DIY सौंदर्य

महिला दिनाच्या दिवशी सौंदर्यात घाला भर, दिसा आकर्षक

Dipali Naphade  |  Mar 5, 2021
महिला दिनाच्या दिवशी सौंदर्यात घाला भर, दिसा आकर्षक

महिला दिन (Women’s Day) म्हटलं की आता एक सणच झाला आहे. आज जागतिक महिला दिन आहे खरं तर चोवीस तास महिला आपल्या कुटुंबासाठी राबत असतात. तारेवरची कसरत करत असतात. त्यांना स्वतःकडे द्यायला वेळच मिळत नाही अशाही महिला आहेत. पण महिला दिनाच्या दिवशी तरी किमान आपण स्वतःचे लाड पुरवायला हवेत. स्वतःकडे लक्ष द्यायला हवं. त्यासाठी अर्थात तुम्हाला कुठे बाहेर पार्लरमध्ये जायची गरज नाही. तुम्ही अगदी घरच्या घरी स्वतःकडे लक्ष देऊ शकता. अशी काही उत्पादनं आहेत ज्यांचा नियमित वापर करून तुम्ही तुमच्या सौंदर्यात भर घालू शकता. केवळ महिला दिनाच्या दिवशीच नाही तर नियमित आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही या सौंदर्य उत्पादनांचा उपयोग करून घ्यायला हवा. आम्ही अशाच काही उत्पादनांची माहिती देणार आहोत, जे तुमची त्वचा अधिक चमकदार आणि तरूण दिसायला मदत करतील आणि तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी तर नक्कीच घ्यायला हवी ना…मग वाट कसली पाहताय चला जाणून घेऊया.

मायग्लॅम लिट सॅटिन मॅट लिपस्टिक (MyGlamm LIT Satin Matte Lipstick)

घाईघाईत बऱ्याचदा आपण आपल्याकडे लक्षच देत नाही. कुठे जायंच असेल तर घरातून तसेच निघून जातो. पण आपलं व्यक्तिमत्वही जपायला हवं. दुसऱ्यांची काळजी घेताना आपल्या दिसण्याकडेही लक्ष द्यायला हवे. या महिला दिनाच्या दिवशी हे नक्की आपल्या गाठिशी बांधून घ्या आणि स्वतःच्या दिसण्याकडेही लक्ष द्या. तुम्हाला जास्त मेकअप आवडत नसेल तर तुम्ही लाईट रंगाची Myglamm ची सॅटिन मॅट लिपस्टिक नक्की आपल्याकडे ठेऊ शकता. घाईघाईत नुसती लिपस्टिक लावली तरीही तुमच्या लुकमध्ये नक्कीच फरक पडतो.

चेहऱ्यासाठी वापरा योग्य फेसवॉश

आपली त्वचा कोणत्या पद्धतीची आहे  हे तर आता सगळ्यांना माहीत असतं. फेसवॉश कोणताही घेऊन येऊ नका. आपल्या त्वचेच्या पद्धतीनुसार फेसवॉश वापरा. तुमच्या  चेहऱ्यावर अॅक्ने असतील अथवा सतत मुरूमांचा त्रास होत असेल तर तुम्हाला त्यासाठी योग्य फेसवॉशची गरज आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही त्यासाठी The Beauty Co. चा टी ट्री आणि नीम फेसवॉश वापरू शकता. हा दैनंदिन वापरासाठी उत्तम असून यामध्ये कडुलिंबाच्या पानाचे गुणधर्म आहेत. नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात  आलेला हा फेसवॉश तुमचा चेहरा अधिक काळ ताजातवाना ठेवायला मदत करतो.  तसंच अँटिऑक्सिडंट्स असल्याने तुमच्या  चेहऱ्यावर प्रदूषणाचा त्रास होऊ देत नाही आणि मुरूमं कमी करायला मदत  होते. त्यामुळे तुमचा चेहरा नेहमी आकर्षक दिसतो. तुम्ही दिवसातून दोन वेळा याचा उपयोग नक्की करून घेऊ शकता. 

केसांसाठी वापरा योग्य शँपू

आकर्षक दिसण्यासाठी आपले केसही तितकेच सुंदर दिसणे आवश्यक आहे. दिवसभराचे प्रदूषण, घाम यामुळे केस लवकर खराब होतात. केसगळती, केसात कोंडा होणे यासारख्या समस्या तर अगदी कॉमन आहेत. यासाठी आपण बाजारातील कोणताही शँपू वापरणे योग्य नाही. त्यासाठी तुमच्या केसांना कोणत्या शँपूची गरज आहे आणि कसे पोषण मिळू शकते हेदेखील तपासावे लागते. तुम्हाला जर नैसर्गिक काळजी घ्यायची असेल तर The Beauty Co. चा टी ट्री आणि रोझमेरीयुक्त शँपू तुम्ही वापरू शकता. घनदाट केसांसाठी याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. टी ट्री, रोझमेरी आणि अन्य वनस्पतींचा उपयोग करून केमिकलशिवाय हा शँपू बनविण्यात आला असल्यामुळे केसांना हानी पोहचत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या केसांना या महिला दिनापासून जपायला नक्कीच सुरूवात करू शकता. तुम्हाला काही नैसर्गिक शँपूचा उपयोग करता येतो. हादेखील नैसर्गिक शँपूच आहे. 

डोळ्यांना द्या वेगळा लुक

तुम्हाला इतर कोणताही मेकअप आवडत नसेल तर डोळ्यांसाठी काजळ लावणे हा सोपा आणि वेळ न काढणारे मेकअप उत्पादन आहे. Myglamm मध्ये तुम्हाला काजळ मिळेल. जे तुमच्या डोळ्यांना अधिक आकर्षक लुक देण्यास मदत करते. काही काजळ पटकन निघून जातात. पण मायग्लॅमचे काजळ बरेच तास डोळ्यांमध्ये टिकून राहते आणि घामामुळे स्मजही होत नाही.  त्यामुळे तुम्ही तुमच्या लुकमध्ये भर घालण्यासाठी काजळचा वापर करू शकता. ही काजळ पेन्सिल तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुमचा वेळही वाचतो आणि मेकअप न करताही तुमच्या लुकमध्ये फरक पडतो. एखाद्या ठिकाणी पटकन जायची वेळ आली तर तुमच्याकडे किमान काजळचा पर्याय तरी उपलब्ध हवा. 

या महिला दिनाच्या दिवशी आपण स्वतःकडेही लक्ष देऊ असं मनाशी पक्के ठरवा आणि दिसा अधिक सुंदर…महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! (Happy Women’s Day)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य