आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या काही गोष्टींचा संबंध हा आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांशी संबंधित असतो. वास्तविक शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या आपल्या आरोग्य आणि मनाशी निगडीत आहेत. यापैकीच एक म्हणजे संध्याकाळच्या वेळी कोणकोणत्या गोष्टी करणे टाळावे. अशा काही गोष्टी आणि कामं आहेत, ज्यामुळे तुम्हाला धनाची हानी सोसावी लागते असं शास्त्रात सांगण्यात येते. आपण बरेचदा नकळतपणे अशी कामं करत असतो, ज्यामुळे आपल्या आयुष्यात काही गोष्टीत हानी पोहचण्याची शक्यता असते. बरेचदा काही जण कोणत्याही वेळी जेवतात अथवा कोणत्याही वेळी झोपतात, तर काही जण कोणत्याही वेळी घरातील साफसफाई करतात. मात्र शास्त्रानुसार याचा वाईट परिणाम दिसून येतो. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपण 3 कामं संध्याकाळच्या वेळी करू शकत नाही. असं म्हटलं जातं की, सूर्यास्तानंतर ही तीन कामे केल्यास, घरात लक्ष्मीचा वास राहात नाही आणि आर्थिक स्थिती खराब होऊ लागते. नक्की ही तीन कामे कोणती आहेत आणि काय आहे कारण ते जाणून घेऊया.
संध्याकाळच्या वेळी झोपणे
बरेचदा काही जण सूर्यास्त होण्याच्या वेळी अर्थात भर संध्याकाळी झोपतात. मात्र शास्त्रानुसार असे करणे योग्य नाही. वास्तविक शास्त्रामध्ये सकाळ आणि संध्याकाळ घरामध्ये माता लक्ष्मीदेवीचे आगमन अर्थात पैशाची भरभराट होण्याची वेळ मानण्यात येते. हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की, संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीचे आगमन होते आणि एखादी व्यक्ती त्यावेळी घरात झोपली असेल तर लक्ष्मी आणि तुमचे नशीब दारावर येऊन परत निघून जाते. ज्याप्रकारे सूर्योदयाच्या वेळी देवाची पूजाअर्चा करून दिवसाची सुरूवात होते, तशीच संध्याकाळच्या वेळीही पूजाअर्चा करून घरात पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा टिकविण्यात येते. संध्याकाळच्या वेळी झोपल्याने घरात दरिद्रता येण्याची शक्यता वर्तविण्यात येते.
संध्याकाळच्या वेळी केर काढणे
बऱ्याचदा घरातील व्यक्ती संध्याकाळच्या वेळी घरात साफसफाई करायला घेतात आणि घरातील कचरा बाहेर काढतात. मात्र शास्त्रानुसार, ही लक्ष्मीची घरात येण्याची वेळ असते. असे मानण्यात येते की, झाडूने कचरा काढणे म्हणजे येणाऱ्या लक्ष्मीला पुन्हा बाहेर काढण्यासारखे आहे. शास्त्रानुसार रात्रीच्या चार प्रहरांमध्ये केर काढणे अथवा सफाई करणे हे योग्य मानण्यात येत नाही. सूर्यास्ताच्या वेळी आपण केर काढून कचरा बाहेर काढतो तेव्हा लक्ष्मीही त्यासह घराबाहेर निघून जाते. त्यामुळे कधीही सूर्यास्ताच्या वेळी केर काढू नये. शास्त्रात यासाठी मनाई करण्यात येते, कारण संपूर्ण दिवस काम केल्यानंतर घरात सकारात्मकतेचा वास असतो आणि केर काढल्याने नकारात्मकेची ऊर्जा संध्याकाळच्या वेळी घरात येते. लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्यासाठी तुम्ही ही गोष्ट टाळायला हवी.
धनाचे दान करणे
तुम्ही कोणालाही पैसे देणार असाल अथवा दानधर्म करणार असाल तर संध्याकाळच्या वेळात दानधर्म करू नका. असे मानण्यात येते की, संध्याकाळच्या वेळी येणारी लक्ष्मी जर दुसऱ्या कोणालाही दिली तर माता लक्ष्मीचा तुमच्यावर कोप होतो आणि घरातील आर्थिक परिस्थिती ही खराब होऊ लागते. तुम्हाला कोणालाही धनाचे दान करायचे असेल तर सूर्यादय आणि सूर्यास्ताची वेळ टाळून तुम्ही ही दानधर्माची सेवा करावी अथवा पैशाची देवाणघेवाण करावी. संध्याकाळची वेळ ही लक्ष्मीपूजनाची असल्यामुळे धनाचे दान करणे टाळावे.
शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या काही गोष्टी आपण नक्कीच लक्षात ठेवायला हव्यात. आम्ही कोणतीही अंधश्रद्धा बाळगण्यासाठी खतपाणी घालत नाही. मात्र शास्त्रामध्ये काय सांगण्यात आले आहे, याबाबत माहिती तुमच्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर या गोष्टी पटल्या तर तुम्ही त्या करा अन्यथा केवळ माहिती म्हणून वाचून कसे वाटले ते नक्की कळवा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade