लाईफस्टाईल

विषाणूच्या संसर्गावर उपयुक्त निलगिरी तेलाचे फायदे (Nilgiri Oil Benefits In Marathi)

Dipali Naphade  |  Apr 13, 2021
Nilgiri Oil Benefits In Marathi

आपल्याकडे अनेक प्रकारचे तेल उपलब्ध आहे जे त्वचा आणि केसांसह आरोग्यासाठीही तितकीच उपयोगी ठरते. असंच एक तेल म्हणजे निलगिरी तेल. निलगिरी तेलाचे फायदे (Nilgiri Oil Benefits In Marathi) अनेक आहेत. निलगिरीचा औषधी उपयोगही तितकाच आहे. युकेलिप्टस अर्थात निलगिरी तेलाचे फायदे (Nilgiri Tel Uses In Marathi) नक्की काय आहेत याबाबत या लेखातून आम्ही माहिती देणार आहोत. निलगिरीचे तेल हे अत्यंत गुणकारी म्हणून ओळखण्यात येते. निलगिरी औषधी उपयोग मराठीत जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा लेख नक्कीच उपयोगी ठरेल. निलगिरी तेलाचा उपयोग परंपरागत करण्यात येत असून अरोमाथेरपी म्हणूनही याचा उपयोग करण्यात येतो. निलगिरी तेलाचा औषधीय उपयोग जास्त होतो. त्यामुळे बाम, इन्हेलर, रॅश क्रिम, मलम यामध्येही याचा उपयोग करण्यात येतो. विषाणूच्या संसर्गावरही निलगिरीचे तेल उपयुक्त आहे. त्यामुळे निलगिरी तेलाचे फायदे अधिक काय आहेत ते आपण जाणून घेऊया.  जेणेकरून तुम्हाला निलगिरी तेलाचा योग्य वापर करता येईल.

निलगिरी तेलाचे फायदे (Nilgiri Oil Benefits In Marathi)

Nilgiri Tel Uses In Marathi

निलगिरी तेलाचे औषधी उपयोग मराठीत तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर हा लेख नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरेल. नक्की कोणते औषधीय फायदे आहेत जाणून घेऊया.

ताप आणि खोकल्यासाठी (For Cold And Flu)

Nilgiri Oil Benefits In Marathi

निलगिरीचे तेल हे अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये सायनस (श्वास घेण्याचा त्रास), सर्दी आणि ताप यासारख्या समस्यादेखील समाविष्ट आहेत. व्हायरल इन्फेक्शनच्या कारणाने अनेक समस्या निर्माण होतात. या तीन समस्या दूर करण्यासाठी निलगिरीचे तेल अत्यंत उपयुक्त आहे. एनसीबीआय (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फोर्मेशन) च्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या शोधानुसार, निलगिरीच्या तेलामध्ये अँटिव्हायरल गुण असतात. हे गुण व्हायरल इन्फेक्शन पसरविणाऱ्या व्हायरसचा प्रभाव कमी करण्यास मदत करतात. 

या कारणाने खोकला झाल्यास वापरण्यात येणाऱ्या वेपर रबमध्येही निलगिरीच्या तेलाचा उपयोग केला जातो. याशिवाय निलगिरीचा उपयोग नासिका मार्ग आणि आतडे स्वच्छ करण्यासाठीही होतो. या तेलामध्ये डिकन्जेस्टेंट (एका प्रकारची सर्दी असते त्यासाठी औषध) प्रभाव दिसून येतो. यामुळे नाकाच्या श्वसनमार्गात साचलेली घाण स्वच्छ करण्यासाठीही याचा उपयोग होतो आणि साईनसायटिसशी दोन हात करण्याची मदत मिळते. व्यक्ती निलगिरी तेलाच्या अरोमाथेरपीचा वापर करून वाफ घेऊ शकते. सर्दी खोकल्याच्या घरगुती उपायासाठी निलगिरी ऑईल उत्तम उपाय आहे. 

कफ आणि खवखव (Cough)

Nilgiri Tel Uses In Marathi

घशामध्ये खवखव आणि कफ या समस्या अनेक जणांना जाणवतात. घशाच्या खवखवण्यावर घरगुती उपाय असतात. पण तरीही साहजिकच सतत आजारी असल्याचा अनुभव येत राहातो. यावर निलगिरीचे तेल हा उत्तम उपाय आहे. एनसीबीआयच्या संकेतस्थळावर प्रकाशित एका शोधानुसार, निलगिरीच्या तेलामध्ये सिनेओल नावाचे टेरपेनॉईड ऑक्साईड, अँटिइन्फ्लेमेटरी आणि अँटिसेप्टिक गुण आढळतात. निलगिरी तेलामध्ये आढळणारे हे गुण घशातील खवखव आणि कफ दूर करण्यासाठी उपयोगी ठरतात. निलगिरी तेलाचे फायदे विषाणूच्या या संसर्गावर उपयुक्त ठरते. तुम्ही नियमित वाफ घेताना निलगिरी तेलाचा उपयोग केलात तर घशातील खवखव दूर होण्यास मदत मिळते.

सूज आल्यास, ठरते गुणकारी (Swollen)

अनेक प्रकारचे संक्रमण आणि शारीरिक त्रासामुळे शरीराला सूज येणे अथवा दुखणे अशा समस्या होतात. यावेळी निलगिरी तेलाचा उपयोग करून घेता येतो. निलगिरी तेलामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी आणि एनाल्जेसिक (दर्द निवारण करणारे गुण) असे गुण आढळतात. निलगिरीमध्ये असणारे गुण हे सूज कमी करण्यास उपयुक्त ठरतात. तसंच सूज आल्यानंतर पुन्हा पूर्ववत पातळीवर घेऊन येण्यासही याचा उपयोग होतो.

त्वचेची घेते काळजी (For Skin Care)

निलगिरी तेलाचे फायदे

निलगिरीचे तेल त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. चेहऱ्यावर येणाऱ्या मुरूमांना दूर करण्यापासून ते जखम भरणे, सूज कमी करणे, जळजळ आणि आलेल्या पुळ्या ठीक करण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. यासंबंधित एनसीबीआयने आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या शोधानुसार, युकेलिप्टसच्या अनेक प्रजाती आहेत ज्यामध्ये मेथनॉल डायक्लोरोमेथेन नावाचे अर्क आढळते. या अर्कामध्ये अँटिअॅक्ने गुण असतात. तसंच अन्य शोधात आढळल्यानुसार, त्वचेसंबंधित समस्यांचा उपचार निलगिरीच्या तेलाने करता येतो. या तेलामध्ये बॅक्टेरिया, फंगल असल्यामुळे कोणताही व्हायरस जवळ येत नाही. याशिवाय त्वचेला आलेली सूज, एक्झिमा, सुरकुत्या आणि जखम भरण्यासाठीही याचा उपयोग होतो. यामुळे फंगल इन्फेक्नश निघून जाते.

आतड्यांकरिता (For Lungs)

निलगिरीच्या तेलाचा उपयोग आजार बरे करण्यासाठीही होतो. परंपरागत याचा उपयोग केला जात आहे. त्यामुळेच आतड्यांच्या रोगासाठीही याचा उपयोग केला जातो. वास्तविक निलगिरी तेलामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी आणि अँटी इन्फेक्टिव्ह प्रभाव असतो. जो आतड्यांना आलेली सूज आणि इन्फेक्शन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. याशिवाय आतड्यांमधील रोग आणि संक्रमण निर्माण करणाऱ्या जीवाणूंनादेखील रोख लावण्यासाठी याचा उपयोग होतो.

फंगल इन्फेक्शन (Fungal Infection)

फंगल इन्फेक्शन दूर करण्यासाठी अथवा याचा प्रभाव कमी करण्यासाठी निलगिरीचा तेलाचा वापर करता येतो. यामध्ये असणारे अँटिफंगल गुण यामुळे पेनिसिलियम डिजीटम आणि एस्परगिलस फ्लेवर्स अशा अनेक फंगससह लढण्याची ताकद यामध्ये आहे. फंगसमुळे अनेक आजार निर्माण होतात. पण निलगिरी तेलामध्ये असणारे गुण हे अनेक संक्रमण आणि फंगल इन्फेक्शन वाढण्यापासून थांबवते. त्यामुळे फंगल इन्फेक्शनवर हे गुणकारी ठरते.

मानसिक फायद्यासाठी (Mental Benefits)

Nilgiri Oil Benefits In Marathi

निलगिरीचे तेल हे अतिशय थंड आणि डोकं शांत करणारे असते. त्यामुळे थकवा घालविण्यासाठी आणि मानसिक शक्ती वाढविण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. तणाव आणि मानसिक विकारांमध्येही याचा उपयोग होतो. मानसिक थकवा घालवून रक्तप्रवाह वाढविण्यास निलगिरी तेलाचा उपयोग होतो. निलगिरी तेल रक्तवाहिन्यांना आराम देऊन शरीरात रक्तप्रवाह वाढविण्यास मदत करते. मानसिक आजाराची लक्षणे दिसू लागल्यावर त्यावर त्वरीत उपाय करा. 

दातांची काळजी घेण्यासाठी (Dental Care)

निलगिरी तेलाचे फायदे

दातदुखीवर उत्तम घरगुती उपाय म्हणजे निलगिरी तेल होय. दातदुखी असो अथवा दातांच्या हिरड्या दुखत असतील तरीही, तसंच दातामधून दुर्गंध येत असेल तर निलगिरी तेलाचा उपयोग करता येतो. म्हणूनच टूथपेस्ट, माऊथवॉश आणि अन्य दातांवर प्रयोग करण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये निलगिरी तेलाचा वापर करण्यात आलेला असतो. निलगिरी तेलामध्ये असणारे गुण हे दातदुखी थांबविण्यासाठी मदत करतात. तसंच दात दुखत असल्यास, कापसामध्ये निलगिरी तेल घेऊन लावल्यास, त्वरीत परिणामकारक ठरते.

केसांची काळजी घेण्यासाठीही फायदेशीर (Hair Care)

Nilgiri Tel Uses In Marathi

निलगिरी तेलाच्या वापरामुळे तुमच्या केसांना अधिक चांगली चमक मिळते आणि त्याशिवाय केस अधिक घनदाट होण्यास मदत मिळते. केसांच्या आरोग्यासाठीही निलगिरी तेल अधिक फायदेशीर ठरते. पण याचा अधिक उपयोग केल्यास, मात्र केसांची चमक कमी होते. केस धुण्यापूर्वी साधारण एक तास आधी तुम्ही निलगिरी तेल केसांना लावा आणि मग शँपूने केस धुवा. तुम्हाला केसांवर नक्कीच चांगला परिणाम दिसून येईल.

माऊथवॉश म्हणून चांगला वापर (Mouthwash)

निलगिरीच्या तेलामुळे श्वासाचा दुर्गंध येत नाही. त्यामुळे माऊथवॉशमध्ये याचा नेहमी वापर केला जातो. तुम्हीही नियमित याचा वापर केल्यास, श्वासाच्या दुर्गंधीची समस्या दूर होण्यास मदत मिळते. यातील मायक्रोबायल गुण हे शरीरातील अनेक जन्म देणाऱ्या आजारांना दूर ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे याचा उपयोग तुम्ही नियमित करायला हवा. 

फ्रेशनर (Freshener)

कधी कधी काही पदार्थ खाल्ल्यानंतर त्याचा वास तोंडाला तसाच राहतो. त्यामुळे निलगिरी तेलाचा वापर तुम्ही फ्रेशनर म्हणूनही करू शकता. निलगिरी तेल हे अँटिसेप्टिक आणि दुर्गंध निवारक म्हणून चांगले काम करते. केवळ तोंडामधील फ्रेशनर नाही तर अगदी तुम्ही रूम फ्रेशनर म्हणूनही याचा वापर करू शकता. हवेतील बॅक्टेरिया आणि किटाणू मारण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे तुम्ही याचा वापर करू शकता.

मधुमेहासाठी (For Diabetes)

निलगिरी तेलाचे फायदे

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून निलगिरी तेलाचा वापर करून घेता येऊ शकतो. निलगिरी तेल हे वाहिका म्हणून चांगले काम करते. संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह चांगला करण्यासाठीही याचा फायदा होतो. मधुमेही व्यक्तींच्या शरीरात चांगले रक्त कमी प्रमाणात असते. त्यामुळे निलगिरी तेलाचा वापर करून घेता येतो. तसंच निलगिरीच्या तेलाने मालिश केल्यामुळे रक्तातील कसाव कमी होतो आणि रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे मधुमेही व्यक्तींना याचा फायदा मिळतो.

निलगिरी तेलाचा वापर कसा करावा (Nilgiri Tel Uses In Marathi)

Nilgiri Tel Uses In Marathi

निलगिरी तेलाचा उपयोग हा खाद्यपदार्थांमध्ये होत नाही. तर आरोग्याशी संबंधित गोष्टींसाठी याचा उपयोग करून घेता येतो. 

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. निलगिरी तेलाने काही नुकसान होते का ?

अधिक प्रमाणात याचा वापर केल्यास, नुकसान होते. तसंच लहान मुलांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी हे तेल वापरू नये. याचा कधीही खाद्य म्हणून उपयोग करू नये. अन्यथा नुकसान होऊ शकते. अधिक प्रमाणात वापर घेतल्यास, जंत, उलट्या होणे असाही त्रास होऊ शकतो.

2. निलगिरी तेल वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा का ?

लहान मुलांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी वापरायचे असल्यास, नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. अन्यथा परंपरागत वापरात आणि माहितीत असेल तर त्यासाठी सल्ला घ्यायची गरज नाही.

3. निलगिरीमुळे चेहऱ्यावरील मुरूमं जाण्यास मदत मिळते का ?

हो निलगिरी तेलाचा वापर तुम्ही चेहऱ्यावरील मुरूमं घालविण्यासाठी करू शकता. निलगिरी तेल हे अँटिसेप्टिक असल्याने याचा फायदा करून घेता येतो.

Read More From लाईफस्टाईल