आपल्या मनातील प्रत्येक इच्छा स्वप्न पूर्ण व्हावीत असे प्रत्येकालाच वाटत असते. पण ही स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्याला पैशाचे पाठबळ लागते. पैसे येताना कासवाच्या गतीने येतात आणि जाताना मात्र सशाच्या गतीने जातात असं म्हटलं जातं ते काही खोटं नाही. आपल्याकडे आलेले पैसे आपण कसे साठवू शकतो यावर सर्वकाही अवलंबून आहे. अतिशय कठीण प्रसंगी कोणी मदतीला आले नाही तरी आपण केलेली बचत किंवा गुंतवणूक नेहमीच मदतीला येते असते. आई किंवा आजीने डाळ तांदळाच्या डब्यामध्ये ठेवलेली बचत या वेळी बाहेर येताना दिसते. पण बदलत्या काळानुसार स्त्री बदलत आहे त्याचप्रमाणे स्त्रीने गुंतवणुकीच्या पद्धतीही बदलायला हव्यात यासाठी ‘POPxo मराठी’ने ‘मनीग्राफ’चे संस्थापक सतीश आयरे यांच्याकडून तुमच्यासाठी मार्गदर्शन घेतलं आहे.
म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय ?
Shutterstock
म्युच्यअल फंड ही गुंतवणूक शेअर बाजारातील सरकारमान्य योजना आहे. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवता तेव्हा तुमचे आणि तुमच्या सारख्याच इतर गुंतवणुकदाराचे पैसे म्युच्युअल फंड एकत्र केले जातात आणि ते पैसे वेगवेगळ्या शेअर्स आणि इतर ठिकाणी गुंतवले जातात. जेणेकरून तुमच्या निवडलेल्या योजनेच्या आणि कालमर्यादेच्या आधारावर तुम्हाला परतावा मिळवता येतो. ज्या प्रमाणे टेलिकॉम कंपनीला सांभाळण्यासाठी TRAI ही संस्था आहे त्याच प्रमाणे म्युच्युअल फंड हे क्षेत्र सांभाळण्यासाठी सेबी (SEBI) ही संस्था कार्यरत आहे.
म्युच्युअल फंडचे प्रकार
म्युच्युअल फंडचे एकूण तीन प्रकार मोडतात. यामध्ये इक्विटी फंड, डेब्टफंड, आणि हायब्रीड फंड यांचा समावेश होतो.
इक्विटी फंड : इक्विटी फंड यामध्ये तुमचे पैसे सरळ शेअर्स मध्ये गुंतवले जातात. म्युच्युअल फंडच्या या प्रकार मोठ्या प्रमाणात धोका असतो पण त्यामुधून मिळणारा नफा पण जास्त असतो.
डेब्ट फंड :डेब्ट फंड या प्रकारामध्ये तुमचे पैसे सरकारी संस्था किंवा डिबेंचर मध्ये गुंतवले जातात. या प्रकाराला सर्वात जास्त सुरक्षित प्रकार मानला जातो. यामध्ये कमी धोका आणि कमी नफा मिळतो.
हायब्रीड फंड : म्युच्युअल फंडच्या या प्रकारामध्ये तुमचे पैसे इक्विटी आणि डेब्ट या दोन्ही प्रकारामध्ये गुंतवले जातात. यामध्ये कमी धोका मानला जातो.
म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा कालावधी :
Shutterstock
दीर्घकालीन म्युच्युअल फंड : जर तुम्ही दीर्घकाळ गुंतवणुकीचा विचार करत असाल तर दीर्घकालीन म्युच्युअल फंड सर्वात उत्तम पर्याय राहील. यामध्ये तुम्ही 10 ते 20 वर्षासाठी तुमच्या पैशांची गुंतवणूक करता. दीर्घकालीन म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही एक रक्कमी किंमत टाकू शकता किंवा प्रत्येक महिन्यामध्ये काही विशिष्ट रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करू शकता त्याला एसआयपी ( Systematic Investment plans – SIP) म्हणतात.
अल्पकालीन म्युच्युअल फंड : जर तुम्ही एक किंवा दोन वर्षासाठी चांगला गुंतवणुकीचा पर्याय शोधात असाल तर या पर्यायाकडे नक्की पाहा. जर तुम्ही अल्पकालीन म्युच्युअल फंड गुंतवणूक करणार असाल तर डेब्ट फंड वापर करा त्यामुळे तुम्हाला कमी धोका सहन करत कोणत्याही बँकेपेक्षा जास्त व्याज मिळू शकतो.
म्युच्युअल फंड निवडण्याचे निर्देशक :
होणारा नफा : कोणतीही गुंतवणूक आपण त्या गुंतवणूकीपासून होणाऱ्या नफाकडे पाहूनच करत असतो. त्याच प्रमाणे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असताना तुम्हाला होणारा नफा नीट तपासून घ्या आणि मगच गुंतवणूक करा. एखाद्या कंपनीमध्ये गुतंवणूक करताना त्या कंपनीचा मागील 10 वर्षाचा अहवाल नक्की तपासून पाहा. हि माहिती तुम्हाला कंपनीच्या वेबसाईट वर सहजरित्या उपलब्ध होऊ शकते.
होणारा खर्च : जेव्हा आपण काही गुंतवणूक करतो तेव्हा त्याचा काही खर्च देखील असतो. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना आपले खते सांभाळणाऱ्या व्यक्तीस 1.5% पासून 1% पर्यंत कमिशन म्हणून द्यावे लागते. त्यामुळे ही गोष्टसुद्धा लक्षात घ्यावी लागते.
एन्ट्री आणि एक्झिट लोड : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना सुरुवातीला काही रक्कम द्यावी त्या रकमेचा सुद्धा विचार करून गुंतवणूक करा.
म्युच्युअल फंड कसे सुरु करावे :
प्रथम तुम्ही कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणार आहेत त्या प्रकाराला निवडा. त्यानंतर एसआयपी ची किंमत नक्की करा . गुंतवणूक करत असताना एसआयपी कॅल्क्युलेटर करून भविष्यात मिळणाऱ्या रकमेचा अंदाज आपण घेऊ शकतो. पॅनकार्डच्या मदतीने तुम्ही तुमचे म्युच्युअल फंड खाते चालू करू शकता.
हेदेखील वाचा
लग्न ठरलंय, पण भविष्याचा विचार केलाय का
क्रेडिट कार्ड वापरता, तर मग लक्षात ठेवा ‘या’ 10 गोष्टी
ट्रॅव्हलिंगमध्ये कसे वाचवावेत पैसे, पर्याय आणि टीप्स
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade