DIY फॅशन

तुमचीही उंची कमी आहे का, वापरा हे फुटवेअर्स

Dipali Naphade  |  Apr 19, 2022
must-have-footwears-for-short-heighted-girls-in-marathi

अनेकदा लहान उंचीच्या मुलींना आपल्या उंचीमुळे अनेकांचे बोलणे ऐकून घ्यावे लागते. त्यामुळे उंच दिसण्यासाठी दिवसभर हाय हिल्स घातले जातात. पण प्रत्येक लहान उंचीच्या मुलींना हाय हिल्स घालून चालणे जमतेच असं नाही. अनेक मुली वेगवेगळ्या फॅशन हॅक्स फॉलो करतात. काही मुली या उंच दिसण्यासाठी आऊटफिट्सवर लक्ष केंद्रित करतात तर काही मुली फुटवेअर्सवर. उंच दिसण्यासाठी तुम्हाला जर फुटवेअर्स वापरायच्या असतील तर नक्की कशी स्टाईल करायची याबाबत आम्ही तुम्हाला या लेखातून सांगत आहोत. उंच दिसण्यासाठी असे काही फुटवेअर्स जे तुम्हाला आरामदायीही ठरतील आणि तुम्ही उंचही दिसाल. 

पीप टो हिल्स (Peep Toe Heels)

आजकाल पीप टो हिल्स खूपच ट्रेंड्समध्ये आहेत. तुमची उंची कमी असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे हिल्स नक्की घालू शकता. हे हिल्स तुमच्या लहान पायांना अधिक लांब दर्शविण्यासाठी उपयोगी ठरतात. तसंच तुमच्या कमी उंचीला अधिक उंची असण्याचा भास देतात. पीप टो डिझाईन्समध्ये तुमचे हिल्स, शूज, बॅली शूज आणि सँडल अशा सर्व स्टाईल्स उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार हिल्स घालू शकता. 

टिप्स 

पंप सँडल (Pump Sandals)

या पद्धतीच्या सँडल्सना आजकाल खूपच मागणी आहे. या सँडल्सचे पॉईंट्स खूपच कमी असतात, तसंच सँडलना खूपच स्लीक हिल्स देण्यात आली आहे. तुम्हाला जर हाय हिल्स घालायचे असतील तर पंप हिल्स सँडल हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. 

टिप्स 

पॉईंटेड फ्लॅट्स (Pointed Flats)

कमी उंची असल्यानंतरही तुम्हाला हाय हिल्स घालणे जर जमत नसेल, तर तुमच्यासाठी पॉईंटेड फ्लॅट्स सर्वात उत्तम फुटवेअर्स आहेत. तुम्ही कोणत्याही नॉर्मल आऊटफिट्ससह हे घालू शकता. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचे पॉईंटेड फ्लॅट्स खरेदी करणार असाल तेव्हा लक्षात ठेवा की, फ्लॅट सँडल असतील तरीही ते पॉईंटेड असावे. ज्यामुळे तुमच्या पायांचा आकार मोठा दिसून येईल. 

टिप्स 

हाय हिल्स आणि पॉईंटेड बूट्स (High Heels and Pointed Boots)

बूट्स स्कर्ट अथवा ड्रेससह बूट्स खूपच स्टायलिश दिसतात. तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये वेगवेगळ्या स्टाईल्सचे बूट्स समाविष्ट करून घेऊ शकता. पॉईंटेड आणि हाय हिल्स बूट्स तुमची उंची अधिक दाखविण्यासाठी मदत करतात. काळे अथवा न्यूड शेड्सचे बूट्स तुम्हाला अधिक उंच दाखवतात, याशिवाय कोणत्याही आऊटफिट्ससह स्टायलिश दिसतात. 

टिप्स 

सिंपल फ्लॅट सँडल (Simple Flat Sandals)

साधारणतः आपल्याकडे कमीत कमी एक सिंपल फ्लॅट सँडल असणे गरजेचे आहे. तुम्ही हे कोणत्याही आऊटफिट्ससह कॅरी करू शकता. ज्या व्यक्ती हाय हिल्समध्ये आरामदायी वावरू शकत नाहीत, त्यांच्यासाठी फ्लॅट सँडल्स सर्वात चांगली ठरते. 

टिप्स 

आम्ही सांगितलेले फुटवेअर्स तुम्ही तुमच्या नियमित स्टाईलमध्ये सामावून घेतले तर तुमची उंची कमी असल्यासही तुम्ही उंच दिसाल. ही स्टाईल तुम्ही नक्की करून पाहा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन