सुंदर केस ही सगळ्यांचीच इच्छा असते. चमकदार, जाड, वाऱ्याशी खेळणारे केस सगळ्यांना हवे असतात. असे केस मिळवण्यासाठी अनेक गोष्टी ट्राय करुन पाहिल्या जातात. केसांच्या चांगल्या वाढीसाठी तेल… केसांसाठी हेअर मास्क… केसगळती थांबण्यासाठी आणखी काही वेगळे उपाय करुन पाहिले जातात. केमिकलचा प्रयोग करणे अनेकांना आवडत नाही. म्हणून ते केसांसाठी ऑरगॅनिक प्रयोग केला जातो. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी ओट्स लावा असे सांगितले जाते. पण ओट्स लावताना तुम्ही काळजी घेणे देखील आवश्यक असते.
घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस
मास्क हवा परफेक्ट
shutterstock
चांगल्या केसांसाठी ओट्सचा मास्क लावण्यास सांगितले जाते. अशावेळी आपण ओट्स मास्क घरी बनवताना ओट्स भिजत घालतो. मिक्सरमध्ये ओट्स छान वाटून घेतो. पण ओट्स मिक्सर मधून शक्यतो वाटू नका. कारण मिक्सरमध्ये वाटल्यानंतर त्यावर केमिकल रिअॅक्शन होण्याची शक्यता असते. तुम्ही साधारण आंघोळीच्या आधी किंवा मास्क वापरण्याच्या आधी तासभर ओट्स भिजवून ठेवले तर तुम्ही नुसत्या हाताने ओट्स कुस्करु शकता. त्यामुळे तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने मास्क बनवता येईल आणि त्याचे फायदे तुम्हाला मिळतील.
अप्पर लीपवरील केस काढताय, मग तुम्ही अशी घ्यायला हवी काळजी
केसांवरुन ओट्स काढणेही महत्वाचे
ओट्स केसांना लावल्याने तुमचे केस छान होतात. हे जरी खरे असले तरी देखील तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे हे फारच गरजेचे असते. म्हणजे ओट्स लावल्यानंतर तुम्हाला तुमच्या केसांमधून हे ओट्स काढणेही फारच गरजेचे आहे. कारण जर तुमच्या केसांमधून ओट्स स्वच्छ निघाले नाही. तर मात्र तुमच्या केसांना त्रास होण्याची शक्यता असते. ओट्स जर तुमच्या स्काल्पला चिकटून राहिले तर तुम्हाला कोंडा होण्याची शक्यता असते.
ओट्ससोबत काय घालायचे ?
shutterstock
ओट्सचा वापर करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे ओट्समध्ये तुम्हाला काय घालता येईल. आता हेअर मास्कचा विचार करता तुम्हाला ओट्सचा मास्क तयार करताना त्यामध्ये लिंबू पिळू शकता. पण तुम्ही दही किंवा तत्सम पदार्थ घालत असाल तर तुमचे केस तेलकट होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमचे केस स्मुथ सिल्की हवे असतील पण तुम्हाला तेलकट आणि चपटे झालेले केस नक्कीच आवडणार नाही.
कितीवेळा लावायचे ओट्स
ओट्समध्ये झिंक, ओमेगा 6, आर्यन असे अनेक गुणधर्म आहेत जे तुमच्या त्वचेसोबत तुमच्या केसांसाठीही आवश्यक आहेत. पण त्याचा उपयोग कितीवेळ करावा याला देखील मर्यादा हवी. असे म्हणतात, ‘ऊस गोड लागला म्हणून तो मुळासकट खाऊ नये’ हे खरं आहे कारण तुम्ही ओट्स चांगले आहेत म्हणून सतत लावू नये. कारण त्यामुळेही तुमचे केस खराब होऊ शकतात. आठवड्यातून एकवेळा तुम्ही हा प्रयोग करुन पाहा. म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. जर तुमच्या केसांवर त्याचा विपरीत परिणाम होत असेल तर तो आताच थांबवा.
मग आता केसांसाठी ओट्स लावताना तुम्ही या गोष्टीचा विचार नक्की करा. योग्य सल्ल्याशिवाय त्याचा वापर शक्यतो करु नका.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.