paradkar  |  Jul 20, 2022
Miss You Father Quotes in Marathi

प्रत्येक मुलासाठी आईबाबा दोघंही खूप महत्त्वाचे असतात. आई बाळाला जन्म देते तर बाबा बाळाचं संगोपन, लालन पालन करतो. आयुष्यात तुम्हाला कोणतीही गोष्ट तुम्हाला हवी असेल तर ती मागण्यासाठी जवळची व्यक्ती म्हणजे बाबा. कारण तुम्हाला माहीत असलं बाबा जीवाचं रान करेल पण तुम्हाला हवं ते तुम्हाला नक्कीच मिळवून देईल. मुलांच्या जीवनाश्यक गरजाच नाही तर त्यांचे लाड पुरवण्यासाठीही बाबा आयुष्यभर कष्ट करतात. पण काहींच्या जीवनात बाबाची साथ आयुष्यभरासाठी नसते. कधी कधी त्यांचा प्रवास अर्ध्यावर सोडून ते तुमच्यापासून दूर निघून जातात. काहींचे बाबा कामानिमित्त परदेशात असतात. अशा वेळी मुलांच्या जीवनात असा एकही दिवस नसतो जेव्हा त्यांना बाबाची आठवण येत नाही. तुम्हालाही तुमच्या बाबांची आठवण येत असेल तर शेअर करा हे मिस यू बाबा कोट्स Miss You Father Quotes in Marathi…तसंच वाचा 150+ Birthday Wishes For Father In Marathi | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, 50+ Fathers Day Poem In Marathi | वडिलांवर कविता आणि चारोळ्या 2022, 90+ वडिलांसाठी भावनिक कोट्स | Emotional Quotes On Father In Marathi

मिस यू फादर कोट्स – Miss You Father Quotes in Marathi

बाबा म्हणजे आयुष्यातील बापमाणूस, जो तुमच्यावर कधीच न दाखवता आभाळाभर प्रेम करत असतो. असा तुमचा बापमाणूस तुमच्यापासून दूर गेला असेल तर त्याची आठवण आल्यास शेअर करा हे मिस यू बाबा कोट्स (Miss You Dad Quotes in Marathi)

1.बाबा, तुम्ही आज जरी माझ्या आयुष्यात नसला तरी तुमचे आशीर्वाद कायम माझ्यासोबत आहेत.

2. बाबा तुमच्या प्रत्येक कठोर शब्दामागे मायेचा झरा लपला होता, तुमच्या प्रत्येक घामाच्या थेंबामागे आमच्या भविष्याला आलेख लपला होता. आता याची जाणिव होते तेव्हा तुमची खूप आठवण येते.

3. बाबा पाठीशी असतात तोपर्यंत परिस्थितीचे काटे आपल्यापर्यंत कधीच पोहचू देत नाहीत. मिस यू बाबा!!!

4. कसं जगायचं आणि कसं वागायचं हे तुम्ही शिकवलं आणि त्यामुळेच आज या जगात जगायला शिकलोय… मिस यू बाबा

5. माझी ओळख आहे ती तुमच्यामुळे मी आज या जगात जे काही आहे ते तुमच्यामुळे… मिस यू बाबा

6. माझ्या आयुष्यातील सर्वात पहिला आणि शेवटचा हिरो तुम्हीच आहात… मिस यू बाबा!!!

7. बाबा खरंच तुम्हाला विसरता येणं शक्य नाही, तुम्ही मला सोडून गेला आहात पण मला तुम्हाला विसरणं मुळीच शक्य नाही… मिस यू बाबा

8. मला घरी यायला उशीर व्हायचा तेव्हा ज्याचा काळजाचा ठोका चुकायचा तो माझा फक्त बाबा होता… मिस यू बाबा

9. संसारातील सर्व संकटांवर निधड्या छातीने मात करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे बाबा… मिस यू बाबा!!!

10. बाबा तुम्ही मला आयुष्यात सर्व काही शिकवलं पण तुमच्याशिवाय कसं जगायचं हेच नाही शिकवलं. मिस यू बाबा!!!

मिस यू बाबा स्टेटस – Miss you Baba status in Marathi

बाबा जोपर्यंत आयुष्यात असतात त्यांचा कायम आधार वाटत असतो. मात्र ज्यांचे वडील या जगातून कायमचे निघून जातात तेव्हा त्या मुलांना पोरकं झाल्याची जी फिलिंग असते, ती दुसरं कोणीच समजू शकत नाही. यासाठीच अशा मुलांसाठी हे खास मिस यू बाबा स्टेटस – Miss You Papa Quotes Marathi

1. बाबा म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतः दुःखी असतानाही मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी धडपडत असते. मिस यू बाबा!!!

2. तुम्ही कितीही मोठे झालात तरी एक अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात कायम असते जी तुमच्यासाठी कायम मोठा माणूस असते… ती म्हणजे तुमचे बाबा. माझ्या आयुष्यातील त्या मोठ्या माणसाची आज खूप आठवण येते. 

3. जगासाठी तुम्ही फक्त एक व्यक्ती होतात. पण बाबा तुम्ही माझ्यासाठी माझं संपूर्ण जग होतात. मिस यू बाबा!!!

4. बाबा नावाची शाल जेव्हा तुमच्या अंगावरून निघून जाते, तेव्हा आयुष्याची प्रत्येक सकाळ पोरकी वाटू लागते. मिस यू बाबा!!!

5. बाबांना कधीच म्हणू नका तुम्ही आमच्यासाठी काय केलंय कारण पैसे कमवायला बाहेर पडल्यावर जाणवतं त्यांनी आपल्यासाठी काय केलंय… मिस यू बाबा

6. मला सावलीत ठेवत स्वतः उन्हात कष्ट करताना, मी पाहिलं आहे माझ्या बाबांना चंदनासारखं झिजताना… मिस यू बाबा

7. बाबांची खरी किंमत ते नसतानाच कळते… मिस यू बाबा!!!

8. बाबा हा मुलाचा पहिला हिरो आणि मुलीचं पहिलं प्रेम असतात… मिस यू बाबा

9. या जगात माझे आईबाबा सोडले तर माझी कदर कोणालाच नाही हे आज कळतंय, तुम्ही गेल्यावर. मिस यू बाबा!

10. खिसा रिकामा असला तरी कधी नाही न म्हणणारा जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणजे माझे बाबा… मिस यू बाबा!!!

आय मिस यू डॅड कोट्स मुलींसाठी – I Miss you Dad Quotes From Daughter in Marathi

मुलीचं आणि वडिलांचं नातं हे अधिक दृढ असतं. कारण बाबाला नेहमी मुली जास्त प्रिय असतात. वास्तविक मुलगा असो वा मुलगी आईबाबांसाठी सारखेच असतात. पण मुली लग्नानंतर सासरी जातात तेव्हा आईपेक्षा बापच जास्त हळवा होतो. मुलींंनाही बाबापेक्षा जगात दुसरं कोणीच जास्त प्रिय नसतं. म्हणूनच तुमच्या लाडक्या बाबाला मिस करत असाल तर शेअर करा हे मिस यू बाबा कोट्स Miss You Father Quotes in Marathi 

1. पाठीवरचा हात तुमचा मला आकाशासारखा वाटायचा, तुमचं प्रेम बाबा माझ्यासाठी जगातील सर्वात मोठा आनंद असायचा… मिस यू बाबा!

2. बाबा, जोपर्यंत तुम्ही आयुष्यात होतात बेफिकरीने जगलो, आता तुम्ही नाही तेव्हा कळतंय कोणाच्या जीवावर जगत होतो.. मिस यू बाबा!

3. तुमची प्रत्येक गोष्ट आठवते बाबा, तुमच्या शिवाय प्रत्येक दिवस अपूर्ण वाटतो… मिस यू बाबा

4. आयुष्यात कोणतंही संकट माझ्यापर्यंत पोहचलं नाही कारण माझ्या डोक्यावर माझ्या बाबांचा हात आहे. मिस यू बाबा

5. न दाखवता जो आभाळाएवढं प्रेम करतो, तो बाबा असतो… मिस यू बाबा!

6. बाबा तुमच्या छायेविना सर्व काही वाटे अपू्र्ण, कोणत्याही धनसंपत्तीने न भरून निघेल ही पोकळी पूर्ण… मिस यू बाबा

7.  वडिलांची संपत्ती नाही आशीर्वाद पुरेसे असतात. मिस यू बाबा!

8. सहवास सुटला तरी स्मृति सुंगध देत राहतील. बाबा, तुमची आयुष्याच्या प्रत्येक क्षणी आठवण येत राहील. 

9. माझ्या बाबासारखा बापमाणूस जगात शोधून सापडणार नाही… बाबा तुमची खूप आठवण येते…

मिस यू डॅड कोट्स मुलांसाठी – Miss U Dad Quotes From Son in Marathi

मुलांसाठी तर लहानपणी वडील म्हणजे पहिला हिरो, पहिला आदर्श असतात. पुढे मोठं होत गेल्यावर नकळत त्यांचे महत्त्व आपण विसरून जातो. पण जेव्हा आयुष्यातून बाबा निघून जातात तेव्हा ती पोकळी कोणीच भरून काढू शकत नाही. तुम्ही पण तुमच्या आयुष्यातील या बापमाणसाला मिस करत असाल तर शेअर करा हे मिस यू बाबा कोट्स Miss You Father Quotes in Marathi

1. न हरता, न थांबता प्रयत्न कर बोलणारे आईवडीलच असतात. मिस यू बाबा!

2. बाबाचं प्रेम कळत नाही आणि बाबांसारखं प्रेम जगात कोणीच करू शकत नाही… मिस यू बाबा!!!

3. जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल पण आईची माया आणि वडिलांचं प्रेम कितीही खर्च केले तरी मिळणार नाही. मिस यू बाबा!!!

4. स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ती आई आणि डोळ्यात प्रेम न दाखवता प्रेम करतो तो बाबा असतो. मिस यू आईबाबा!!!

5. आपले दुःख मनात लपवून मुलांना आनंदी ठेवणारा बापमाणूस म्हणजे बाबा… मिस यू बाबा!

6. त्याला पूजापाठ करण्याची गरज नाही ज्यांने सेवा केली आईबाबांची… मिस यू बाबा!!!

7. देवा माझ्या बाबांना जिथे असतील तिथे सुखी ठेव… मिस यू बाबा!

8. विश्वास बाबांवर आणि प्रेम आईवर करा, आयुष्यात कसलीच कमतरता भासणार नाही… मिस यू बाबा!!!

9. बाबा ही जगातील इतकी महान व्यक्ती आहे की कोणताच मुलगा त्यांच्या घामाच्या थेंबाचीपण परतफेड करू शकणार नाही. मिस यू बाबा!

Conclusion –  आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेले हे मिस यू फादर कोट्स – Miss You Father Quotes in Marathi,मिस यू बाबा स्टेटस – Miss you Baba status in Marathi, आय मिस यू डॅड कोट्स मुलींसाठी I Miss you Dad Quotes From Daughter in Marathi,मिस यू डॅड कोट्स मुलांसाठी-Miss U Dad Quotes From Son in Marathi तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

Read More From लाईफस्टाईल