अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा आणि जाफेद जाफरीचा मुलगा मीझान याचं अफेअर सुरू असल्याच्या चर्चांना सध्या बीटाऊनमध्ये उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच नव्याने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टवर मीझानने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे लोकांनी ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज बांधला होता. ज्यामुळे नव्या आणि मीझान प्रेमात असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र नुकतंच यावर जाफेद जाफरी यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ज्यावरून याबाबतीत जाफेद खूपच नाराज असल्याचं वाटत आहे.
मीझानबाबत काय वाटतं जाफेद जाफरी यांना
आपल्या मुलांचे मित्र मंडळी कोण आहेत आणि त्यांच्या बद्दल समाजात काय बोललं जात आहे यावर पालकांची प्रतिक्रिया नेहमीच महत्त्वाची ठरते. मीझानचे वडील या नात्याने जावेदने एका मुलाखतीत नव्या आणि मीझानच्या नात्याचा खुलाचा केला आहे. ज्यात त्यांनी लोकांनी बांधलेल्या या अंदाजाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते मीझान आणि नव्या यांच्यात प्रेमाचं नातं मुळीच नाही. ते दोघंही एकमेकांचे चांगले मित्रमैत्रीण आहेत. एकमेकांना अगदी शाळेत असल्यापासून ओळखतात. एकत्र शिकले आहेत, खेळले आहेत, अभ्यास केला आहे. ज्यामुळे त्यांची इतर मित्रमैत्रिणींप्रमाणे फक्त गाढ मैत्री आहे. लोकांनी उगागच या मैत्रीला अफेअरचं नाव दिलं आहे. कारण लोकांना फक्त काहीतरी कंटेट हवा असतो अफवा पसरवण्यासाठी. चांगले मित्र असण्याचा नेहमीच असा चुकीचा अर्थ समाजात काढला जातो. नव्या फक्त मीझानचीच नाही तर माझ्या मुलीचीही चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे ही मुलं एकाच फ्रेंड सर्कल मधली आहेत. त्यांचा एक कॉमन फ्रेंडचा ग्रुप आहे. ज्यात सारा अली खानदेखील आहे. ही सर्व मुलं घरी आली की सकाळी तीन वाजेपर्यंत गप्पा मारत बसतात. एकमेकांच्या घरी जातात मजामस्ती करतात. सतत एकत्र दिसल्यामुळे त्यांना लिंकअप करणं लोकांना सहज सोपं वाटत आहे.
मीझान जाफरी कुणाच्या रिलेशनशिपमध्ये
जाफेद जाफरी यांनी जाहीर करण्यापूर्वी मीझाननेही त्याच्या आणि नव्या नवेलीच्या अफेअरच्या चर्चेवर त्याची प्रतिक्रिया दिली होती. मीझाननेही जावेद प्रमाणेच नव्या त्याची एक खास मैत्रीण आहे असंच सांगितलं होतं. ज्यामुळे त्यांच्यात अफेअर नाही हे उघड झालं होतं. त्याच्या मते नव्या त्याच्यापेक्षा त्याच्या बहिणीची खास मैत्रीण आहे. मात्र एकाच फ्रेंड सर्कलमध्ये असल्यामुळे आमच्यातही चांगली मैत्री आहे. शिवाय तो सध्यातरी कुणाच्याही रिलेशनशिपमध्ये नाही हेही त्याने त्यावेळी जाहीर केलं होतं. नव्याची इन्स्टाग्राम पोस्ट आणि त्यावर मीझानने केलेली प्रतिक्रिया यामुळेच बी-टाऊनमध्ये या चर्चेला उधाण आलं होतं. कारण नव्याने तिचे सोलो फोटोज इन्स्टावर शेअर केले होते. ज्यावर मीझानने कंमेट केली होती की हे फोटो कुणी घेतले आहेत. त्या दोघांच्या या संवादामुळे ते फोटो मीझानने घेतले असून ते दोघे एकमेकांना डेट करत असावेत असा अंदाज काढला गेला होता. मात्र आता जावेद जाफरी यांच्या प्रतिक्रियेमुळे सर्व काही उघड झालं आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
चाहत्यांसाठी खुशखबर! या दिवशी प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’
न ओळखता येण्यासारखा सैराटफेम अभिनेत्याचा वेबसिरीजसाठी नवा लुक
बॉलीवूड सुपरस्टार्स ज्यांनी हॉलीवूड चित्रपटांना दिला नकार
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade