अॅक्सेसरीज

हिवाळ्यात या विंटर फॅशन एक्सेसरीजने दिसा जास्त स्टायलिश

Trupti Paradkar  |  Dec 21, 2021
Must have trendy winter fashion accessories in Marathi

हिवाळा आला की सर्वांनाच स्वेटर, जॅकेट आणि स्टोलसारखे कपडे घालावे लागतात. अशा जाड आणि आणि बोरींग कपड्यामुळे स्टाइलिश कपडे आणि एक्सेसरीज वॉर्डरोबमध्ये कैद होतात. थोडक्यात हिवाळ्यात कोणती स्टाईल कॅरी करावी हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे हिवाळा फारसा कोणाला आवडत नाही. मात्र हिवाळा देखील तुम्हाला स्टाइलिश दिसण्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरू शकतो. हिवाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही या अॅक्सेसरीज खरेदी करू शकता.

हिवाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी ट्राय करा हे हटके डिझाईन्सचे ’15’ श्रग (Shrugs For Winter In Marathi)

हिवाळ्यात या एक्सेसरिजने दिसा ट्रेंडी

हिवाळ्यात तुमचा लुक आणि स्टाइल ट्रेंडी ठेवायची असेल तर काही विंटर एक्सेसरीज तुमच्याकडे असायलाच हवे. ज्यामुळे तुम्ही कोणतीही फॅशन न करताही ट्रेंडी आणि स्टाइलिश दिसू शकाल. 

पॉम पॉम हॅट 

हिवाळ्यात स्वेटर, लेदर जॅकेट अथवा फर जॅकेट तुमच्या लुकमध्ये एक छान बदल आणतात. मात्र त्यासोबत तुमच्याजवळ जर पॉम पॉम हॅट असेल तर तुमचा लुक अगदी परफेक्ट दिसेल. तुम्ही एखाद्या छान स्वेटशर्ट अथवा स्टोलसोबतही ही टोपी कॅरी करू शकता. या हॅटमुळे तुमच्या डोक्याचे थंडीपासून संरक्षण होईलच शिवाय तुमचा लुकपण हटके दिसेल.

रंगबिरंगी स्कार्फ

स्कार्फ अथवा स्टोल हिवाळ्यात तुमचं थंडीपासून बचाव करण्यास मदत करतात. मात्र एवढंच नाही तर एखाद्या छानशा रंगीत स्टोल अथवा स्कार्फमुळे तुमच्या लुकमध्येही छान चेंज होतो. आजकाल गडद रंगाचे अथवा मल्टी कलर स्कार्फ बाजारात सहज मिळतात. तुम्ही कोणत्याही ड्रेस अथवा वेस्टर्न आऊटफिटसोबत ते मॅच करू शकता.

बॉडीकॉन ड्रेस आणि स्टायलिंग टिप्स (Bodycon Dresses In Marathi)

लेग वार्मर 

हिवाळा आला की तुमचे शॉर्ट ड्रेस तुम्ही बाजूला काढून ठेवता आणि जीन्स अथवा लॉंग ड्रेस घालणं सोयीचं समजता. पण एखाद्या पार्टीसाठी अथवा वेकेशनवर असताना तुम्हाला शॉर्ट ड्रेस घालायचा असेल तर तुम्ही त्यासोबत लेग वॉर्मर घालू शकता. कारण त्यामुळे तुमच्या पायाला थंडी वाजत नाही आणि तुम्ही स्टायलिश दिसता.

इअर मफ 

आजकाल तुम्हाला कुठेही आकर्षक इअर मफ विकत मिळतात. कानात थंडी भरली तर तुम्हाला जास्त थंडी लागते. यासाठी कानाचे थंडीपासून संरक्षण करणं गरजेचं असतं. इअर मफमुळे तुमच्या कानाला थंडी लागत नाही. प्रवासात थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही एअर मफ वापरू शकता. विशेष म्हणजे त्यामुळे तुम्हाला एक छान कोझी लुक मिळतो. 

हॅंड ग्लोव्ज

हात थंडीपासून वाचावेत यासाठी तुम्ही लोकरीचे ग्लोव्ज हातात घालू शकता. आजकाल अनेक स्टायलिश ग्लोव्ज बाजारात मिळतात. हे ग्लोव्ज तुमच्या हाताचे थंडीपासून संरक्षण करतातच शिवाय त्यामुळे तुम्ही स्टायलिशही दिसू शकता. 

जीन्सवर घालता येतील असे लाँग टॉप्सचे प्रकार (Long Tops For Jeans In Marathi)

Read More From अॅक्सेसरीज