एकदा का लग्न ठरलं की, नुसती दगदग सुरु होते. जिचं लग्न ठरलं आहे तिची तर अगदी लग्न ठरल्यापासून लगबग सुरु होते. पण या गडबडीच्या काळाता आणि चांगलं दिसण्याच्या नादात बरेचदा अशा काही चुका होतात की,त्यामुळे ब्राईडने ठरवलेल्या अनेक गोष्टी मनासारख्या होत नाहीत. तुमचंही लग्न ठरलं असेल तर लग्नाआधी काही चुका करणे तुम्ही टाळायला हवे. असे केल्यामुळे तुमच्या लग्नाच्या दिवशी तुम्ही अगदी परफेक्ट दिसाल. त्यामुळे आम्ही कशा काही गोष्टींची यादी केली आहे ज्या तुम्ही करु शकाल अशा चुका आहेत. ज्या चुका तुम्ही टाळलेल्या का बऱ्या ते जाणून घेऊया.
शॅम्पू बदलणं
केसांसाठी वापरला जाणारा शॅम्पू हा फारच महत्वाचा असतो. केसांना चांगले करण्याचे काम शॅम्पू करतो. पण तुम्ही वापरत असलेला शॅम्पू अचानक बदलल्यानंतर केसांच्या अनेक समस्या उद्धभवण्याची शक्यता असते. केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे, स्काल्प कोरडी होणे असे काही त्रास होऊ लागतात. जर केसांच्या अशा समस्या तुम्हाला जाणवू लागल्या असतील तर तुम्ही शॅम्पू बदललेला आहेत असे समजून जावे. या शिवाय शॅम्पू बदलल्यानंतर केसांमध्ये कोंडा वाढला असेल तर फोरहेडवर पिंपल्स येण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही शक्यतो काही लग्नाच्या काही दिवसांपूर्वी शॅम्पू मुळीच बदलू नका.
फक्त मेकअप आणि फॅशनच नाही या सवयींमुळे तुम्ही दिसू शकता सुंदर
स्किनकेअर रुटीन बदलणं
खूप जण त्वचा चांगली दिसण्यासाठी केसांवर वेगवेगळे प्रयोग करत राहतात. पण त्वचेला आयत्यावेळी केलेेले काही बदल पटकन चालत नाहीत. जर तुम्ही तुमचे स्किनकेअर अचानक बदलले तर त्याचा परिणाम त्वचेवर विपरित होण्याची शक्यता असते. त्वचा ही फारच संवेदनशील असते. जर लग्नाला 15 दिवसांहून अधिक काळ असेल तर काही बदल करु नका. कारण 15 दिवस हा कालावधी खूप वाटत असला तरी देखील तो त्वचा चांगली होण्यासाठी पुरेसा असा कालावधी नाही. पिंपल्स आलेले जातील पण त्याचे डाग जात नाहीत. त्यामुळे स्किनकेअर रुटीन शक्यतो बदलू नका.
खास कार्यक्रमांच्या हेअरस्टाईलसाठी निवडा ही सुंदर फुले
नवे प्रॉडक्टस ट्राय करणे
खूप जणांना नवे प्रॉडक्ट ट्राय करायला खूपच जास्त आवडतात. म्हणजे एकदा का एखादी नवे स्किनकेअर किंवा हेअरकेअर प्रॉडक्ट चांगले आहे असे कळले की लगेच काही जण ते वापरायला सुरुवात करतात पण असे मुळीच करु नका. नवे प्रॉडक्टस ट्राय करणे म्हणजे त्वचेसाठी आणि इतर कोणत्याही गोष्टींच्या रिकव्हरीसाठी बराच वेळ जाणे असे होते. त्यामुळे तुम्ही कोणतेही नवे प्रॉडक्टस वापरण्याचा घाट अजिबात घालू नका. त्यामुळे तुम्हाला नेमके काय होईल ते सांगता येणार नाही.
आहारातला बदल
घरात काही मंगलकार्य असले की आहारात खूप बदल होतो. घरात कितीही बदल झाला तरी देखील नवरीने तिच्या आहारातले बदल जाणीवपूर्वक टाळायला हवे. कारण आहारात असा बदल करणे हे आरोग्यासाठी फारच घातक आहे. विशेषत: वजनवाढीची भीती ज्यांना असेल किंवा त्वचाा खराब होण्याची ज्यांना भीती असेल त्यांनी तर अजिबात असे बदल करु नयेत
आता ब्राईडनेे या चुका टाळल्या तर त्या लग्नात सुंदर दिसतील यात काहीही शंका नाही.