प्रत्येक महिलेला आपला चेहरा डागविरहित असावा असंच वाटतं आणि त्यासाठी प्रत्येक जण ही आपल्या त्वचेची व्यवस्थित काळजी घेत असते. पण तरीही काही वेळा त्वचेच्या अशा समस्या असतात ज्यापासून तुमची त्वचा वाचू शकत नाही. यामध्ये सर्वात जास्त समस्या असते ती ब्लॅकहेड्सची (blackheads problem). त्वचेवर लहान लहान पुळ्यांप्रमाणे येणारे हे ब्लॅकहेड्स अजिबातच चांगले दिसत नाहीत आणि यामुळे आपला चेहरा अधिका खराब दिसतो. ब्लॅकहेड्सच्या त्रासापासून सुटका मिळविण्यासाठी अनेक घरगुती उपायदेखील करता. तसं तर नाकावर जास्त ब्लॅकहेड्स दिसून येतात पण ब्लॅकहेड्स हे त्वचेवर कुठेही दिसून येतात. तुम्ही ब्लॅकहेड्स अगदी सहजरित्या काढू शकता. पण ब्लॅकहेड्स काढून टाकणं गरजेचे आहे. पण घरातच सोप्या पद्धतीने जर ब्लॅकहेड्स काढणार असाल तर नक्की कोणत्या चुका करायच्या नाहीत याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जाणून घेऊया त्याविषयी.
दाबून काढू नका ब्लॅकहेड्स
काही महिलांना सवय असते जेव्हा ब्लॅकहेड्स काढले जातात तेव्हा त्वचेवर दबाव देऊन आतील ब्लॅकहेड्स काढण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र असं अजिबातच करू नये. सर्वात पहिले जे ब्लॅकहेड्स आपल्या त्वचेवर दिसत आहेत, त्यांना रिमूव्हरच्या मदतीने तुम्ही काढा. त्यानंतर त्वचेच्या आतील ब्लॅकहेड्स काढण्याचा प्रयत्न करा. मात्र त्यासाठी त्वचेवर कोणताही जोर देत अथवा दबाव टाकत हे ब्लॅकहेड्स काढू नका. असं केल्यामुळे तुमच्या त्वचेवर काळे डाग पडतात आणि त्वचा अधिक काळी दिसून लागते. त्यामुळे याची काळजी घ्या.
अत्यंत जोर देऊन त्वचा स्क्रब करू नका
त्वचा स्क्रब केल्यामुळे डेड स्किन सेल्स बाहेर निघून जातात आणि त्वचेवरील अतिरिक्त तेलही काढण्यास मदत मिळते. ज्यामुळे ब्लॅकहेड्स बिल्टअप होत नाहीत आणि ते ब्लॅकहेड्स काढून टाकणेही यामुळे सोपं होतं. पण काही महिला ब्लॅकहेड्स काढण्याच्या मागे लागून त्वचेला अगदी जोर देऊन स्क्रब करतात. यामुळे ब्लॅकहेड्स तर निघत नाहीत मात्र त्वचेमध्ये जळजळ, रॅश येणे आणि अन्य समस्या निर्माण होतात. त्यामुळे ब्लॅकहेड्स काढताना जर तुम्ही स्क्रब करणार असाल तर या गोष्टीची नक्की काळजी घ्या.
नखांचा वापर करणे टाळा
हीदेखील एक अत्यंत कॉमन चूक आहे. कधी ना कधीतरी ही चूक प्रत्येकाकडून होतेच. तुम्ही कदाचित पाहिलं असेल की, जेव्हा आपण आपला चेहरा धुतो तेव्हा ब्लॅकहेड्स दिसतात आणि ते आपल्याला आवडत नाही. त्यामुळे आपल्या नखांनी आपण ब्लॅकहेड्स काढण्याचा प्रयत्न करतो. पण असे अजिबात करू नका. असे केल्यामुळे ब्लॅकहेड्स निघत नाहीत पण तुमच्या त्वचेवर मात्र याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही ब्लॅकहेड्स काढण्यासाठी ब्लॅकहेड्स रिमूव्हरचाच वापर करावा.
प्रत्येक वेळी ब्लॅकहेड्स रिमूव्हर नियमित स्वच्छ करा
ही कदाचित बघताना तुम्हाला लहानशी चूक वाटत असेल, पण यामुळे त्वचेला अधिक हानी पोहचू शकते. तुम्ही जेव्हा ब्लॅकहेड्स काढता तेव्हा तुम्ही वापर करण्यापूर्वी व्यवस्थित स्वच्छ करून घेणे आवश्यक आहे. तुम्ही ब्लॅकहेड्स रिमूव्हर नीट वापरले नाही तर त्वचा डॅमेज होऊन संक्रमणाचा त्रास अधिक वाढतो. त्यामुळे वेळीच तुम्ही याचा उपयोग करून घ्या.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक