DIY फॅशन

साडी नेसल्यावर फुलते… मग तुम्ही करत आहात या चुका

Leenal Gawade  |  Oct 4, 2021
साडी फुलत असेल तर टाळा या चुका

 साडी नेसायला खूप जणांना आवडते. साडी कशी चापून चोपून नेसावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. पण कधी कधी काही साड्या घेतल्यानंतर त्या बसता बसत नाहीत. त्यातच अशा साड्या चांगल्याच फुलतात. त्यामुळे त्या अजिबात चांगल्या दिसत नाही. जाड दिसायला होते. जे अजिबात कोणालाच आवडत नाही. साडी घेताना आणि ती नेसताना तुम्ही नेमकी काय चूक करता हे जाणून घेतले तर तुम्हाला साडी नीट निवडता येईल. जाणून घेऊया यासाठीच्या काही टिप्स

साडी निवडताना

Instagram

 ज्यावेळी तुमची अपेक्षा असते की साडी एकदम चापून चोपून नेसली जायला हवी. त्यावेळी साडीची निवड तुम्हाला जमायला हवी. साडी ही तुमचे शरीर बघून निवडा. काही साड्या या खूप फुलतात. अशा साड्या ब्रासो प्रकारातील साडी निवडू नका. काही साड्या पाहिल्यानंतर त्याची घडी करताना त्याचा पसाराच आवरता येत नसेल ज्याची घडी मोठी असेल अशी साडी अजिबात निवडू नका. त्यापेक्षा सिल्क प्रकारातील साडी निवडा ही साडी खूप छान दिसते आणि खूप बसते. सॉफ्ट सिल्क प्रकारातील साड्या, कांजिवरम प्रकारातील साड्या या चांगल्या दिसतात आणि चांगल्या बसतात त्यामुळे साडीची निवड करताना त्याच्या घडीवरुन त्याचा अंदाज घ्या. म्हणजे तुम्हाला ती नेसताना कशी दिसेल याचा अंदाज येईल.

कॉटनची साडी नेसण्याची सोपी पद्धत, देईल एलिगंट लुक

साडी नेसताना

Instagram

साडी नेसणे हे एक स्किल आहे. जे सगळ्यांनाच सवयीने आणि सरावाने येऊ शकतं. त्यामुळे उत्तम साडी नेसायला शिका. तुम्ही सिल्क आणि कोणत्याही प्रकारची चांगली साडी नेसण्यासाठी ती उत्तम नेसण्यासाठी शिकणे हे खूपच महत्वाचे असते. त्यामुळे साडी नेसायला आवडत असेल तर साडी कशी नेसायची ते शिकून घ्या. साडी नेसायला हल्ली अनेक ठिकाणी शिकवले जाते.  त्यामुळे साडी नेसताना ती कशी नेसायची आणि त्यामधील बारकावे काय ते नीट समजावून सांगितले जाते. इतकेच नाही तर साडी ही तुमच्या शरीरानुसार कशी नेसायची हे देखील सांगितले जाते

 पेटीकोटची निवड

Instagram

साडीवर तुम्ही पेटीकोट कोणत्या प्रकारचे घालत आहात ते देखील जाणून घ्या. पेटीकोट हा खूप व्यवस्थित आणि बॉडीचा शेप घेणारा असावा त्यामुळे तुम्हाला साडी अधिक चांगली दिसते. पेटीकोट वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात. त्यांची फिटिंग ही चांगली हवी. हल्ली फिशकट स्वरुपातील पेटीकोट मिळतात. जे खूपच छान फिटिंग देतात. कॉटन किंवा कोणत्याही साडीवर पेटीकोट कॉटन किंवा पॉपलिन निवडा त्यामुळे त्याचा शेप खूप छान बसतो. त्यामुळे चांगला पेटीकोट निवडा साडी नक्कीच चांगली बसेल

पीन अप करताना

Instagram

 चांगली साडी नेसल्यावर साडीच्या निऱ्या आणि पदर हा भाग आपल्याला आकर्षित करत असतो. जर तुम्ही साडीचे योग्य पीनअप केले तर त्या साड्या फुललेल्या दिसत नाही. साड्यांच्या निऱ्या जर फुललल्या सारख्या वाटत असतील तर तुम्ही निऱ्याकडील भागावर स्ट्रेटनर फिरवा. त्यामुळे साड्या या छान घट्ट बसायला मदत मिळते. ती चापून चोपून नेसल्यासारखे वाटते. इतकेच नाही तर तुम्ही पदरही अगदी तसाच लावला तरी देखील तो तसाच चांगला दिसू शकतो.त्यामुळे निऱ्यांकडील भाग आणि पदर याचे योग्यपद्धतीने पीनअप करा. तुमची साडी अगदी छान नेसलेली दिसेल.

 आता साडी नेसताना या गोष्टी केल्या तर तुमची साडी अजिबात फुलणार नाही.

Read More From DIY फॅशन