मुलांच्या डोक्यात काय सुरु आहे हे कळणं पालकांसाठी एक टास्कच असतो. कारण अनेकदा मुलं समोरुन एक आणि मागून एक अशी असतात. कधी कधी साधी, काहीही न करणारी, कोणात न मिसळणारी मुलं अचानक काहीतरी असे करतात की, पालकांचा त्यांच्यावर विश्वास बसणे कठीण होऊन जाते. तुम्ही मुलांच्या कितपत जवळ आहात त्यावरुन तुमचा तुमच्या मुलांशी असलेला संवाद कळतो. खूप पालकांना आपली मुलं ओळखता येत नाही. यात पालकांचा दोष आहे असे अजिबात नाही. कधी कधी पालकांना मुलांशी बोलताना त्यांच्या खासगी गोष्ट जाणून घेणे गरजेचे असते. त्यांच्या अपेक्षा आणि त्यांची आवड जाणून घेणे गरजेचे असते. मुलांशी विशेषत: वयात येणाऱ्या मुलांशी काय बोलावे ते जाणून घेऊया
लहान मुलांना असं हसतखेळत भरवा जेवण, फॉलो करा या टिप्स
अपेक्षांचे ओझे
बरेचदा पालक आपल्याला पूर्ण न करता आलेली स्वप्ने आपल्या मुलांकडून पूर्ण करण्यासाठी त्यांच्यावर खूप ताण आणतात. त्याला जमते की नाही हे विचारण्यापेक्षा तुला हे करावे लागले असे करुन पालक मुलांमधील आत्मविश्वास दिवसेंदिवस कमी करतात. तुमच्या मुलाला तुम्हाला काय करायचे आहे ही तुमची इच्छा असली तरी त्या गोष्टीसाठी त्याची बौद्धिक पात्रता काय? त्याला ते जमतंय का? तो करु शकण्यास सक्षम आहे का? या सगळ्या गोष्टी तुम्ही माहीत करुन घ्यायला हव्यात. त्यांच्याकडून त्यांच्या करिअरविषयी सतत बोला.त्यांना जर काही अडत असेल तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा. त्यामुळे त्यांना तुमच्या अपेक्षा हे ओझे वाटणार नाही.
त्यांना काही खुपते का?
खूप तरुणांना अनेक प्रश्न असतात. त्यांना त्यांच्याविषयी समाजाविषयी त्यांच्यासोबत घडणाऱ्या घटनांविषयी खूप प्रश्न असतात. त्यांच्या त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. तर मात्र त्याचा मागोवा घेताना अशी मुलं चुकीच्या संगतीत जातात. त्यांना घर, पालक किंवा आलेल्या जबाबदाऱ्या नकोशा होतात. तुमची मुलं अस्वस्थ वाटत असतील तर ते अस्वस्थ का आहेत? याबद्दल त्यांना विचारा.कधी कधी मुलं शांतचं आहेत असे समजून पालक त्यांच्याशी काहीही बोलत नाहीत. अशी लोक अचानक संपर्कातून तुटतात. त्यांना कोणीही नकोसे वाटते. घराबाहेर राहणे, खोटे बोलणे त्यांना अधिक चांगले वाटते. त्यामुळे अशी मुलं हाताबाहेर जायला वेळ लागत नाही.
पालेभाजी खायला मुलं नकार देतात?, पालकांनो एकदा वाचा
तुमची मुलं उद्धट आहेत का?
मुलांचा हजरजबाबीपणा खूप जणांना आवडतो. पण कधी उद्धट होण्याकडे रुपांतर घेतो. हे देखील तुम्हाला कळायला हवे. बरेचदा मुलांना काहीही मिळाले नाही किंवा त्यांच्या मनासारखे झाले नाही की, ते फारच उद्धट बोलतात. असंच करुन टाकीन, तुला मी मारीन किंवा काहीतरी विक्षिप्त बोलू लागतात. आपल्याला खूप कळतं असं दाखवताना देखील खूप मुलं खोटं बोलू लागतात. त्यांचे खोटं बोलणं इतकं सहज होऊन जातं की, कोणालाही त्याचा थांगपत्ता लागत नाही. तुमच्या मुलांमध्येही असा बदल होत असेल तर त्याला वेळीच रोखा. कारण ही पहिली पायरी आहे. जिथे मुलं बिघडण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही मुलांकडे अधिक लक्ष द्या. त्याच्यांसोबत वेळ घालवा.
आता तुमच्या तरुण मुलांशी तुम्ही संवाद साधा.म्हणजे तुम्हाला त्यांच्या मनातील कळायला वेळ लागणार नाही.
नुकतीच गर्भधारणा झाली असेल तर अशी घ्या काळजी