Love

#MyStory: अखेर मी त्याला होकार दिला

Aaditi Datar  |  Nov 1, 2019
#MyStory: अखेर मी त्याला होकार दिला

कधीकधी अनेक वर्ष एकत्र राहूनही आपल्याला एखादी व्यक्ती कळतेच असं नाही. जेव्हा समोरच्याला आपल्याबाबत प्रेमाची भावना असते पण आपल्याला त्या व्यक्तीबाबत तसंच वाटणं शक्य नसतं. पण जसा काळ जातो तसं आपल्याला त्या व्यक्तीचं महत्त्व समजतं. अशीच आहे आजची माय स्टोरी (#MyStory).

माझ्या कॉलेजच्या पाचही वर्षात मी अभ्यासाबाबत फोकस होते. एवढी की मला युकेच्या एका युनिव्हर्सिटीतून स्कॉलरशिपही मिळाली. मला सोशल लाईफ असं काहीच नव्हतं. ना मला बॉयफ्रेंड होता ना कोणी जास्त मित्रमैत्रिणी. मी फक्त मजा म्हणून दर वीकेंड मूव्ही पाहायला आवर्जून जात असे. अजून वेगळं म्हणजे मी तीन महिन्यातून एखाद्या हिल स्टेशनला फिरायला जात असे. 

माझ्या आयुष्यात कायम राहिलेली गोष्ट होती ती माझे स्कूल फ्रेंड्स. ज्यापैकी एका होता करण. तो माझा स्कूलपासूनचा बेस्ट फ्रेंड होता. पण आम्ही कॉलेममध्ये गेल्यावर त्याने त्याचं प्रेम माझ्यापुढे कन्फेस केलं आणि आमच्यातील मैत्री थोडी ऑकवर्ड झाली. शाळेनंतर तोही ऑस्ट्रेलियाला गेला आणि मी दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये गेले. तो जेव्हा भारतात यायचा तेव्हा आम्ही भेटायचो. पण तेही खूप कमी होतं. आम्ही कधीच आमच्या लव्हलाईफ आणि लव्ह इंटरेस्टबद्दल एकमेकांशी बोललो नाही.

Shutterstock

कॉलेजनंतर मी युकेतील युनिव्हर्सिटीला जाणं पसंत केलं आणि तोही त्याचवेळी त्याच्या जॉबच्या निमित्ताने लंडनला होता. मी त्याला भेटण्यासाठी खूप उत्सुक होते. आम्ही भेटलो आणि छान वेळ एकमेकांसोबत घालवला. आमची भेट संपता संपता त्याने मला लग्नासाठी प्रपोज केलं. मी थोडी शॉक होते आणि मी त्याला नकार दिला. त्याला वेडबिडं लागलं की काय असं मला प्रपोज करायला. असं मी त्याला म्हटलं. पण तो त्याच्या मतावर कायम होता. त्याला मी समजावलं की, मला त्याच्याबद्दल असं काहीच वाटत नाही. पुन्हा आमच्यातील सिच्युएशन ऑकवर्ड झाली होती.   

त्याच्या ऑफिसचं काम संपल्यावर तो पुन्हा ऑस्ट्रेलियाला गेला. मला मात्र लंडनमध्येच जॉब मिळाला होता. पण तेव्हाच एक वाईट बातमी आली. माझ्या आईला शेवटच्या स्टेजचा कॅन्सर असल्याचं निदान झालं. मी पुन्हा भारतात तिच्यासोबत राहण्यासाठी आले. करणसुद्धा ऑस्ट्रेलियाहून परत आला आमच्यासोबत राहण्यासाठी.

त्यानंतर करण दर दोन-तीन महिन्यांनी आईला आणि मला भेटण्यासाठी भारतात येत असे. या दरम्यानच एकदा जेव्हा तो आला तेव्हा आम्ही ड्राईव्हला गेलो. अचानक त्याने गाडी थांबवली आणि पुन्हा एकदा मला लग्नासाठी प्रपोज केलं. यावेळी मात्र मला त्याला नकार देणं कठीण गेलं. कारण माझ्या वाईट काळात तोच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. मी जशी होते तशी त्याने मला स्वीकारलं होतं. तो माझ्यावर पहिल्यापासून प्रेम करत होता आणि इतक्या वर्षात मी नकार देऊनही त्याने माझा विचार सोडला नव्हता. त्यामुळे तोच माझ्यासाठी योग्य असल्याचं मला कळून चुकलं होतं. तो खूप चांगला मुलगा होता आणि यापेक्षा चांगला नवरा मला नक्कीच मिळाला नसता. त्यामुळे मी त्याला लगेच होकार दिला. 

आता आमच्या लग्नाला तीन वर्ष झाली आहेत. आजही माझ्या मनात राहून राहून विचार येतो की, त्याने जेव्हा मला पहिल्यांदा विचारलं होतं तेव्हाच मी त्याला होकार द्यायला हवा होता. 

हेही वाचा –

#MyStory : त्या वन नाईट स्टँडने मला…

#MyStory: आणि आम्ही Lovers न राहता पुन्हा एकमेकांसाठी….

#MyStory: जेव्हा पार्टीत मी एका मुलीला किस केलं आणि मला ते आवडलं…

Read More From Love