घर आणि बगीचा

नवीन घराच्या शुभेच्छा संदेश मराठी (New Home Wishes In Marathi)

Leenal Gawade  |  Sep 22, 2021
Vastu Shanti Wishes In Marathi

स्वत: चे घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. असे स्वप्न साकार झाले की, तो आनंद हा गगनात मावेनासा असा असतो. तुम्ही किंवा तुमच्या खास जवळच्या व्यक्तिने नवे घर घेतले असेल तर तुम्ही हा आनंद त्यांना शुभेच्छा पाठवून करायला हवा. नवे घर घेतल्यानंतर बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. त्यामध्ये गृहप्रवेश (Griha Pravesh Shubhechha In Marathi) वास्तुशांती (Vastu Shanti Quotes In Marathi), आपल्या आनंदी वास्तूचे नाव अशा बऱ्याच गोष्टी येतात. वास्तुशांतीसाठी निमंत्रण पत्रिका ही देण्यात येतात. नवीन घर घेतल्यानंतर नवीन घराच्या शुभेच्छा देण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमचा हा ताण कमी केला आहे. कारण आम्ही तुमच्यासाठी नवीन घराच्या शुभेच्छा (New Home Wishes In Marathi) निवडले आहेत.

 नवीन घराच्या शुभेच्छा (New Home Wishes In Marathi)

New Home Wishes In Marathi

नवीन घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप झटावे लागते. एखाद्याने त्याच्या मेहनतीने त्याच्या आवडीचे घर घेतल्यानंतर त्याच्या आनंदात सहभागी होऊन त्याला नवीन घराच्या शुभेच्छा (New Home Wishes In Marathi) देणे फारच गरजेचे असते. अशा नवीन घरासाठी तुम्ही पाठवा या शुभेच्छा.

  1. घर हे आठवणी, प्रेम आणि आनंदाचे आश्रयस्थान असते,
    तो आनंद आपल्या आयुष्यात आल्याबद्दल, आपले मन: पूर्वक अभिनंदन!
  2. मन आणि घर  किती मोठे आहे ते महत्वाचे नाही
    मनात आणि घरात आपलेपणा किती आहे ते महत्वाचे आहे, नवीन घराच्या शुभेच्छा!
  3. मेहनतीने घेतलेल्या तुमच्या वास्तुत येऊ दे आनंदच आनंद,
    नवीन घराच्या शुभेच्छा!
  4. मेहनतीने केले घर आम्ही उभे,
    आपण येऊन  वाढवावा त्याचा आनंद
    नवीन घराच्या पुजेचे देतो आम्ही आमंत्रण
    उपस्थित राहून आनंदी करा आमचे जीवन
  5. नवीन घरात प्रवेश करुन मिळेल तुम्हाला आनंद,
    तुमच्या जीवनात येईल आनंदी आनंद,
    नवीन घराच्या शुभेच्छा!
  6. तुमचे स्वप्न साकार होवो, तुमच्या जीवनात आनंदी आनंद येवो,
    तुमच्या नवीन घराचा झाला आम्हाला आनंद,
    नवीन घराच्या शुभेच्छा!
  7.  नवीन घराचा आनंद आहे खास,
    तुमच्या जीवनात हा आनंद यावा नेहमीच हमखास,
    नवीन घराच्या शुभेच्छा
  8.  तुमच्या घरात येवो नेहमीच आनंद
    नव्या वास्तुत येऊ दे तुमच्या आनंदी आनंद
    नवीन घराच्या शुभेच्छा!
  9.  नवीन घरासाठी अनेक शुभेच्छा
    तुमच्या आयुष्यात असाच आनंद येत राहो
  10. आपले नवीन घर  आपल्याला बऱ्याच नव्या आठवणी देतात,
    तुमच्या सगळ्यांना मिळो आनंदी आनंद
    नवीन घराच्या शुभेच्छा!

कमी बजेटमध्येही सजवू शकता तुम्ही तुमचं स्वप्नातलं घर, या टिप्स करा फॉलो

वास्तुशांती शुभेच्छा मराठी (Vastu Shanti Wishes In Marathi)

Vastu Shanti Wishes In Marathi

नवीन वास्तू घेतल्यानंतर त्याची शांती करण्यासाठी प्रत्येक हिंदू घरात खास पूजा केली जाते. त्याला आपण वास्तुशांती पूजा असे म्हणतो. वास्तुशांती पूजा केल्यानंतर ती वास्तू राहण्यासाठी योग्य होते. त्या दिवसापासून घरात राहण्यास आपण सुरुवात करतो अशा वास्तुशांतीच्या दिवसासाठी (Vastu Shanti Wishes In Marathi) वास्तुशांती शुभेच्छा मराठी नक्की पाठवा.

