आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये विविध धर्माचे लोक राहतात. भारतामध्ये अनेक मंदिरे, मस्जिद, गुरूद्वारा आणि चर्च आहेत. विदेशात आपल्याला ख्रिसमसचा उत्साह दिसतोच. पण भारतातही अनेक चर्च असे आहेत जिथे ख्रिसमसचा उत्साह दिसून येतो. सगळे सण आपल्याकडे एकत्र साजरे करण्यात येतात. भारतातील काही प्रसिद्ध चर्च आहेत जिथे तुम्ही ख्रिसमस अगदी मनाप्रमाणे आणि उत्साहात साजरा करू शकतात. अशाच काही विशेष चर्चविषयी आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. यावर्षीचा नाताळ अर्थात ख्रिसमस तुम्हाला साजरा करायचा असेल तर तुम्ही वेळ काढून नक्की या चर्चमध्ये जाऊ शकता. हे चर्च केवळ भारतातच नाही तर अगदी जगभरात प्रसिद्ध आहेत. अगदी विदेशी पर्यटकही इथे नाताळसाठी खास येऊन सेलिब्रेशनचा आनंद घेतात.
महाराष्ट्रात या ठिकाणी करा मनसोक्त हायकिंग (Hiking Spots In Maharashtra In Marathi)
बासिलिका ऑफ बोम जीजस, गोवा
सर्वात पहिले आपण बघूया गोवा. हे चर्च जगभरासह भारतातील सर्वात प्रसिद्ध चर्च आहे. साधारण 300 वर्षांपूर्वी या चर्चची स्थापना करण्यात आली होती. बऱ्याच लोकांचा असा समज आहे की, गोव्यामध्ये जेव्हा पोर्तुगीजांचे राज्य होते तेव्हा हे चर्च बांधण्यात आले होते. ख्रिसमसच्या दिवशी इथले स्थानिक लोक आणि गोव्यात आलेले अनेक पर्यटकदेखील या चर्चमध्ये कँडल मार्च लावण्यास आणि प्रार्थना करण्यासाठी येतात. ख्रिसमसच्या दिवशी इथले वातावरण खूपच वेगळे असते. अत्यंत उत्साही आणि खूप सुंदर वातावरणात इथे नाताळ साजरा करण्यात येतो.
रोमँटिक व्हॅलेंटाईन साजरा करा ‘रोमँटिक’ ठिकाणी – Valentines Day With Your Partner In Marathi
क्राईस्ट चर्च, सिमला
तसं तर सिमला म्हटलं की, बर्फ आणि थंडावा यासाठी आपण नेहमीच तिथे जाण्याचा विचार करतो. पण इथे तुम्हाला अनेक प्राचीन चर्चदेखील पाहायला मिळतात. सिमलामध्ये असणारे क्राईस्ट चर्चला राजधानीचा ताज म्हटलं जातं. इंग्रजांच्या काळातील हे बांधलेले चर्च आजही सिमला शहराची शान आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की, गरमीच्या दिवसामध्ये इंग्रज शासक गरमीपासून वाचण्यासाठी कोणत्या ना कोणत्या हिल स्टेशनच्या शोधात निघायचे. त्याच दरम्यान या चर्चची स्थापना करण्यात आली होती. आजही या चर्चचे सौंदर्य लोकांना भावते आणि नाताळच्या दिवसात या चर्चमध्ये खूप गर्दी असते. इथे एक प्रकारची जत्राच भरलेली असते.
जुनी परंपरा टिकवूनही आधुनिकता जपणारे ‘दादर’
वल्लारपदम बासिलिका चर्च, केरळ
संपूर्ण भारतामध्ये अनेक चर्च आहेत मात्र दक्षिण भारतातील सर्वात मोठे चर्च म्हणून ओळखले जाते ते वल्लारपदम बासिलिका चर्च. केरळमध्ये हे एक दर्शनीय पर्यटन स्थळ आहे. इथे अनेक पर्यटक फिरायला येतात आणि चर्चला भेट देऊन जातात. हे चर्च अत्यंत मनमोहक असून आकर्षक आहे. केरळमध्ये या चर्चला आवर लेडी ऑफ रॅनसम नावाने ओळखलं जाते. असे म्हटले जाते की, स्थानीय निवासी ईसाच्या आईला प्रेमाने वल्लार्पदाथाम्मा या नावाने ओळखत होते. त्यामुळे असे नाव ठेवण्यात आले आहे. नाताळच्या दिवशी या चर्चची रौनक पाहण्यासारखी असते. हे चर्च सजवलेले असते आणि अगदी लांबून लोक इथे दर्शनासाठी येतात. या चर्चचे निर्माण 1524 मध्ये पोर्तुगाल शासकांनी केले होते.
वाचा – Christmas Gifts For Boyfriend In Marathi
सेंट पॉल कॅथेड्रेल, कोलकाता
कोलकातामधील सेंट पॉल कॅथेड्रेल हे चर्चदेखील जगभरात प्रसिद्ध आहे. या चर्चशिवाय अनेक प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांसाठीदेखील पश्चिम बंगाल उत्तम पर्यटन स्थळांसाठी ओळखले जाते. हे चर्च गौथिक वस्तुकलेचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगण्यात येते. या चर्चची स्थापना साधारण 1839 ते 1847 दरम्यान झाली आहे. या चर्चला आशिया खंडातील पहिले एपिस्कोपल चर्चदेखील मानले जाते. नाताळच्या दिवशी चर्च आणि आजूबाजूच्या परिसरात अत्यंत उत्साह आणि रोषणाई तुम्हाला दिसून येतो.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमचा The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक