रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा मिळावा यासाठी वर्षांतून एक ते दोन वेळा फॅमिलीचं वेकेशन प्लॅन केले जातं. लग्नानंतर हनिमूनला जाण्याचे अनेकांचे बेत असतात. काही सोलो ट्रॅव्हलर तर दर महिन्याला त्यांच्या बकेट लिस्टमधील एखाद्या ठिकाणी जातात. वेकेशनचा प्लॅनचा कोणाचाही आणि कुठेही असतो. अशा वेळी एखाद्या ट्रॅव्हल कंपनीची मदत घेणं नेहमीच सोयीचं ठरतं. कारण यामुळे तुम्हाला हॉटेल बुकिंग, प्रवासाचे माध्यम, साईट व्हिजिट अशा गोष्टींमध्ये जास्त लक्ष घालावं लागत नाही. जर तुम्ही तुमच्या कामात बिझी असाल तर तुमच्या वतीने ट्रॅव्हल कंपनी या सर्व गोष्टी करत असते. आजकाल ऑनलाईन सेवा देणाऱ्या अनेक ट्रॅव्हल कंपनी तुमच्या मदतीसाठी हजर असतात. मात्र असं एखादं ट्रॅव्हल पॅकेज बुक करण्याआधी काही गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्या. मग तुम्ही तुमचं ट्रॅव्हल पॅकेज ऑनलाईन बुक करा अथवा ऑफलाईन यासोबतच वाचा 100+ Trekking Quotes In Marathi | Travel Quotes In Marathi
ट्रॅव्हल पॅकेज बुक करण्याआधी काय चौकशी करावी
कोणतंही ट्रॅव्हल पॅकेज ऑनलाईन अथवा ऑफलाईन खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला या गोष्टी माहीत असाव्या लागतात.
- लक्षात ठेवा जर तुम्ही वेबसाईटवर दिलेल्या पॅकेजवरून तुमचं बजेट ठरवणार असाल तर थोडं थांबा कारण या पॅकेजमध्ये टॅक्स, विमानाचं भाडं अशा अनेक गोष्टींचा समावेश नसतो. त्यानुसार बजेट ठरवा.
- पॅकेजमध्ये काय असणार आणि काय नाही याची फोनवरून एजंटसोबत नीट चौकशी करा. कारण दिलेल्या माहितीपेक्षा अनेक गोष्टी तुम्हाला जाणून घ्याव्या लागतात.
- ट्रॅव्हल पॅकेजमध्ये साईट व्हिजिटसाठी असलेली एन्ट्री फी कधी कधी समाविष्ठ नसते. याची पण चौकशी करा.
- अचानक एखादं ठिकाण बंद असेल तर दुसऱ्या ठिकाणी साईट व्हिजिटसाठी नेल्यास त्याचे जास्तीचे पैसे द्यावे लागणार का
- तुमच्या सोयीनुसार पॅकेज डिझाइन करून मिळेल का
- क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास ट्राजेक्शन फी भरावी लागेल का
- तुमच्यासाठी बुक करण्यात आलेलं फ्लाईट नॉन स्टॉप आहे की कनेक्टिंग आहे. कारण अशा वेळी तुमचा वेळ वाया जाण्याची जास्त शक्यता असते.
- डेस्टिनेशनवर पोहचल्यावर तुमच्यासाठी पिक अप आणि ड्रॉप आहे का
- तुमच्यासाठी देण्याऱ्या येणारी वाहने एसी आहेत की नॉन एसी
- पॅकेजमध्ये किती दिवस आणि कधी कधी नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण आणि चहा मिळणार
- टूरसाठी गाईट असणार का
- ट्रॅव्हलसाठी लागणारी कागदपत्रं तुमच्याजवळ असावीत की ट्रॅव्हल कंपनी ती डेस्टिनेशनवर देणार
- कुटुंबातून तीन जण प्रवास करत असतील तर एका रुममध्ये किती बेडची व्यवस्था केली जाईल.
- लहान मुलांसाठी कोणत्या प्रकारचे मॅट्रेस देण्यात येतील
- साईट व्हिजिट करताना, डेस्टिनेशनवर पोहताना आणि प्रवास संपवून पुन्हा घरी परत येताना स्नॅक्सची व्यवस्था कशी करण्यात येईल. जर तुमचा प्रवास खूप मोठा असेल तर तुमच्या सोबत असलेल्या लहान मुलं, वयस्कर मंडळींची गैरसोय यामुळे होऊ शकते.