धोंडिबा कारंडे दिग्दर्शित ‘पळशीची पीटी…गोष्ट हरवलेल्या प्रत्येकाची’ हा चित्रपट कान्स आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवण्यात आलेला आहे. यासोबत राज्य पुरस्काराने गौरवण्यात आल्यामुळे या मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून एका खेडेगावातील आणि गरीब परिस्थितीतूनही अॅथलीट होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. धोंडिबा कारंडे यांनी ही कथा लिहिली आहे तर यातील संवाद तेजपाल वाघचे आहेत. या चित्रपटामधून खेडेगावांमधून दडलेलं टॅलेंट आणि व्यथा दाखवण्यात आली आहे. आपल्याकडे क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवतील असे विद्यार्थी आहेत मात्र योग्य संधी आणि सोयीसुविधा न मिळाल्यामुळे त्यांना कसं पुढे येता येत नाही हे यातून दिसून येतं. ज्याचा परिणाम जेव्हा ऑलिंपिकमध्ये जाण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपल्या हाती काहीच नसतं.
किरण ढाणेने उत्तम रंगवली आहे ‘भागी’ची व्यथा
या कथेची सुरूवात होते भाग्यश्री देवकाते (किरण ढाणे) च्या जीवनातील संघर्षापासून. धनगर कुटूंबातील शालेय शिक्षण घेत असलेली भागी, तिच्या घरची अत्यंत बिकट परिस्थिती, मोठ्या दोन बहीणींच्या लग्नामुळे कर्जात बुडालेले आणि सतत शिव्या देणारे वडील, कटकट करणारी पण प्रसंगी पाठीशी उभी राहणारी आई यातून तिच्या धाववटू होण्याच्या स्वप्नाचा उदय होतो. मात्र या स्वप्नाच्या दिशेने पुढे वाटचाल करत असतानाच तिच्या गावातील विकास शिंगाडे (राहूल मगदूम) हा तरूण तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागतो. विकास शिंगाडे शिक्षण घेऊन पोलिस दलातील हवालदार या पदावर रूजू झालेला असतो.ज्यामुळे घरातील लोकांना त्याच्या लग्नाची घाई झालेली असते. गावातील मध्यस्थांच्या मदतीने भागी आणि विकासच्या लग्नाची सुपारी फुटते. विशेष म्हणजे ज्या दिवशी तिला शालेय धावण्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळतो त्याच दिवशी तिचं लग्न ठरल्यानंतर ओटी भरण्यात येते. भागीच्या धावण्याच्या संघर्षात तिला घर, गावातील प्रतिष्ठित मंडळी, शाळेच्या क्रीडा विभागातून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. क्रीडा शिक्षकांची भूमिका देशमुख सर (धोंडिबा कारंडे) यांनी साकारली आहे. भागीला क्रीडा विभागातून राज्यस्तरीय स्पर्धेत धावण्यासाठी साधे चांगले बुटदेखील दिले जात नाहीत. साध्या साध्या गोष्टींवरून तिला स्वतःला ‘पळशीची पीटी’ समजू नकोस म्हणून हिणवलं जातं. ज्यावरून तिला पळशीची पीटी हे नाव पडतं. धावण्याच्या या प्रवासात तिच्यासोबत स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी शाळेतून कोणी तयार नसतं. शेवटी ती तिच्या कला शिक्षकांच्या मदतीमुळे धावण्याच्या स्पर्धेत राज्यातून पहिलं येण्याचं यश प्राप्त करू शकते. कला शिक्षक बिडकर सर (राहुल बेलापूरकर) तिला यासाठी स्वतःचे पैसे खर्च करून मदत करतात. कला शिक्षक असूनही कर्तव्याचं भान ठेवत ते भागीच्या धावण्याची तयारी करून घेतात. मात्र जेव्हा मेहनतीचं फळ मिळतं तेव्हा मात्र हे चित्र पूर्णपणे बदलतं.
पळशीची पीटी ‘भागी’च्या आयुष्यातील संघर्षकथा
भागी राज्यातून प्रथम आल्यावर माध्यमांसमोर येण्यासाठी इतर मंडळी कशी खोटं बोलतात आणि भागीला खोटं बोलायला लावतात हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे. मात्र पुन्हा जेव्हा तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याची वेळ येते तेव्हा नेमकं काय घडतं, कोण तिला मदत करतं, तिला यश मिळवता येतं का, या चित्रपटाचा शेवट जीवाला चटका लावणारा आहे. पण शेवटी नेमकं काय होतं हे पाहण्यासाठी हा चित्रपट पाहणं नक्कीच गरजेचं आहे.
चित्रपट पाहिल्यावर नेमकं काय वाटतं?
चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांनी त्यांच्या भूमिका चांगल्या पद्धतीने निभावल्या आहेत. मात्र तरिही चित्रपट पूर्ण वाटत नाही. कथा चांगली असूनही ती रंगवण्यात दिग्दर्शकाला अपयश आलेलं आहे असं वाटत राहतं. चित्रपट पाहताना कथा तुटक तुटक पद्धतीने पुढे सरकत आहे असं वाटत राहतं ज्यामुळे ती मनाला भिडत नाही.
अधिक वाचा
#angrybirdsmovie2 मधील ‘रेड’ला कपिल शर्माचा आवाज
साजणा’ने गाठली शंभरी, मालिकेचं यश आणि पूजाच्या वाढदिवसानिमित्त केलं सेलिब्रेशन
OMG अर्जुन रेड्डी स्टार Vijay Deverakonada सोबत झळकणार Janhvi Kapoor
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade