बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय एका भंयकर अपघातातून वाचली आहे. मौनीने नुकतंच तिच्यासोबत घडलेला हा प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओवरून तिच्यासोबत घडलेली घटना किती भयंकर आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो. सुदैवाने या घटनेमधून मौनी रॉय वाचली आहे. मौनी रॉयने या घटनेबाबत स्वतः सोशल मीडियावर या अपघाताबाबत माहिती शेअर केली आहे. ती या घटनेतून वाचल्यामुळे तिचे चाहते आनंदी झाले आहेत. मात्र ही घटना इतर कोणासोबत घडू नये यासाठी मुंबई मेट्रोला काळजी घेण्याची नक्कीच गरज आहे.
काय घडलं मौनी रॉय सोबत
मौनी रॉय तिच्या कारमधुन जुहूमध्ये प्रवास करत होती. जुहूच्या सिग्नलवर तिची गाडी थांबली आणि अचानक तिच्या गाडीचे सन रूफ कोसळले. काही कळायच्या आत तिच्यासोबत ही घटना घडली होती. झालं असं की रस्त्याशेजारी मुंबई मेट्रोचं काम सुरू होतं. मुंबई मेट्रोच्या अकराव्या मजल्यावरून एक दगड मौनीच्या गाडीवर येऊन धडकला होता. मात्र मौनी रॉयच्या ड्राईव्हिंग सीटपासून तो दगड लांब पडल्यामुळे मौनी रॉयला कोणतीही दुखापत झाली नाही. जर तो दगड तिच्या ड्रायव्हिंग सीटवर पडला असता तर मौनीला दुखापत होऊ शकली असती.
मौनी रॉयचं याबाबत नेमकं काय आहे म्हणणं
मौनी रॉयसोबत घडलेली ही घटना अतिशय चिंताजनक आहे. कारण अचानक गाडी चालवताना तिच्यासोबत हा प्रसंग घडला होता. मौनी रॉयने यासाठी मुंबई मेट्रोला जबाबदार ठरवलं आहे. मौनीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं आहे की मेट्रोचं काम सुरू असलेल्या 11 व्या मजल्यावरून तिच्या गाडीवर हा दगड पडला होता. यावेळी ती तिच्या गाडीत होती त्यामुळे फक्त तिच्या गाडीचं नुकसान झालं आणि ती बचावली. मात्र जर कोणी रस्त्यावरून जात असतं तर हे त्याच्या जीवावर नक्कीच बेतलं असतं. मेट्रोने या कामाबाबत केलेल्या या दुर्लक्षपणामुळे एखाद्याचा जीवदेखील जाऊ शकला असता. ही घटना मौनीसाठी आणि सर्वांसाठी नक्कीच धक्कादायक आहे. शिवाय या अपघातानंतर या समस्येवर उपाय करण्यासाठी मेट्रोकडून कोणतीच दखल घेतली नाही असा आरोप मौनीने केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर याबाबत एखादी सुरक्षेची खबरदारी मेट्रोकडून घेतली जावी अशी तिची अपेक्षा आहे.
मौनी रॉयचा आगामी चित्रपट
मौनी रॉयच्या आगामी चित्रपटाचा मेड इन चायनाचं ट्रेलर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. मेड इन चायना हा एक कॉमेडी चित्रपट असून दिवाळीच्या दरम्यान तो प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार रावदेखील आहे. याशिवाय अमायरा दस्तूर, परेश रावल, बोमन ईराणी, गजराज राव, सुमिक व्यास अशा कॉमेडीच्या बादशहांना या चित्रपटात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. शिवाय मौनी रॉय आणि राजकुमार राव हे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा
मिशन मंगल नंतर विद्या बालन झळकणार आणखी एका बायोपिकमध्ये
जेव्हा दीपिका पदुकोण विसरली की, तिचं लग्न झालंय
Good News: रवीना टंडनच्या घरी आला छोटा पाहुणा, रवीनाने दिली गोड बातमी
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade