Natural Care

सर्व प्रकारच्या त्वचेसाठी ‘या’ नाईट क्रीम आहेत बेस्ट (Night Cream For Glowing Skin In Marathi)

Trupti Paradkar  |  Nov 22, 2018
सर्व प्रकारच्या त्वचेसाठी ‘या’ नाईट क्रीम आहेत बेस्ट (Night Cream For Glowing Skin In Marathi)

प्रत्येकीला आपली त्वचा सुंदर आणि नितळ असावी असं वाटत असतं. मात्र अशी सुंदर त्वचा मिळवण्यासाठी थोडेसे प्रयत्न नक्कीच करावे लागतात. नियमित योग्य निगा राखल्यास तुमची त्वचा निरोगी तर राहतेच शिवाय सुंदरही दिसू शकते. त्वचेची निगा राखण्यासाठी  तुमच्या डेली स्कीन केअर रुटीनमध्ये काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा. वास्तविक तुमच्या त्वचेला स्वच्छतेप्रमाणेच योग्य पोषणाचीही तितकीच गरज असते. आणि हे पोषण तुम्हाला त्वचेला लावण्यात येणाऱ्या क्रीममधून मिळू शकतं. स्कीन केअर रूटीनमध्ये रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून नाईट क्रीम लावल्यास त्वचेचं पोषण चांगलं होतं. म्हणूनच जाणून घ्या कोणत्या क्रीम कोणत्या त्वचेसाठी आहेत बेस्ट.

त्वचेसाठी बीबी क्रीम (BB Cream In Marathi)

तेलकट त्वचेसाठी उत्तम आहेत या नाईट क्रीम (Best Night Creams In India For Oily Skin)

जर सकाळी उठल्यावर तुमच्या चेहऱ्यावर तेलाचा थर जमा होत असेल तर तुमची त्वचा तेलकट आहे हे समजून घ्या. अशा तेलकट त्वचेसाठी हे नाईटक्रीम आहेत परफेक्ट 

1. Vichy Normaderm Night Detox 

तेलकट त्वचेसाठी हे नाईट क्रीम अगदी वरदान आहे.  कारण या क्रीम च्या वापरामुळे तुमच्या त्वचेतील तैलग्रंथीचे कार्य सुरळीत होते ज्यामुळे त्वचेत अती प्रमाणात तेलाची निर्मिती केली जात नाही. ज्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होतो आणि तुम्हाला अॅक्नेचा त्रास कमी होतो.

ही क्रीम खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. किंमत 3449 रू.

2. Oriflame Optimals White Oxygen Boost Night Cream Oily Skin 

ओरिफ्लैम ही सौंदर्यप्रसाधन तयार करणारी एक चांगली कंपनी आहे. ओरिफ्लैम कंपनीच्या या नाईट क्रीममुळे तुमच्या त्वचेतील तेलकट कमी होतो. मात्र चांगला परिणाम मिळण्यासाठी हे क्रीम रोज रात्री वापरा.

ही क्रीम खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. किंंमत 529 रू. 

3. Clinique Smart Night Custom-Repair Moisturizer

जर तुम्हाला अगदी पटकन आणि लवकर परिणाम हवा असेल तर हे नाईट क्रीम वापरा. कारण हे क्रीम खास तुमच्यासाठी तयार केलेलं आहे.  नियमित हे नाईट क्रीम वापरल्यास फक्त दोनच आठवड्यात तुम्हाला हवा तसा परिणाम दिसेल. या नाईट क्रीममुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग, फाईन लाईन्स नक्कीच कमी होतील.

ही क्रीम खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. किंमत 6700 रू.

4. Lotus Herbal Nutranite Skin Renewal Nutritive Night Cream

या नाईटक्रीममध्ये तुमच्या त्वचेच्या पोषणासाठी द्राक्षं, जीनसेंग हे चीनी आयुर्वेदिक वनौषध,  फुलांचा अर्काचा वापर करण्यात येतो. म्हणूनच हे नाईट क्रीम तुमच्या त्वचेला मऊ आणि मुलायम करतं. दररोज रात्री हे नाईट क्रीम त्वचेला लावल्यामुळे तुमची त्वचा नितळ आणि स्वच्छ होते.

ही क्रीम खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. किंमत रू. 318

कोरड्या त्वचेसाठी नाईट क्रीम (Best Night Cream For Dry Skin)

जर तुमची त्वचा फार कोरडी असेल तर मात्र तुम्हाला दररोज रात्री झोपताना नाईट क्रीम लावण्याची फारच गरज आहे. कारण अशा त्वचेला इतर त्वचेच्या मानाने जास्त पोषण आणि काळजीची गरज असते. म्हणूनच यापैकी एखादी क्रीम तुमच्या त्वचेसाठी निवडा.

1. Fabindia Vitamin E Cream Night

फॅबिना नाईट क्रीम व्हिटॅमिन ई युक्त आहे. ज्यामुळे तुमच्या कोरड्या त्वचेचं चांगलं पोषण होतं  आणि त्वचा लवकर मऊ मुलायम दिसू लागते. म्हणूनच दररोज रात्री झोपताना तुमच्या चेहऱ्यावर ही क्रीम लावा आणि थोड्याच दिवसात चांगला परिणाम पाहा.

क्रीम खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. किंमत रू. 450

 

वाचा – क्रिम उत्पादन जे तुमच्या त्वचेवरील टॅन काढायला करतात मदत

2. Oriflame Love Nature Night Cream Wild Rose

ओरिफ्लैम कंपनीने ही नाईट क्रीम कोरड्या त्वचेच्या समस्यांसाठीच निर्माण केली आहे. या नाईट क्रीममुळे तुमची त्वचा मऊ तर होतेच शिवाय तिचे उत्तम पोषणही होते. विशेषतः ही क्रीम थंडीच्या दिवसांमध्ये वापरण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे तुमची त्वचा जास्तीत जास्त हायड्रेट राहते. रात्री झोपण्यापूर्वी ही क्रीम नियमित लावल्याचा परिणाम तुमच्यावर चांगला दिसून येतो.

क्रीम खरेदी करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता. किंंमत 373 रू. 

 

3. Lakme Absolute Youth Infinity Skin Sculpting Night Crème

सौंदर्यप्रसाधनांची निवड करण्याबाबत आजही अनेकांचा लॅक्मे कंपनीवर विश्वास आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला ही क्रीम सूचवत आहोत.  ही नाईट क्रीम तुमच्या त्वचेला फ्रेश आणि नितळ ठेवण्यास मदत करते. कारण मोत्यापासून तयार करण्यात आलेल्या या क्रीममध्ये तुमच्या त्वचेच्या पोताला उजळ करणारे घटक असतात. ज्यामुळे त्वचेवर इंन्स्टंट ग्लो येतो.

क्रीम खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. किंमत 580 रू


4. Neutrogena Light Night Cream

ही नाईटक्रीम नॉन – कॉमेडोजेनिक असल्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. ज्यामुळे त्वचेला पुरेशी आर्द्रता मिळते. शिवाय या  नाईट क्रीममुळे चेहऱ्यावरील फाईन लाईन्स, सुरकुत्या कमी होतात. त्वचा मऊ देखील होते.

या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ही क्रीम खरेदी करा. किंंमत रू. 2906

निस्तेज आणि पिगमेंटेड त्वचेसाठी नाईट क्रीम (Night Creams For Pigmented Skin)

चेहऱ्यावरील काळे डाग, वांग आणि सुरूकुत्या यामुळे तुमची त्वचा निस्तेज आणि पिगमेंटेड दिसू लागते. जर तुम्हाला तुमची त्वचा  नितळ करायची असेल तर त्यासाठी काही खास नाईट क्रीमचा वापर करायला हवा.

1. The Body Shop Vitamin C Glow Boosting Moisturizer 

दिवसभराच्या दगदगीनंतर थकूनभागून घरी आल्यावर तुमच्या त्वचेला आरामाची गरज असते. थकल्यामुळे तुमची त्वचा डि-हायड्रेट होते. ज्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागतो. नियमित स्कीन केअर रूटीन फॉलो न केल्यास चेहऱ्यावर काळे डाग, वांग अथवा सुरकुत्या दिसू लागतात. यासाठी या नाईट क्रीममुळे तुमच्या त्वचेला चांगले पोषण मिळू शकते. म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी हे नाईट क्रीम नक्कीच वापरा.

क्रीम खरेदी ीकरण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. किंमत 1807रू.  

2. Forest Essentials Night Treatment Cream Sandalwood & Saffron

या नाईट क्रीममध्ये तुमच्या निस्तेज त्वचेला पूर्ववत करणारे दोन फायदेशीर घटक आहेत. या क्रीममधील चंदन आणि केशरामुळे तुमची त्वचा उजळ होते. प्राचीन काळापासून सौंदर्य खुलवण्यासाठी या दोन घटकांचा वापर केला जात आहे.

या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ही क्रीम खरेदी करू शकता. किंमत 2695 रू.

3. Kama Ayurveda Rejuvenating and Brightening Ayurvedic Night Cream

आयुर्वेदिक घटक असलेल्या या क्रीममुळे तुमची त्वचा उजळ होते. चेहऱ्यावरील काळे डाग आणि व्रण कमी होतात. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी  चेहरा आणि मानेवर ही क्रीम लावा. हे क्रीम तुमच्या त्वचेत अगदी लवकर मुरतं. मात्र लक्षात ठेवा क्रीम लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करण्यास मुळीच विसरू नका.

ही क्रीम खरेदी करण्यासाठी या ठिकाणी  क्लिक करा. किंमत 2250 रू.

4. Oriflame Optimals Even Out Replenishing Night Cream

ही नाईट क्रीममध्ये अनेक चांगले घटक आहेत. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं पोषण होतं. यामुळे तुमच्या त्वचेवरील काळे डाग आणि व्रण कमी होतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेचा पोत पुन्हा पहिल्यासारखा दिसू लागतो.

या ठिकाणी क्लिक करून तुम्ही क्रीम खरेदी करू शकता. किंंमत 373 रू. 

एजिंगच्या समस्येसाठा वापरा हे नाईट क्रीम (Best Anti-Aging Night Creams)

प्रत्येकीला आपण नेहमीच चिरतरूण दिसावं असं वाटत असतं. मात्र आजकाल फार लवकर चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा दिसू लागतात. जर तुम्ही योग्य वयात तुमच्या त्वचेची काळजी  घेण्यास सुरूवात केली तर तुमच्या चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा कमी दिसतात. 

1. Olay Regenerist Advanced Anti-Ageing Revitalizing Night Skin Cream

ओलेची ही नाईट क्रीम तुमच्या एजिंगच्या समस्येवर अगदी बेस्ट उपाय  आहे. कारण या क्रीममध्ये व्हिटॅमिन ई, प्रो – व्हिटॅमिन बी 5, ग्रीन टी, ग्लिसरिन अशा अनेक घटकांचा वापर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील फाईन लाईन्स, सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा पूर्वीप्रमाणे चमकदार आणि सुंदर दिसू लागते. रात्री वापरण्यासाठी हे एक उत्तम एंटि एजिंग नाईट क्रीम आहे.

या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ही क्रीम खरेदी करू शकता. किंमत 1224 रू.

2. The Body Shop Pomegranate Firming Night Cream

जर तुमच्या चेहऱ्याची त्वचा निस्तेज आणि कोरडी  झाली असेल तर तुम्हाला एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी ही नाईठ क्रीम वापरणं अगदी गरजेचं आहे. ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होईल आणि चेहऱ्यावरील फाईन लाईन्स कमी होतील. या क्रीमच्या नियमित वापरामुळे तुमची त्वचा मऊ देखील होईल. 

ही क्रीम खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. किंमत 2095 रू. 

 

3. L’Oreal Paris Youth Code Night Recovery Cream 

एजिंगच्या समस्या कमी करण्यासाठी लॉरेलची ही नाईटक्रीम फायदेशीर आहे. या क्रीममुळे तुमच्या एजिंगच्या खुणा तर कमी होतातच शिवाय तुमची त्वचा मऊदेखील होते. एवढंच नाही जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर स्विमिंग करण्यापूर्वीदेखील तुम्ही तुमच्या त्वचेच्या  संरक्षणासाठी हे क्रीम वापरू शकता. 

या ठिकाणी क्लिक करा आणि ही क्रीम  खरेदी करा. किंमत  1100 रू. 

4. WOW Anti Aging No Parabens & Mineral Oil Night Cream

सल्फेट, मिनरल ऑईल आणि पेराबेन फ्री असलेल्या या नाईट क्रीममुळे तुमच्या त्वचेला चांगला फायदा होऊ शकतो. ही क्रीम तुमच्या त्वचेमधील लवचिकता वाढवते. ज्यामुळे त्वचेवरीला फाईन लाईन्स, सुरकुत्या कमी होतात. ही क्रीम सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे. 

या ठिकाणी क्रिम खरेदी करण्यासाठी क्लिक करा. किंंमत 610 रू.

नाईट क्रीमबाबत मनात असलेले काही निवडक प्रश्न (FAQ’s)

रात्री नाईट क्रीम नेमकं कधी आणि कसं वापरावं ?

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा. चेहरा कोरडा केल्यावर चेहऱ्यावर नाईट क्रीम लावा आणि मगच झोपी जा. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे रूटीन फॉलो करायला विसरू नका. असं नियमित केल्यास तुम्हाला त्याचा चांगला परिणाम दिसू शकतो.

नाईट क्रीम कसं लावावं ?

प्रत्येक नाईट क्रीमच्या पॅकिंगवर काही सूचना दिलेल्या असतात. म्हणूनच क्रीम वापरण्यापूर्वी त्या सूचना वाचा आणि मगच त्या पद्धतीने क्रीमचा वापर करा. साधारणपणे चेहऱ्याच्या खालच्या भागाकडून वरच्या दिशेने गोलाकार पद्धतीने क्रीम चेहऱ्यावर लावावं आणि हलक्या हाताने मसाज करावा. फार रगडून क्रीम चेहऱ्यावर मसाज करू नका. 

नाईट क्रीम आणि डे क्रीममध्ये काय फरक असतो ?

डे क्रीम हे दिवसा चेहऱ्यावर लावलं जातं. डे क्रीममुळे तुमच्या त्वचेचं धुळ, प्रदूषण, सुर्यप्रकाशातील हानिकारक घटक यापासून संरक्षण होतं. मात्र नाईट क्रीम तुमच्या त्वचेत मुरून तुमच्या त्वचेचं योग्य पोषण करतं. रात्री त्वचेचा संपर्क धुळ, माती प्रदूषणाशी येत नाही ज्यामुळे क्रीम त्वचेत मुरण्यास मदत होते. 

अधिक वाचा –

अंडरआर्म्स स्वच्छ ठेवण्यासाठी वॅक्सिंग आणि शेव्हिंग क्रीमपैकी कोणता प्रकार योग्य, जाणून घ्या

कोरड्या त्वचेला मऊ आणि मुलायम करण्यासाठी वापरा ‘हे’ ब्रॅंडेड आणि होममेड मॉश्चराईझर

कलर हेअरची स्टाईल टिकवण्यासाठी वापरा ‘हे’ 15 बेस्ट शॅम्पू 

Read More From Natural Care