सरळ केस खूप जणांना आवडतात. एखाद्या पार्टीसाठी किंवा लग्नाला जाण्यासाठी अनेक जण स्ट्रेटनिंग करतो. स्ट्रेटनिंगमुळे तुमचा पार्टीतला लुकतर उठून दिसतो. पण त्यानंतर केसांना जी हानी पोहोचते ते निस्तरता नाकी नऊ येऊन जाते. तुम्हालाही सरळ केस हवे असतील पण स्ट्रेटनिंगमशीन वापरायची नसेल तरीही तुम्हाला सरळ सिल्की केस मिळू शकतात. हे कसे शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही काही सोप्या ट्रीक्स सांगणार आहोत.जर तुमचे केस वेवी असतील तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. मग करुया सुरुवात
पीन आणि स्कार्फ पद्धत (Pin And Scarf Method)
shutterstock
केस सरळ करण्याची ही एक सोपी पद्धत आहे. यासाठी तुम्हाला बॉबी पीन्स, कंगवा आणि स्कार्फ लागेल. आता सगळ्यात आधी तुम्ही तुमचे केस विंचरुन घ्या. केसांच्या क्राऊन भागाकडील केस वर बांधून घ्या आणि उरलेल्या केसांपासून सुरु करा. पुढच्या केसांची बट विंचरुन ते केस मागच्या बाजूला डोक्याभोवती पीन लावत लावत सिक्युअर करा. जर तुमचे केस मोठे असतील असे करताना तुमच्या केसांच्या किमान दोन ते तीन फेऱ्या होणे अगदी स्वाभाविक आहे. असे करत करत तुम्हाला सगळे केस अशाचप्रकारे गुंडाळायचे आहेत. ते नीट राहण्यासाठी तुम्ही तुमच्या केसांना स्कार्फ बांधला तर फारच उत्तम. रात्री झोपण्याआधी हा प्रयोग करा. सकाळी उठल्यानंतर या पीना काढून टाका. तुम्हाला तुमचे केस सरळ दिसतील.
‘या’ ट्रीक्सने दिसतील तुमचे केस लांबसडक
शॅम्पू आणि कंडिशनर (Shampoo And Conditioner)
shutterstock
जर तुमचे केस वेवी असतील तर तुम्हाला नुसत्या शॅम्पूचा उपयोग करुनही तुम्हाला तुमचे केस सरळ आणि सिल्की करता येतील. हल्ली स्ट्रेट केसांसाठी खास शँम्पू मिळतात. याचा उपयोगही तुम्हाला होईल. शँम्पू करा. कंडिशनर लावताना तुम्ही तुमच्या टीप्स आणि बॉटमला लावा. साधारण 5 मिनिटे तरी तुम्ही कंडिशनर ठेवा. त्यानंतर केस धुवून घ्या. केस धुतल्यानंतर ते वर बांधू नका. टर्कीश टॉवेलने तुमचे केस पुसून घ्या. केस सरळ खालच्या दिशेने पुसा. वाळल्यानंतर केस ब्रशने विंचरा.( पण तुम्ही केस धुवू नका कारण केमिकल्सचा अति प्रयोग करणेही तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही)
प्रवासादरम्यान तुमचेही केस होतात खराब,मग अशी घ्या काळजी
स्ट्रेट पोनी (Straight Ponytail)
केस सरळ करण्याची आणखी एक सोपी पद्धत म्हणजे स्ट्रेट पोनी. पण केस बांधताना तुम्हाला विशिष्ट पद्धतीने बांधायचे असतात. केस सरळ विंचरुन केसांचा भांग पाडून घ्या. केसांचे बारीक बारीक सेक्शन करुन केसांच्या लांबीनुसार तुम्ही केस बांधा. म्हणजे केसांच्या सगळ्यात वरच्या दिशेला आणि त्यानंतर हळूहळू काही अंतरावर तुम्ही रबराच्या मदतीने केस बांधा. अशा प्रकारे तुम्ही केसांच्या सगळ्या बटा बांधून घ्या. रात्री केस डोक्याच्या खाली येऊ देऊ नका. सकाळी उठून केसांमधून एक एक रबर काढून टाका. केस व्यवस्थित विंचरुन घ्या.
या काही सोप्या ट्रीक्स वापरुन तुम्हाला तुमचे केस सरळ करता येतील.