  1.  वास्तूला घर बनवणे कठीण असते,
    आपण आपल्या वास्तुला नेहमी घर बनवून ठेवावे,
    वास्तुशांतीच्या शुभेच्छा!
  2.  वास्तुशांतीचा दिवस हा आला,
    तुमच्या जीवनात नवा आनंद आला,
    वास्तुशांतीच्या शुभेच्छा!
  1.   तुमच्या नवीन घरात नांदो सुख-शांतीची सद्भावना
    तुमच्या चित्ती थारा द्यावा हीच मनीची इच्छा
    वास्तुशांतीच्या शुभेच्छा!
  2.  घर ते मजला आपुले वाटे,
    जिथे निवारा सुखद वाटे,
    व्यवहाराचा रुक्ष मुखवटा,
    घरात शिरता गळून पडावा,
    वास्तुशांतीच्या शुभेच्छा!
  3.  प्रत्येकाला हवं असतं आकाश,
    उंच भरारी घेण्यासाठी
    प्रत्येकाला हवं असतं एक घर
    सायंकाळी घरी परतण्यासाठी
    वास्तुशांतीच्या शुभेच्छा!
  4. तुमच्या घरावर होवो धनाची बरसात
    लक्ष्मीचा असावा सदैव वास,
    वास्तुशांतीच्या शुभेच्छा!
     
  5.  नवीन घरात असावा लक्ष्मीचा वास
    सदैव व्हावी आनंदाची बरसात
    तुम्हाला वास्तुशांतीच्या शुभेच्छा!
  6.  चारी दिशांना आहे आनंदाची लहर
    मिळावे तुम्हाला इच्छिलेले सर्वकाही,
    वास्तुशांतीच्या शुभेच्छा
  7.  तुमच्या नव्या घराचा आनंद हा मोठा,
    मिळावे तुम्हाला इच्छिले तुम्ही मना
    वास्तुशांतीच्या शुभेच्छा
  8. आमच्या शुभेच्छांनी यावी तुमच्या आयुष्यात बहर
    नव्या घरात पडावे तुमचे शुभ पाऊल,
    आनंदाने करावा तुम्ही गृहप्रवेश, वास्तुशांतीच्या शुभेच्छा! 

गृहप्रवेश शुभेच्छा संदेश (Griha Pravesh Wishes And Quotes In Marathi)

Griha Pravesh Wishes And Quotes In Marathi

घर खरेदी करताना खूप विचार करावा लागतो. एखादी नवी वास्तु घेतल्यानंतर त्या वास्तुमध्ये प्रवेश करण्याआधी त्याची गृहप्रवेश पूजा केली जाते.  वास्तुशांतीच्या तुलनेत ही थोडी लहान अशी पूजा असते. पण जर तुम्ही गृहप्रवेश केला नाही तर तुम्ही घरात प्रवेश करण्यासाठी सज्ज नाही असे म्हणतात. त्यामुळे गृहप्रवेश आणि वास्तुशांती अशी पूजा एकत्र केला जाते. या दिवशी शेअर करा गृहप्रवेश शुभेच्छा आणि संदेश मराठी (Griha Pravesh Wishes And Quotes In Marathi).

  1. घराची वास्तुशांती करुनच मग गृहप्रवेश करावा,
    तरच वास्तुपुरुषाचा आशीर्वाद लाभून तो तथास्तु म्हणतो
  2.  आपल्या आशा, आकांक्षा होवोत पूर्ण,
    घरात गृहप्रवेश करुन मिळावा तुम्हाला आनंद
    गृहप्रवेशाच्या शुभेच्छा!
  3.  घर असावे घरासारखे
    नकोत नुसत्या भींती
    तिथे असावा मायेचा ओलावा,
    गृहप्रवेशाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
  4.  नवीन घरात मिळो तुम्हाला परमानंद,
    घेऊन आनंद आला गृहप्रवेशाचा दिवस
    तुम्हा सगळ्यांना गृहप्रवेशाच्या शुभेच्छा!
  5.  घराचे स्वप्न साकारुन तुम्ही झालात धन्य
    आता गृहप्रवेश करुन करा वास्तुला प्रसन्न,
    गृहप्रवेशाच्या शुभेच्छा!
  6.  स्वप्नात पाहिलेले स्वप्न आज झाले आहे साकार,
    गृहप्रवेश करुन करा आजचा दिवस पावन
    गृहप्रवेशाच्या शुभेच्छा!
  7.  गृहप्रवेश करुन करा तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात
    तुम्हाला गृहप्रवेशाच्या शुभेच्छा!
  8.  घराला घरपण देणारी माणसं घरात असली
    की घरात आनंद हा नांदतोच
    गृहप्रवेशाच्या शुभेच्छा!
  9.  आनंद घेऊन आला हा नवा दिवस
    तुमच्या आनंदाला नाही उरणार पारावर,
    गृहप्रवेशाच्या शुभेच्छा!
  10.  गृहप्रवेश करुन येऊ द्यावा आनंद
    तुम्हाला सगळ्यांना मिळावा हा आनंद
    गृहप्रवेशाच्या शुभेच्छा!

गृहप्रवेश कोट्स (Griha Pravesh Quotes In Marathi)

Griha Pravesh Quotes In Marathi

गृहप्रवेशाच्या या खास दिवशी मनात काही खास भावना दाटून येणे साहजिक असते. अशा या खास दिवशी तुम्ही गृहप्रवेश कोट्स (Griha Pravesh Quotes In Marathi) पाठवून आनंद वाटू शकता. 

  1. मायेने वसवलेल्या या घरात येऊ द्यावा आनंदी आनंद
    गृहप्रवेशाने मिळावा आनंद
  2.  मनीची इच्छा झाली पूर्ण आला तुमच्या दिवसात आनंद
    गृहप्रवेशाचा दिवस असतोच खास कारण या दिवशी होते नव्याची सुरुवात
  3.  गृहप्रवेश करुन मिळतो एक वेगळाच आनंद
    कष्टाचे चीझ झाल्याचा आहे हा परम आनंद
  4.  आज आनंद पोटात माझ्या माईना,
    तुमच्या गृहप्रवेशाने मनात हर्ष दाटूनी आला
  5.  डोक्यावर छप्पर असण्याचे सुख तुम्हाला मिळाले
    आनंद झाला, गृहप्रवेश करुन मिळेल तुम्हाला आनंद नवा
  6.  नव्या घराचा आनंद हा किती झाला,
    गृहप्रवेशाने आनंद हा मला खूप झाला
  7.  गृहप्रवेशाची पूजा आज तुम्ही ठेवली
    तुम्हाला लाभो मनी इच्छिलेले
    आनंदाने व्हावेस सगळे तुमचे आपले
    गृहप्रवेशाच्या शुभेच्छा
  8.  घर घेण्याची मेहनत एकदाची सफल झाली,
    तुमच्या जीवनी आनंदाची लाट ती आली,
    गृहप्रवेशाच्या शुभेच्छा!
  9.  गृहप्रवेशाचा आनंद झाला
    आनंद हा मनी उमटला
    गृहप्रवेशाने व्हावी वास्त तुमची प्रसन्न
    मिळावा तुम्हाला आनंद
  10.  गृहप्रवेशाचा आनंद सगळ्यांचा येवो आयुष्यात
    मिळावी तुमची अशी एक वास्तु आयुष्यात 

वास्तुशांती शुभेच्छा मराठी (Vastu Shanti Wishes Sms In Marathi)

Vastu Shanti Wishes Sms In Marathi

शुभेच्छा या मराठीतून असल्या तर त्या अधिक जवळच्या आणि खास वाटतात. तुमच्या कोणत्याही मित्रांना तुम्ही वास्तुशांती शुभेच्छा मराठी (Vastu Shanti Wishes Sms In Marathi) पाठवू शकता.

  1.  वास्तुशांतीची पूजा घेऊन आला
    तुमच्या जीवनात आनंद
    तुम्हाला सगळ्यांना नवीन वास्तुच्या शुभेच्छा!
  2.  नव्या घराने दिला तुम्हाला हा आनंद 

जाणून आम्हालाही झाला हर्ष
वास्तुशांतीच्या शुभेच्छा!

  1.  आनंदी आनंद झाला
    नव्या वास्तुचा वास्तुशांती सोहळा आला,
    वास्तुशांतीच्या शुभेच्छा!
  2.  घर असते फारच सुंदर जे देते एक सुख आणि समाधान
    नव्या वास्तुसाठी खास शुभेच्छा!
  3. घरात पाऊल टाकून मिळावी तुम्हाला सगळी सुख शांती
    मिळावा आनंद व्हावी सुखाची बरसात
    वास्तुशांतीच्या शुभेच्छा
  4.  घराचा आनंद तेव्हाच मिळतो ज्यावेळी नवीन घरात
    आपल्या मेहनतीने जाण्याचा मान मिळतो
  5.  आनंदाचे उठलो सारे, वास्तुशांतीच्या सोहळ्याला
    आज आनंद झाला मला माझ्या मेहनतीचा
    वास्तुशांतीच्या शुभेच्छा!
     
  6.  नवे घर नवा आनंद मिळावा तुम्हाला सर्वतोपरी आनंद
    नव्या वास्तुच्या शुभेच्छा!
  7.  ज्या दिवसाची पाहत होता तुम्ही वाट
    वास्तुशांतीचा दिवस आला हा खास
    वास्तुशांतीच्या शुभेच्छा!
  8.   आज येणार घराला घरपण
    कारण आज आहे वास्तुशांतीची पूजा
    वास्तुशांतीच्या दिवसाच्या शुभेच्छा!

आता नवीन घर घेतलेल्या तुमच्या जवळच्या व्यक्तिंना नवीन घराच्या शुभेच्छा (Vastu Shanti Wishes Sms In Marathi) पाठवू शकता आणि त्यांचा दिवस आनंदी करु शकता.

Read More From घर आणि बगीचा