Nail Care

नखं कापताना कधीच करू नका या चुका

Trupti Paradkar  |  Dec 21, 2020
नखं कापताना कधीच करू नका या चुका

मेनिक्युअर केलेली लांबसडक नखं तुमच्या सौंदर्यात अधिक भर घालतात. मात्र नखं योग्य शेपमध्ये वाढण्यासाठी ती वेळच्या वेळी ट्रिम करावी लागतात. शिवाय ट्रिम करताना नखांना योग्य शेप देणंही सोपं जातं. त्याचप्रमाणे जरी तुम्हाला नखं वाढवायची नसतील तरी निरोगी राहण्यासाठी दर पंधरा दिवसांनी नखं कापणं गरजेचं आहे. यासाठीच जाणून घ्या नखं कापताना नेमकी कोणत्या चुका करू नयेत. कारण या चुका वारंवार केल्या तर तुमच्या नखांचं नुकसान होऊ शकतं. 

नखं कोमट पाण्यात न भिजवता कापणे –

नखं नैसर्गिक रित्या वाढत असली तरी ती जसजशी वाढत जातात तस तशी ती कोरडी होतात. अशी कोरडी आणि कडक झालेली नखं कापताना ती वेडी वाकडी कापली जाण्याची शक्यता असते. जर नखं व्यवस्थित कापली गेली नाहीत तर ती मध्येच तुटतात आणि नखाचा तो भाग त्वचेला लागल्यास त्वचेवर ओरखडे येतात. त्यामुळे नखं योग्य पद्धतीने कापणं गरजेचं आहे. यासाठी नखं कापण्यापूर्वी ती नेहमी काही मिनिटे कोमट पाण्यात बूडवून ठेवावी. ज्यामुळे ती नरम होतात आणि त्यांना ट्रिम करणं सोपं जातं.

नखं कापण्याची पद्धत माहीत नसणे –

नखे कापताना ती नेमक्या कोणत्या दिशेने कापावीत हे माहीत असायला हवं. कारण काही जण ती सरळ समांतर रेषेत कापतात. ज्यामुळे पुढे वाढताना  ती त्याच शेपमध्ये वाढू लागतात. यासाठीच जरी तुमची नखं मोठी नसतील तरी ती कापताना गोलाकार अथवाा ओव्हल शेपमध्येच कापा. ज्यामुळे ती वाढताना त्याच शेपमध्ये वाढतील. 

Shutterstock

क्युटिकल्स कापून टाकणे –

क्युटिकल्स म्हणजे नखांच्या मुळाशी असलेले टिश्यूज. नखांच्या मुळांचे रक्षण करण्यासाठी हे क्युटिकल्स खूप महत्त्वाचे असतात. क्युटिकल्स कापून टाकल्यास नखांना इनफेक्शन होण्याची अथवा जखम होण्याची शक्यता वाढते. यासाठीच क्लिपरच्या मदतीने नखांचे क्युटिकल्स सरसकट कापून टाकू नका. नखांवर मॉईस्चराईझर लावून तुम्ही कठीण झालेले क्युटिकल्स मऊ करू शकता. कारण क्युटिकल्समुळे तुमच्या नखांचे संरक्षण होत असते.

नखे कापण्याची साधने स्वच्छ न करणे –

नखे कापताना केली जाणारी ही सर्वात मोठी चुक आहे. कारण नखं कापण्यासाठी लागणारे नेलकटर व इतर साहित्य वापर झाल्यानंतर तसेच ठेवले जातात. ज्याच्यावर सतत धुळ बसत असते. वापर करण्यापूर्वी ही साधने गरम पाण्यात बूडवून अथवा डिसइन्फेंट करून न घेतल्यास त्यावरील जीव जंतू थेट तुमच्या क्युटिकल्समधून नखांमध्ये प्रवेश करतात. मेनिक्युअर अथवा पेडिक्युअर करताना या  गोष्टीची विशेष काळजी  घ्यायला हवी.

Shutterstock

मेनिक्युअर किट इतरांसोबत शेअर करणे –

इनफेक्शन टाळण्यासाठी नखं कापण्याची साधने प्रत्येकाची वेगवेगळी असायला हवीत. कारण या साधनांमधून इनफेक्शन पसरण्याची शक्यता असते. यासाठीच स्वतःचे मेनिक्युअर किट कधीच कोणासोबत शेअर करू नका. असं करणं तुमच्या आरोग्यासाठी हितकारक नाही.

नखांना नियमित मॉईस्चराईझर न लावणे –

नखं कापल्यामुळे आणि स्वच्छ केल्यामुळे ती कडक आणि कोरडी होतात. नखांना मऊपणा येण्यासाठी त्यांना मॉईस्चराईझ करणं गरजेचं असतं. म्हणूनच नखं कापल्यावर हात स्वच्छ धुवावेत आणि चांगल्या मॉईस्चराईझरने नखांपासून हाताच्या कोपऱ्यापर्यंत मसाज करावा. ज्यामुळे तुमची बोटे आणि नखे सुंदर आणि हात मुलायम होतील. 

फोटोसौजन्य – 

अधिक वाचा –

परफेक्ट मेनिक्युअरसाठी घरीच बनवा स्क्रब, मिळवा आकर्षक नखं

नखं सुंदर दिसण्यासाठी मेनिक्युअरपेक्षा फायदेशीर आहे हे डाएट

सुंदर लांब, नखं आवडतात.. मग नक्की करुन पाहा nail extensions

Read More From Nail Care